बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.
बाबारे,
कुणी तरी म्हटला हा,
“सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां.”

तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा.

माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा. पु.ल.नी म्हणजे आमच्या पु.ल.देशपांड्यानी रे, नाय काय सांगितला,सकाळी उठल्यावर गुढगे दुखणत नाय असां झाला की समजुचा आपण खंवाचलो( म्हणजे मेलो रे!) तशीच आणखी एक खूण कोणी तरी सांगितली आसा.
जर कोण तुमच्याकडून उपदेश घेवचो बंद झालो की समजुचा म्हातारपण इला.आणि जर कां कोणी म्हणालो हो उपदेश अमक्या अमक्याकडून मिळालो असतो! की समजुचां तो म्हातारो आतां हयात नाय.
तू माझो शेजारी.जुहु चौपाटीवर सकाळीच फिरांक जाताना तुझ्या बंगल्यावरून जावचा लागा.तुका बागेत काम करताना हज्जारवेळां बघीतलंय.झाले आतां तेका खूप दिवस म्हणा.आता तूं माका ओळखूचस नाय.

बाबारे,(अशी सुरवात केल्यावर समजुक होयां,काय तरी उपदेश ऐकूचो लागतलो.)
“आयुष्य कमी किंवा जास्त ह्या काय नशिबावर अवलंबून नसता, आपल्या लाईफ स्टाईलवर असतां अशी माझी धारणा आसा.

तू हल्ली ज्यावेळी ६३ वर्षाचो होतस त्यावेळी तुका कसलो तरी आजार इलो होतो.६३ वयावर ३६ वर्षाचो असल्यासारख्या करून कामा करीत रव्हल्यास कसा चलताला बाबा?समजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतले?.(तू बॉलिवूडचो राजो, तेव्हां तुका तां समजूक कठीण नाय म्हणा) असो प्रश्न मी माझ्या एका डॉक्टर मित्राक विचारलंय.तो काय म्हणालो माहित आसां?
तो हंसत हंसत म्हणालो,
 “जास्त काही होणार नाही फक्त गुढगे,युट्रस,किंवा आंतडे डीसलोकेट होईल.ताबडतोब त्याचे परिणाम दिसतीलही,न दिसल्यास कांही काळजी नाही उतार वयावर ते सर्व निमुटपणे दिसायला लागतील एव्हडंच.”
४२ वर्षावर तुका नाय काय, जीवघेणो अपघात झालेलो,तेचे परिणाम आता तुका भोवतत.२४ वर्षाच्या तरुण मुलासारखो तूं फायटींग करूचो शॉट करताना, पुनीत नावाच्या नटान तुका शुटींगमधे बुक्को मारण्याचो सीन केलो आणि तू तो टाळण्यासाठी उडी मारलंस आणि मग  टेबलाचो कोपरो तुझ्या पोटांत गेलो आणि तुझां आंतडा आतुन दुखावला वगैरे वगैरे.आठवतां मां, तुका? त्यावेळां त्यामानान, तूं तरुण होतंस लवकर बरो झालंस आणि कामांक पण लागलंस.

खूप कचोऱ्यो खाल्लंस म्हणून तुझ्या पोटांत दुखतां म्हणून हल्लीच्या आजारात डॉक्टरास सांगून तू बघलंय,पण माझ्या मनात पाल चुकचुकली.तुझो तो जुनो आजार आतां तुका ह्या वयात त्रास देवूक लागलो असतोलो असां माझ्या मनात इला.आणि तांच तुकां डॉक्टरान सांगलां नाय रे?
“देवा असां नको होवू देत रे” असां आम्ही मनात म्हटलां विचार पायजेतर कुंदाक माझ्या बायलेक रे!
अरे राजा,तुका लिलावतीत नेल्यावर तां इतक्या अपसेट झालां कि रात्री तेच्या स्वपनात तुझी जया आयली आणि म्हणता कशी,

“त्या आजारात आणि ह्या आजारात मी ह्याला बरं वाटावं म्हणून ह्याच्यासाठी किती व्रते केली, ह्याच्यावर ओवाळून दानधर्म केले, सिद्धीविनायक मंदिरात जावून किती एकादक्षीणा केल्या.मी त्याला सांगत असते “अरे,प्रकृती सांभाळून काम कर,पण माझा त्याला राग येतो”

मी जां काय ऐकला तां आता तुका सांगतंय.
तू म्हणे शंभर कोटी रुपये खंय तरी गुंतवलंस आणि एक कंपनी काढलंस,आणि हातोहात तुका लोकांनी फसवलां म्हणून मी ऐकलां. आपल्यासारख्याच सगळां जग आसां, असा समजून तू तेंच्यावर विश्वास ठेवून वागलंस,लोकांचो पैसो तो, मग तेंचो पैसो फेडूक नको काय? ते फेडून टाकण्यासाठी तू झटून मेहनत घेतलंस.
जया सांगी होती,

“फिजा,दिदार आणि कल हो न हो मधे माका ह्या वयात काम करुक लागला.फिजात तर माका बुरखो घालून काम करुक लागला.”

बाबारे, सगळां देणां तू फेडलंस,त्यानंतर पैशाची तुझ्याकडे रीघ लागली.तू पब्लीक फीगर ना, मग तुका लोकांचा ऐकूक लागतलाच. पण लोक म्हणतत म्हणून भुरावून जावू नको बाबा.
“अमिताभजी तुम ऍक्टींग करो हम तुम्हारे सांथ है ” असा लोक तुका सांगतत असा मी ऐकलां.पण तू तेंच्या नादाक लागू नको. काळजी घे तुझ्या प्रकृतीची.
बाबारे, म्हटहा ना “जग हे दिल्या घेतल्याचे,नाही कोण कुणाचे” तां काय खोटां नाय.शेवटी नुकसान कोणाचा तुझाच मां?अभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रे?पैसो म्हटलो तर दाबून पैसो तुझ्याकडे आसा.आणि ह्या वयात पैशाची कितीशी गरज आसा.मनः शांती मिळाली म्हणजे झाला. तुका नाय असा वाटणां?
हे सगळे लोक तुझ्या मागे लागतत आणि तुका काय काय आयडीया देतत.पण तुझ्या आंगातले गुण ह्या लोकानी घेवूक नको काय?
आतां ह्याच बघ,माका आपलां दिसला तां सांगतय.तू हल्लीच्या आजारात लिलावती हॉस्प्रिट्लात होतंस.किती लोक घोळको करून तुझ्यासाठी बाहेर उभे असत.एकदाचो तू बरो झालंस. त्यावेळी हॉस्पिटलाच्या बाहेर किती तुफान गर्दी होती.तू दिशसीस म्हणून ताटकळंत उभे होते येव्हडे लोक.
तुझी जया तुझ्या नविन “जलसा” बंगल्यांत वाट बघत होती.लोकानी तू तिकडे जाशीस म्हणून तुझ्या दर्शनासाठी तिकडे धांव घेतली.काही लोकानी तु सिद्धीविनायक मंदिरात पहिल्यानदां जाशीस म्हणून तिकडे धांव घेतली.तू शिरडीक जाझीस म्हणून तिकडे धांव घेतली. पण तू काय केलंस,तू सरळ तुझ्या “प्रतिक्षा” बंगल्याकडे गेलंस. कारण तुका तुझ्या आवशीची आठवण आयली.ती तुझी वाट बघत असतली तू मातृभक्त किती आसस ह्या, ह्यां लोकांक काय माहीत रे?पण आचरणात कोण आणताहा या दिवसात? त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मां?पायावर डोक्या ठेवून नंतर तिना तुका जवळ घेतलां.त्या तुझ्या माऊलीक तुझ्या स्पर्शान निराळाच वाटलां.तुझ्या डोळ्यातली आंसवा तिना तिच्या कृश हातानी फुसत, तिना तुका आणखी जवळ घेतलां आणि तुझ्या कानात पुट्पुटून ती म्हणाली, “देवा माझा उरलेलां आयुष्य हेकांच दी” तां ऐकून तू किती सद्नदीत झालंस,आठवतां ना तुका?

एका खयंच्या तरी सिनेमात तू त्या शशी कपुराक विचारतंस ना?
 “काय आसां तुझ्याकडे?
 माझ्याकडे आसां तसो, बंगलो,गाडी,नोकर चाकर आसत?”
 त्यावर तो तुका सांगता मां,
“माझी आओस आसा माझ्याकडे.”
आणि तां ऐकून तू कसो त्या सिनमधे गप्प बसतंस.पण खरां सागू  तुझ्या खऱ्या आयुष्यात तुका त्या प्रश्नाचां उत्तर असा देवूक होयां,
 “बंगलो,गाडी,नोकर चाकर माझ्याकडे आसंतंच शिवाय माझी आओस  पण माझ्याक्डे आसां.”
असां म्हणून किती धन्य वाटत असताला तुका?.
आता तुझी आवस गेली,आमकां पण खूप वायट वाटलां.

एखादो माका म्हणतलो, तुका काय करूंचा आसा.तो आपलां काय तां बघून घ्येत.पण खरां सांगू तुका मालवणी आम्ही असेच आसो.जरा फटकळ दिसलो ना तरी रसाळ फणसा सारखे.बाहेरून कांटेरी पण आतून रसाळ गऱ्या सारखे.तेव्हा तू काय मनांक लावून घेवू नकोस.
माझा मात्र काम सांगूचा.आणि तुझा ऐकूचा.

हेंचो अर्थ तू काहीच काम करु नकोस असा नाय.अरे,तुझ्यो काही तरी आयुष्यातल्यो आठवणी लिही,तुझा आत्मचरित्र लिही,उगवत्या कलाकारासाठी काही शिकण्यासारख्या लिही,आईवडीलांक तू किती आदर ठेवून वागतंस, त्याचे काही इतरांवर चांगले संस्कार होतीत असां काही तरी लिही, तुझ्या वडिलांसारख्यो काही कविता कर .तुका जरी अलोट पैसो तुझ्या मेहनतीन मिळालो तरी तो लोकांकडूनच मिळालो मां? त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां? थोडीशी गांधीगीरीपण करूची लागता.
तू तसा करुचंस नाय म्हणा, कारण पैसो कोणाक नको झालोसा?. पण एक  सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको बाबा! मोठ्यां मोठ्याक पश्चाताप झालेलो मी बघितलंय.तुकापण पुर्वीचो अनुभव आसां म्हणा.राजीव गांधीच्या वेळी रे!
ह्या वयांत “हेल्थ इज वेल्थ ” असा काय म्हणतत नां तांच खरा.तू काय इतको म्हातारो झालंस नाय रे.पण बघ ज्या वयावर जां शोभतां तां करुक होयां नाय काय?ह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला काय? माकां सांग.
हल्लीच तुझ्या घरावर कोणी म्हणे बाटल्यो फेकल्यो,दगड मारले म्हणून ऐकलां,माकां काय राजकारण समजणां नाय बघ.

जां समजणां नाय मां तेच्यावर विचारला नाय तरी सांगुचा असा आमका मालवणी लोकांक मुळचीच संवय आसा.आता एखादो मालवणी ह्या वाचून माझ्यावर चिडतोलो नक्की,पण मी तेची पर्वा करणंय नाय.खरां सांगूक हरकत कसली रे?

राजकारण बरां नांय.मोठ्या मोठ्यानी हात टेकलेत बघ.होताचा नाय आणि नायचा होता करूंक येवंक होयां.गेंड्याचा कातडां आंगावर होया.ह्या बोटावरची थुकी त्या  बोटावर करूक येवूक होयी.तां तुकां माकां जमुचा नाय.आपलो पिंड तसलो नाय.आणि बघ प्रत्येक काडीक दोन टोकां असतत.ह्या तुका सागूंक नको.तसाच प्रत्येक वादाक दोन बाजू असतत.दुसऱ्याचां म्हणणां पण बरोबर असू शकतां.
तुका माहीत आसां मा, मराठी लोकांक नाटकां खूप आवडतत,आणि त्यातल्यात्यात आमका मालवण्यांक तर खूपच आवडतत,मालवणीत धयकालो तर नाटकाचो उस्फुर्त प्रकार आसा. थोडा रामायण महाभारत माहित असलां म्हणजे झालां.मग अर्जुन रामायणात की राम महाभारतात होतो ही खरी माहिती असण्याची इतकी जरुरी नाय.फक्त नाटकाच्या मंचावर डायलॉग म्हटले म्हणजे झालां.तुका माहीत आसां त्यामुळे विनोद सुद्धा उत्पन्न होता तो.मछ्चींद्र कांबळी तुका म्हायत असतोलच.आता तो गेलो म्हणां नायतर तेना तुझ्या ह्या बाटल्या प्रकरणावर एक मालवणीत नाटक लिवला असतां
 ” बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी?”
 रुक्मिणी,भामिनोचो वाद तुका म्हायत आसां मां?श्रीकृष्णाक किती त्याच्या बाईलानी डोक्याक काणेर केलो तो?

आता जाता जाता एक शेवटचा सांगतय.आयुष्य एकदांच मिळतां ह्या काय तुकां सांगुक नको.तुझे जे जवळचे आसत ना त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालंव.आणि तुका जोपर्यंत लोकां हवो हवोसो म्हणतत नां, तो पर्यंत तेंच्यातून आंग काढून घेतलेलां बरां असा माका वाटतां. आमच्या सुनील गावस्करान कसा केला.वेळीच बाजूक झालो. क्रिकेट मधून रे!.आमचो सुनील म्हणण्याचा कारण तो आमच्या वेंगुर्ल्याचो.उभ्यादाड्यांचो रे!
दुसरा म्हणजे अट्ट्ल बिहारीचा बघ.नावासारखे बाजपायजी आपल्या पणाशी अट्ट्ल आसत.आता परत पंतप्रधान होवूक मागणत नाय. अशी किती दाखले देवू मी तुका?
कुणी तरी म्हटलां बघ.” सूर्यनारायणा कडून एक शिकूक होयां,संध्याकाळ झाली रे झाली, की  आपण अस्थाक गेलेला बंरा”
होय नायतर, आपलां नांव रात्रीच्या भानगडीत नको बाबा!.
माझ्या अक्कलेप्रमाणे मी तुका सल्लो दिलंय.आता निर्णय का घेवचो तां तू बघ.
    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
        shrikrishnas@gmail.com
 

Advertisements

2 Comments

 1. savita wagle
  Posted ऑक्टोबर 12, 2010 at 11:12 pm | Permalink

  kup mast lihilay. kas suchat abakaka tumhala….

  • Posted ऑक्टोबर 13, 2010 at 10:26 pm | Permalink

   सविता,
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
   जसं जात्यावर बसल्यावर ओव्या सुचतात
   तसंच
   pc वर बसल्यावर बोटं शीवशीवतात


Post a Comment to savita wagle

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: