ते नेत्रांनी गमवलंय

ते नेत्राने गमवलंय

भंग स्वपनाने  एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय
भंग स्वपनाने हे एकच शिकवलंय

शोधून,शोधून सुद्धा जे मिळतं
ते मिळल्यासारखे नसतं
माझा तूं मनस्वी  असून
रुसवा कां कुणाष्टाऊक
काय मनात होतं
अन
काय प्रत्यक्षात झालं
भंग स्वपनाने  एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय

दूरवर दिलेली माझी हांक
ताऱ्याना आपटून
परत आली
भंगलेल्या माझ्या दुनियेच्या
एकाकी असलेल्या किनाऱ्यावरून
परत आली
पण आता हे तडपणं पण
कुचकामी झालंय
भंग स्वपनाने एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
              shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: