कोचऱ्याची लिलू

 कोचऱ्याची लिलू
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या
दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली.
“अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर”असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकिली कॉलर, हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो “अगं तू वकील केव्हां झालीस ?”
“असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते”
कोचऱ्याला माझ्या वहिनीच्या माहेरचे कोचरेकर त्यांची ही शेजारीण होती. लहानपणी मी वहिनीबरोबर तिच्या माहेरी जात असे.
तिथून माझी ह्या कोचरेकर मंडळीशी ओळख होती.
“ये रे माझ्या घरी कधीतरी week end ला” लिलू म्हणाली. “पुढच्याच week end ला ये,Father’s day आहे नाही का? ” मी हो म्हटलं आणि मी तिला”बरंय” म्हणून पुढच्या कामाला गेलो.
ती गिरगांवात राहात होती.तिने मला तिचा पत्ता पण दिला. त्यादिवशी  मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा घरी तिची मुलगी होती. नवरा फिरतीवर दिल्लीला गेला होता.
लिलूने अनंताश्रमातून दुपारच्या जेवणाची order दिली होती.मला काय आवडतं ते तिला माहित होतं.तिसऱ्याचं सुकं,बांगड्याचं तिखलं, पापलेटची आमटी, तळलेली सरंग्याची कापं, आणि लाल सोलाची सोलकढी एव्ह्यडे जिन्नस होते.भात मात्र घरीच केला होता,मला मास्यांचे जेवण असताना भात खूप लागतो हे पण तिच्या लक्षात होतं.”सगळं जेवण तयार आहे ,दोन वाजता जेवूया” ती म्हणाली.आणि कप,कप चहावर आमच्या जुन्या आठवणी काढून गजाली (गोष्टी) चालू झाल्या.”आईवडील कसे आहेत ?”

हया माझ्या प्रश्नावर तिनेच सुरवात केली ती संपेपर्यंत जेवण केव्हा झालं आणि बाहेर अंधार केव्हां झाला हे आंम्हाला कळलंच नाही.
माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना ती बोलत होती, आणि मी फक्त ऐकत होतो.
Father’s day असल्याने तिने वडिलांचाच विषय चालू केला.
“माझ्या पन्नांसाव्या जन्मदिवशी माझ्या वडिलानी मला एक अजोड किंमतीची भेट देउन गेले.ते त्याच दिवशी वारले रे”
“त्यांच्या मरणशैयेवरून मला त्यानी माझ्या आयुष्याचा एक अनमोल धडा शिकवून गेले.त्यांच्या ८६ व्या जन्मदिवसाच्या तीन आठवडे आधी त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे डॉक्टरनी आम्हाला सांगितलं.तीन आठवड्यानंतर ते गेले.आता पर्यंतच्या आयुष्याच्या वागण्याच्या त्यांच्यापद्धतीनुसार, ह्याही गोष्टीचा जणू ताबा घेउन त्यांच्या ईच्छेप्रमाणे ते गेले.उरलेल्या आम्हा सर्वांच्या ईच्छेप्रमाणे ते घरीच गेले.
त्याच प्रसंगी मी माझ्या आईवडीलांच्या खोलीत बसले असता त्यांच्या उभ्या आयुष्याचा मागोवा मी घेत असल्याचे जाणवून किती कणखर आणि किती यशस्वी त्यांचं आयुष्य होते, हे मी त्यांचं मुल म्हणून माझ्या लक्षांत आलं.
माझ्या वडिलानी आपल्या बायको आणि आम्हा तीन मुलांची काळजी घेण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करीत असताना, ईतर सगळ्या जवळच्याना दुखवले होते. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या खोलीत दुखावलेल्या जवळच्यांची लागलेली रीघ बघून, जणू विमान अपघात होवून खाली पडलेल्या सांगाड्याकडे पहात असलेल्या, वाचलेल्या प्रवाशासारखी  माझी दैना झाली होती.

माझे वडील एक नामांकीत लेखक,असून माझे डोळे दिपून जातील एव्हडे चातुर्यवान,अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान असून सुद्धा त्यांच्यात एक खोट होती, हे मला कित्येक वर्षापासून माहीत होतं.त्यानी त्यांच्या नेहमीच्या हताश मनस्थीतून निर्माण होण्याऱ्या उद्वेगावर (रागावर),कसलीच डॉक्टरी मदत घेतली नाही.त्याना असे निक्षून सांगण्याचे कुणालाही धारीष्ट झालं नाही कीे,”वेळीच मदत घ्या अथवा कुटुंबाला मुकाल. ”

त्यांच्या मृत्युशय्येवरून त्यांनी मला जी गोष्ट शिकवली ती ते वडीलधारक असूनही शिकू शकले नाहीत.कुटुंबियांशी प्रेमळपणे राहायचं असेल तर स्वतःच्या तृटीशी अणि स्वतःच्या चुकांशी दोन हात केल्याविना गत्यंतर नाही.”

हे सर्व ऐकत असता चवदार मासे केव्हा फस्त झाले हे कळलंच नाही.जेवण संपल्यावर हात धूउन उठल्यावर लिलूने सर्व आवरून घेउन मसालेदार पान माझ्या हातात आणून दिलं.मासे खाल्यावर मला पान लागतं ते पण तिला आठवलं.
“मी माझ्या वडिलावर अत्यंत प्रेम केलं.मी सहा वर्षाची असताना पहिली गोष्ट लिहीली कारण ते माझे गुरू होते म्हणून.मी भावंडात शेंडेफळ असल्याने बरेच वेळा मला त्यानी फुरसद दिली,विनोदी वृत्तीने राहीले आणि बुद्धिपुरस्सर धडे दिले, हे सर्व ते माझ्या मोठ्या भावंडाना देऊ शकले नाहीत.

आमच्या घराल्या ह्या पद्धतीला “कोकणी वृती “असं गमंतीने म्हटलं जाई.माझ्या वडीलांच्या रागाचे वादळ शांत झाल्यावर, आमची आई आश्वासन देउन म्हणायची “मी खात्रीने सांगते ते रागाबरोबर बोलले जरी, तरी त्यांचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे”
एकदा त्यांचा आरडाओरडीचा ओघ कमी कमी झाल्यावर ते मंद्र्सप्तकात आवाज आणून हळू हळू पश्चातापाने दिलासा देत देत पुन्हा असं न होण्याचा जणू आश्वासानच देत असत.खूप वर्षानंतर मला समज येउन खरं वाटू लागलं की, माझे वडील एक उपचार न झालेले रागीष्टविकारी असून, त्यांचा अविचारी राग आणि चांगली मनसथिती ह्याचं दोलायमान आमच्या आईच्या आणि आम्हा तीन मुलांच्या मनाची स्थितीची, चलबिचलते मुळे चाळण व्हायची,आणि त्यांच्या अनिश्चीत रागीटपणामुळे ती स्थिती मनासिक धक्क्यात परिवर्तीत व्हायची.”

दुपारचे चार वाजले.लिलूने आपली कथा जरा आवरती घेउन मला म्हणाली “तू खरोखरच बोर झाला असणार,मी थोडा चहा करते” असे म्हणून ती चहा करायला गेली,आणि मला पण बाथरूममधे जाउन fresh व्हायची संधी मिळाली.
चहाचा कप पुढे करीत ती म्हणाली “मी कुठे थांबली होते?हां,हां लक्षात आलं “असं म्हणून मी उत्तर देण्यापुर्वीच तिने पुढे सुरवात केली. ” रागीष्टविकारी” असे मी त्याना मघाशी म्हणाले त्याचा

अर्थ ते जसा एखादा, रागाच्याभारात violent होवून खिडक्यांच्या कांचा फोडतो तसे काहिही करीत नव्हते.एखादी माझ्या वडीलांसारखी व्यक्ति जिच्या वागण्याची परिणीती  रोजच्या अडचणी आणि हताश परिस्थिती पाहून, उद्बेग करण्यात आणि माथेफीरू होण्यात आपोआप होते,तेव्हा अशा व्यक्तिला मनोवैज्ञानीक “dry drunks” अशा सज्ञेत वर्णन करतात.पुष्कळदा बाहेरच्या जगात असे लोक आपला राग आणि चीडखोरपणा आवरून घेतात,परंतु घरच्या चार भिंतीत मात्र ते उचंबळून येतात.उलट अर्थी माझे वडील खऱ्या संकटकाळी क्वचीतच तोंडाळपणा करीत.पण ते केव्हा फिरतील हे आम्हा घरच्या मंडळीना सांगणं कठीण व्हायचं.अगदी जसं एखाद्दया दारू पिणाऱ्याच्या घरच्या मंडळीना, सामोरे केव्हा जावं लागेल हे समजत नाही तसं.आणि म्हणून घरचे आम्ही सतत नवीन संकटाचे तुफान न येण्यासाठी सतर्क राहून त्यांना उददिपन होईल असे कारण देत नसू.

आमच्या घरात आम्ही चलबीचल स्थितित असणे हे आम्ही ओघानेच शिकलो होतो.जस जशी मी वयाने वाढत गेले तस तशी ह्या संवयीतून, सुटका करण्यासाठी मी माझ्या असल्या स्वभावाच्या वडीलांबद्दल ठार प्रामाणिक असायची.त्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटका झाली तरी, त्यांच्या रागीष्टपणामुळे संकटाला तोंड द्दयायला मी असमर्थ झाली. आणि हे सगळं त्या तीन आठवडे त्यांच्या
मृत्युशैयेवर असताना माझ्या त्यांच्या सहवासात राहीलेल्या अनुभवाच्या सत्यतेची जाणीव होई तोपर्यंत असमर्थ होते.

माझ्या थोड्याश्याच जवळच्यानी त्यांच्या डोळ्यानी टीपलेले त्या प्रसंगाचे सत्य जणू, मला सांगत होते की उपचार न झालेला ह्या माझ्या वडीलांचा रागीष्ट विकाराने, घरातल्या ईतर सर्वांवर भावनीक आघात नव्हे तर शारिरीक आघात सुद्धा होऊन, त्या सर्वांच्या मनाला लूळं करून टाकलं आहे.
आमची आई, माझ्या वडीलांची विश्वासू पत्नी,मानसिक आघाताच्या ओझ्याखाली झालेल्या मूळ कारणानी,  आतापावेतो अगणित शारिरीक विकृत्यानी अंथरूणाला खिळली होती.तिच्या जवळ जवळ पुऱ्या तरूण वयातलं जीवन तिने त्यांचा सततचा चीडचीडेपणा आणि बोंबाटून टाकलेल्या, आवाजाची ओरड आणि टिका झेलीत घालवलं होतं.हे दृश्य अचल असायचं.मानहानीची तिच्यावर खैरात
करून झाल्यावर,आपल्या कमकुवतेची ते तिला कबुली देत,दयेचा आणि भेटींचा जणू पाऊस पाडीत,आई त्यांना चुचकारून समजावी आणि मोठया मनाने समजून घेई.हिच त्यांची एकमेकावर प्रेम करण्याची रीत असायची.”

लिलूच्या लक्षात आलं की sweet dish म्हणून तिने ताजे बेसनचे लाडू माझ्यासाठी केले होते मला हे लाडू आवडतात हे पण तिच्या आठवणीत होतं.
“अरे मी माझी ही कर्मकथा सांगता सांगता बेसनचे ताजे लाडू तुझ्यासाठी केलेत ते द्दयायला विसरले बघ.कप कप चहापण करते” असे म्हणून ती आत गेली.

माझी स्थिती “आंधळा मागतो…..” अशी झाली.जरा पाय मोकळे करण्यासाठी तोवर उठून गॅलरीत fresh हवा घेण्यासाठी म्हणून गेलो.गरम गरम चहा आणि पिवळे जर्द बेसनचे चार लाडू घेऊन लिलू बाहेर आली.आणि पुढ्चे कथानक तिने चालू केलं.
” वय वाढत जाता जाता माझ्या आईचे स्नायू आणि पोट जणू गाठावले होते.डॉक्टर म्हणाले, stess मुळे तिने हळू हळू मृत्युची वाट धरली आहे.माझा भाऊपण मधुमेयाने आणि parkinson disease मुळे अपंगावस्तेत होता.परंतु,मला जे आठवतं त्यानुसार तो भावनिक अपंग होता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास गमवल्यामुळे पंगु झाला होता.जर का जीवन हे एक lottery आहे असं समजल्यास, माझ्या भावाजवळ बक्षिस न मिळणारं तिकीट होतं.
माझा भाऊ माझ्या वडीलांची स्वप्नपुर्ती करायला असम्रर्थ ठरला.  त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.पण प्रेमाचा त्यांचा अर्थ सतत एखाद्दयाच्या मागे लागणं!आणि त्यामुळे त्याचा शेवट स्वतःला कमी लेखण्यात झाला.त्याच कधी लग्न झालं नाही, नाही तो आयुष्यात काही बनू शकला,आणि शेवटी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, एक अपंग म्हणून एका नर्सिंग होममधे जीवन कंठीत होता.

माझ्या भावाच्या तुलनेत माझी मोठी बहिण त्यामानाने एक सुखी जीवन जगत होती.पण त्याचं कारण ती माझ्या वडीलांपासून दूर होती. जवळ जवळ तिचे त्यांच्याशी संबंधच तुटले होते.त्यामुळे त्यांच्या शेवटच्यादिवसात तिन मुलांपैकी एकच मुल (मी) त्यांच्या जवळहजर होतं.

जसजसं माझे वडील अगणित मानसिक आणि शारिरीक वेदनेतून मृत्युच्या दिशेने प्रवासास लागले होते,तसतसं माझ्या मनात वरचेवर डोकावणारा एक विचार उचल खात होता.तो म्हणजे हा त्यांचा दुःखित अंत, स्वतःच्या आणि ईतरांच्या जीविताला निष्फळ करून आणि हानी देऊन, जात असताना माझ्या वडीलाना वेळीच उपचार मिळाले असते, तर हे स्रर्व टाळता आलं असतं.

अगदी अलिकडे अलिकडे समाजाने दारू पिणाऱ्या व्यसनी व्यक्तिंची जोरात पसरणारी समस्या असल्याचे स्विकारून, ती त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबियाना पण खाईत लोटू शकते, असे मत केले आहे.आणि त्या व्यक्तीला उपचार करून बरं करता येतं हे पण मानलं आहे. त्याशिवाय संस्था पण अस्तितवात आहेत, की ज्या ह्या समस्येचा अभ्यास करून कुटुंबे दोन हात करून कसं सईसलामत सोडवणूक करून घ्यायचं हे पण शिकली आहेत,परंतु रागीष्टपणाच्या विकारावर असले काही उपाय अजून प्राप्त झालेले नाहीत.उलट हा रागीष्टपणा म्हणजे एक व्यक्तिगत स्वाभाविक दर्गूण आहे, असं समजून उघड पणे बाजूला सारून, त्याची परिणीती अन्यायात होत असावी, अशा निष्कर्षाला आणलं आहे.

खूप उशीर झाल्याने मी लिलूची रजा घेतली,पण” उरलेली तुझी कथा ऐकण्यास पुढच्या आठवड्यात नक्की येतो” असे आश्वासन देऊन मी तिला हिरमुसली करून जात आहे हे लक्षात आल्यावर “तुझ्या कथेचा शेवट कसा झाला आणि यातून काही तरी चांगलं नक्कीच ऐकायला मिळणार” असा आशावाद ठेवून मी घरी परतलो.

पुढच्या weekend ला मी तिला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी चहाच्यावेळी येईन.आणि त्याप्रमाणे मी तिला भेटलो. मला पाहून तिचा चेहरा खूपच आनंदी दिसला.कदाचित माझ्या येण्याने तिला मी आनंदी करू शकलो ह्याने मला फार बरं वाटलं.ईकड्च्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,ती मुळ पदावर आली. मला म्हणाली” शाब्दिक मार जखमेच्या खूणा दाखवित नाही.झालेले नुकसान अद्रुश्य असतं.जर का शारिरीक नुकसान झालं नसेल तर डॉक्टरपण मुद्दाम म्हणून लक्ष घालीत नाहीत,जोपर्यंत रुग्ण त्याची मदत मागत नाही तोपर्यंत.खूपदा मी आणि माझी आई माझ्या
वडीलाना तपासून घ्या म्हणून मागे लागत असू,पण त्यानी कधीही त्या म्हणण्याला भिक घातली नाही.

एकदा आमच्या डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं की आमच्या आईची प्रकृती दिवसे दिवस खालावत जाण्याचे कारण मुख्यतः आमच्या वडीलांचा तिच्यावर होणारा शाब्दिक अत्याचार हा आहे.आणि जेव्हा आम्ही त्यांना, वडीलाना उपचार देण्याची विनंती केली,त्यावर त्यानी हा उतार वयातला प्रॉब्लेम असून ते स्वतः त्यांच्याकडे तपासायला आल्याशिवाय उपचार करणे शक्य होणार नाही असं म्हणाले.
गेल्या वर्षभरात मी मनोवैदज्ञानीक तज्ञाना भेटून वडीलाना
उपचार देण्याचा प्रयत्न केला.हा काही असंभवनीय विकार नाही असं बऱ्याच तज्ञाचं मत होतं.शब्दिक अत्याचार हा शारिरीक अत्याचारापेक्षा  गंभीर असून त्याचे दूरवर परिणाम होतात.”

परत एकदा चहा करण्याच्या कारणानी लिलू उठली आणि तो घेउन, आल्यावर पुढे म्हणाली ते मला खूपच धक्कादायक वाटलं.”माझे वडील निर्वतल्या नंतर तीन महिन्यानी माझी आई गेली.मी ईच्छित होते की निदान ते गेल्यानंतर तरी शाब्दिक अत्याचाराविना ती उरलेले आयुष्य आनंदात घालविल, हे माझे फक्त मनोरथच ठरले.”
” ६३ वर्षांचं त्या दोघांचं आयुष्य एकमेकाशी कमालीचं गुंतलेलं होतं.अगदी तसंच माझ्या भावाचं भविष्य पण.
माझ्या वडीलांच्या पहिल्या डेथ ऍनिव्हर्सरी नंतर अवघ्या पांच दिवसानी माझा भाऊ गेला.
माझ्या वडीलानी त्यांच्या पश्चात एक संपन्न पायंडा मला ठेऊन गेले.धड्यांचे भांडार की जे माझ्या अर्ध्या उरलेल्याआयुष्यासाठी उपयोगी पडावं.

वर्षापूर्वी मी आईवडीलांच्या खोलीत बसले असताना एक संकल्प ठरवून ठेवला. काही लागेल ते लागो ह्या पुढे असा प्रकार माझ्या पिढीत किंवा माझ्या नंतरच्या पिढीत तरी रीपीट होऊ नये.गेलं अख्खं वर्ष मी आमच्या या कुटुंबात आलेल्या ह्या चमत्कारीत पर्वा बद्दल खूप विचार करून मी अशा निर्णयाला आली, की असल्या पर्वाने जर सर्वांना त्रास होत असेल तर ताबडतोब उपचार केल्याशिवाय तरणोपाय नाही.एकदा एका मनोवैज्ञानीकाला माझ्या आई,वडिल आणि भावाचे फोटो दाखवले ते पाहून तो पटकन म्हणाला ह्यांच्या कुणाच्याच तोंडावर हंसं नाही. ते सर्व दिसतात depressed,depressed आणि depressed.
आता पर्यंत तिची ही सर्व कथा निपूटपणे एकून घेत असता कुठेही तिला मी अटकळ केली नाही,हे लक्षात आल्यावर लिलू मला म्हणाली” हे सर्व ऐकून तुझ्या मनात एखादा प्रश्न आला असेलच अशी मी अपेक्षा करते.”

त्यावर मी म्हणालो हो “मला एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे झालं ते झालं आता पुढे काय? ”
हे ऐकून तिला खूपच गहिवरून आलं.

डोळ्यात पाणी आणून म्हणाली ” मी मेल्यावर माझ्या कुटुंबाचा आलबम पाहून निराळीच गोष्ट लक्षात आली पाहीजे, ती अशी की माझी मुलगी त्या आलबमची पाने परतताना त्यातून, हे लक्षात यायला हवं की माझ्या मुलीने एक खंबीर आणि आनंदायी जीवन भोगलं आणि फोटोत आमच्या स्रर्वांच्या चेहऱ्यावर हंसं,हंसं अणि हंसंच दिसावं”

हे तिचे शेवटचे उद्गार ऐकून झाल्यावर मी उठलो आणि
विषष्ण न होता आनंदी मनाने तिचा निरोप घेतला.

      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
        shrikrishnas@gmail.com 
  
 
 
 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: