सांग कसा मी मलाच सावरूं

नको नजर लावू अशी
होईल मला तुझी नशा
नकळत करीन मी माझी
अवचित दुर्दशा
सांग कसा मी मलाच सावरूं

नको रोखूस तू मला
सांग कसा मी मलाच रोखू
म्हणशी नीष्ठूर तू मला
सांग कसा मी मलाच सावरूं

काजळ तुझ्या नयनातले
असुंदे जसेच्या तसे
होवूनी तू अशीच धुंद
राहुदे केस तुझे सैलसे

असेच येवून धुंदी मधे
बहकलो मी तुला पाहूनी
पाप घेतले होवूनी बेचैन
नको ऐकवू बोल तुझे
नाजुक तुझ्या ओठातून

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. shreejit
  Posted मार्च 16, 2010 at 4:35 सकाळी | Permalink

  खूप छान आहेत सर कविता तुमच्या. साध्या, सोप्या आणि थेट.

  • Posted मार्च 17, 2010 at 6:24 pm | Permalink

   नमस्कार श्रीजीत,
   तुम्हाला माझी कविता आवडली हे वाचून बरं वाटलं.कविता सहज समजण्या सारख्या आणि वाचकाला त्यातला आशय कळण्याजोग्या असाव्यात असं माझं ही मत आहे.
   तुमच्या प्रतीक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: