दूर तूं परी जवळी तुझ्या मी

सेल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही
 आपल्या संपर्कात आणू शकतो.
त्यामुळे कुठलीही व्यक्ती दूर जरी असली तरी ती ह्या सेलफोनमुळे जवळच असते.
हे लक्शात आल्यावर “माझा होशील का” ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या.
“दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी”आणि त्यानंतर
 “दूर तू परी, जवळी तुझ्या मी” हे जणू सेल्फोनचे दुसरे नांव आहे असे मनात येऊन ही कविता सुचली.

ओळखा पाहूं!

घणघणलो की मजं
मग  जवळी घेशी
अन म्हणशी तिला
माझ्या कानाशी
“दूर तू परी
जवळी तुझ्या मी”
वदते ती मग
तुझीया कानी
“नांव गुंफीते
तुझीया नामी”

करूं किती मी
तुमची मध्यस्थी
आणुनी तुम्हा
एकमेकां जवळी

पुसतां तुम्ही मला
असे मी कोण?
नाही का? म्हणता
तुम्हीच मला “सेलफोन”

   श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com
 

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*