वा…बाबा..वा!!…..किंचीत विडंबन..क्वचित विडंबन.

वृद्ध आई नेहमीच ढळाढळा अश्रू ढाळत असावी….बिचारी आई अशा ही वेळी.

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात
तुम्ही मात्र डोळ्याला डोळा देत नाहीत
असं हो काय…निघता निघता
साध्या आशीर्वादालाही दोन हात लावत नाहीत

का आशीर्वादाच्या हक्कापासून आम्हाला तुम्ही वंचीत करता
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

नव्हतं पटंत मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची अडचण…अधे मधे करणं
तुम्हालाही कधी खटकत असेल

म्हणून काहो कचऱ्यासारखं घराबाहेर फेकतां
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

मित्र मंडळी…तिकडे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
तुम्हाला विसरण्यात जातील

पण नातवाशी खेळायचं होतं..ते स्वप्न कसं पुरं होणार…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

वेळ भरभर जाणार….
हो..म्हणजे शॉर्टकटने सोयीना गाठायच..
लांब लांब पावलावर उभ्या आहेत त्या
नाहीतरी आता कोणासाठी त्या करायच्या..
.
घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी
सोडता…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
आयुष्याच्या सुरवातीला…
आम्हाला वेगळं घर घ्यायला सांगता..
तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?

 

हो! प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात. मला “वृद्धांच्या व्यथेपेक्षा भिन्न व्यथा-मुलांची,मुलगा किंवा मुलगी- कशी असू शकते ह्याची कल्पना येवून त्या “आज तू आमचं सारं ऋण फेडलंस” कवितेचा सुंदर गाभा तसाच ठेवून ती भिन्न व्यथा लिहावी असं मला वाटलं.

गम्मत अशी की ती परम पूज्य माऊली दोन्ही प्रसंगात बिचारी अश्रू ढाळण्यापलिकडे काही करू शकत नाही.”लळा जिव्हाळा शब्द्च खोटे”असंच तिचे अश्रू सांगत नसतील ना?
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

12 Comments

 1. वाचून बघा
  Posted एप्रिल 19, 2008 at 10:46 सकाळी | Permalink

  “मित्र मंडळी…तिकडे
  आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
  गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
  तुम्हाला विसरण्यात जातील..

  घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी
  सोडता…
  वा…बाबा..वा!! ”

  हे विशेष आवडले, छानच जमलंय !

 2. Posted एप्रिल 19, 2008 at 3:58 pm | Permalink

  आपणच मला एकदां एक दोन हिंदी कविता पाठवल्या होत्या,मराठीत अनुवाद करण्यासाठी.
  आपणच मला एकदां विडंबना विषयी विचारलं होतं.आणि विडंबन करावं असं लिहीलं होतं.
  आपण सुद्धा सुंदर मराठीत आणि हिंदीत पण कविता करता.मला त्या वाचायला खूप आवडतात.
  प्रशंसे बद्दल धन्यवाद.
  सामंत

 3. alextaraya
  Posted एप्रिल 20, 2008 at 10:38 सकाळी | Permalink

  Mr. Samant,

  I am an Indian raised in Goa.It is SAD to read that you express such hostility in this poem about kids. I certainly don’t agree because my parents have done everything morally to support us and we to them. Relationship do change when the kids grow up, but we have to go with the flow.

  If you are talking about a third party scenario in parents-kids relationship, please be careful because your topic will create wildfire. If you are talking about your own personal relationship then please talk to your own family members; we did with our parents and things got resolved.

  Please spread a positive air around and you will see good things happening to all of you! Please tell me once you have done.

  Regards,
  Dr. Alex Taraya
  M.D Cardilogist
  Panjim, Goa

 4. Posted एप्रिल 20, 2008 at 10:46 pm | Permalink

  Dear Dr.Alex Tarya
  I welcome your comments.Not only that but I welcome your right of freedom of
  expression,and your right to disagree.
  I appreciate your loud thinking of my writing on”third party scenario” there by
  anticipating,the possibility of occurrence of such scenario and warning me of
  creation of “wild fire”.Thanks for that.
  I also appreciate your thought on a chance of occurrence of such scenario in my
  own personal relationship and your good advice to talk it over to my family
  members.
  I also appreciate your admittance of occurrence of such scenario in your own
  family too and things got resolved.
  I also appreciate your suggestion on spreading of a positive air around and to
  await for good things to happen.
  Lastly I appreciate that you are keen to hear from me,provided such incidence has
  ever happened in my family.

  I feel sorry to know that my poem वा..बाबा..वा! किंचीत विडंबन..क्वचित विडंबन which I had
  written as ‘vidamban”- विडंबन- on some other’s poem ” वा..बेटा..वा!!आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..”by अनुराधा सचिन म्हापणकर on which some other reader had a comment on that poem and he had expressed his resentment in not considering “बेटा’s” -son’s-point of view visa/vee expressing only parent’s emotional view,got you emotionally
  upset.
  The same reader also requested the author to write next time a poem expressing
  son’s point of view.I read that poem including the comment of that reader.
  I took a thread on that and that inspired me to write this poem from son’s point of
  view thinking “aisa bhee hota hai”(असं पण होवू शकतं,नव्हे होतही असेल आणि आपल्याही family त झालं हे आपल्या कडून कळलं)

  Perhaps you may not be knowing this back ground and you got “moved”(emotionally) to read my poem.
  I am sure you may be knowing the meaning of “विडंबन” .It means from Prof.M.K.
  Deshpande’s “Marathi-English” dictionary”mimicry,mockery,imitation,simulation”
  If you please read Mr.P.K.Atre -well known Marathi author,poet ,drama writer’s –
  famous book”झेंडूची फूले” you may probably appreciate “विडंबन”
  Any way,for your information couple of readers have appreciated my(this) poem
  and they have rewritten couple of lines from my poem,as their comment to express
  how they appreciated the meaning of those lines in my poem.
  You may please go again on to my post of my poem and see for yourself.

  Dr.Taraya,
  one thing I feel proud of is few lines in a poem can “move” some one emotionally
  even if he is a doctor like you leave alone others though I do not mean they are
  less in any means. After all every reader is मायबाप to an author.
  Last but not the least I am a senior citizen having four grown Grandchildren – two
  of them collage going-and such thing what you presume has never happened in my
  life.
  I have hobby of writing poems and short stories -you may read my profile माझ्या बद्दल
  थोडं-
  I am sure as a medical professional you will appreciate that a writer gets inspired
  and writes, come what may.I do not claim myself a poet leave alone great poet,but
  people have suffered over their writing and they do not care for “wildfire” as you
  presume.I think all writing including poem is a God given gift or Natural gift,since it
  is a independent creation.You will appreciate my point of view since you are
  medical professional.

  I really thank you very much for your straight forward comment and request you to
  keep on reading my blog where there are lot of things to read on various
  subjects,including on some myths,and view points in medical environment, it is
  either as poem or short story.The subject is made interesting to read.
  I also have suggestion to you to please read the poem “आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..”
  by अनुराधा सचिन म्हापणकर a beautiful poem on parents.you will find this in
  “marathiblogs.net”

  Bye the way my home town is in Vengurla which is very near to Goa.I have
  several relatives and friends in Goa and कवी बा.भ.बोरकर is my near distant relative.I
  too love Goa,and I do visit Goa when I come to India.
  Please do respond (after reading as I suggested above)
  Samant
  shrikrishnas@gmail.com

 5. amhapankar
  Posted एप्रिल 21, 2008 at 10:45 सकाळी | Permalink

  नमस्कार ..

  ही मूळ कविता माझी आहे आणि ती अशी आहे..
  .
  .

  आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
  वा.. बेटा .. वा..!!
  आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

  पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात..
  तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस
  असं रे काय.. निघता निघता..
  साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस
  .
  का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस
  वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

  नव्हतं पटतं मान्य..
  कदाचित आमचंही काही चुकलं असेल
  आमची लूडबूड.. अधे मधे करणं..
  तुम्हालाही कधी खटकलं असेल
  .
  म्हणून का रे अडगळीसारखं घराबाहेर फेकलंस..
  वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

  सवंगडी सखे सोबती.. इथे
  आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
  गप्पागोष्टी .. नी थट्टा मस्करीत
  आमचे दिवस भरभर म्हणे पळतील..
  .
  पण नातवाशी खेळायचं होतं.. ते स्वप्न का मोडलंस…
  वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

  वेळ भरभर जाणार..
  हो.. म्हणजे शॉर्टकटने मृत्यूला गाठायच..
  चार पावलावर उभा आहेच तो
  नाहीतरी आता कोणासाठी आहे साठायचं..
  .
  भळभळत्या जखमेला कसं अचूक वेळी छेडलंस..
  .
  वा.. बेटा .. वा..!!
  आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
  आयुष्याच्या मावळतीला ….
  आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन तू सोडलंस…
  .
  .
  .
  सौ. अनुराधा म्हापणकर

  Posted by सौ. अनुराधा सचिन म्हापणकर at 7:23 PM
  2 comments:
  sanjaypethe said…
  वा.. बेटा .. वा..!!
  आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
  anek vrudhhanchya manatali halhal tumhi aaj tumachya shabdatun jivant kelit…
  Prabhakar Phadnis hyanchyasarkhe tumache kahi vachak, tyanchya Sobati hya sansthet, kadachit hyach jahir vachanahi karatil.. pan..
  Pan, Kavitetalya tya mulacha kinwa mulicha drushtikon vegala asu shakel na? Kadachit Tyanchi mat hya Vrudhhanchya vyathepeksha bhinn asatil na?
  *
  aata mala tumachyakadun, Ekhadi kavita Mulanchya drushtikonatun, mhanje Vruddhanbaddal Tyanch mat mandanari, kavita apekshit aahe………..

  April 18, 2008 8:13 PM
  shrikrishna samant said…
  हो! प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात.म्हणून श्री.संजय पेठे यांची comment वाचून मला “वृद्धांच्या व्यथेपेक्षा भिन्न व्यथा-मुलांची,मुलगा किंवा मुलगी- कशी असू शकते ह्याची कल्पना येवून ह्याच कवितेचा सुंदर गाभा तसाच ठेवून ती भिन्न व्यथा लिहावी असं मला वाटलं.
  गम्मत अशी की ती परम पूज्य माऊली दोन्ही प्रसंगात बिचारी अश्रू ढाळण्यापलिकडे काही करू शकत नाही.”लळा जिव्हाळा शब्द्च खोटे”असंच तिचे अश्रू सांगत नसतील ना?
  दोघांचे धन्यवाद
  माझे ह्या कवितेचे “किंचीत विडंबन”
  “कृष्ण उवाच” मधे वाचावे.
  ही पण कविता “सोबत” मधे वाचली जावी अशी इच्छा.
  सामंत

  April 19, 2008 7:01 AM
  .
  .
  माझ्या ब्लोगचे नियमित वाचक श्री सन्जय पेठे यान्च्या अभिप्रायाने स्फूर्ती घेऊन तुम्ही माझ्या कवितेचे विडम्बन करून मोकळे झालात.. ते पोस्ट करताना आपल्याला कुठेही मूळ कवयित्री वा.. कवितेची लिन्क किन्वा आठवण द्यावीशी वाटली नाही.. किन्वा कौतुकाचे अभिप्राय स्विकारतानाही ती झाली नाही.. पण समिक्षेचा एक ताशेरा उठल्यावर मात्र लगेच कवयित्री आणि कविता दोहोन्ची आपल्याला आठवण झाली..

  असो..

  विडम्बनात तुम्ही मूळ कवितेचे नुसते गाम्भिर्य च बदतलेत असे न्हवे तर पूर्ण आशयच बदलला आहेत.. त्यामुळे खरे तर त्याला विडम्बन म्हणणेही किती योग्य.. मला शन्का आहे..

  आशा आहे की पुन्हा असे होणार नाही..

  सौ. अनुराधा म्हापणकर.

 6. sanjaypethe
  Posted एप्रिल 21, 2008 at 11:30 सकाळी | Permalink

  Namaskar,
  Shrikrushn (krishn navhe)Samant, Anuradha Mhapanakaranchya blog var tumachi pratikriya vachali.
  bahuda maza muddach tumhala kalala nahi.
  Mazyamate, Vruddhanchya Vyathe pramanech, Mulanchi ichha / aani kadhi kadhi vyatha mandanari kavita mala, fakt Anuradha Mhapanakar hyanchyakadunach apekshit hoti. (itarnkadun nahi)
  aso.
  Tyamule Vrudhhanchyavyathevaril sunder kavitevar, Vidamban mhatalyavar aadhich hasyaspad watal te….
  Utsukatepoti, Krushn Uvaach vachun kadhal. (Te netvar shodhayalach aadhi khup shram ghyave lagale, Hehi ek vidamban asav, karan tya pratikriyet kuthehi Krushn Uvaach hya naave link suddha dileli nahi)
  Aapan kelel vidamban (hyalach ka vidamban asa kavyaprakar mhantat? Janakaranni spashtikaran dyav)
  Mazyamate Vidamban mhanje ekhadya vishayache gambhiry abadhit rakhun, tyakade hasat-khelat baghane, asa mala watat., pan aapan matr hya vidambanadware, hya Anuradhechya eka serious kavitechi yathechh khilli udavali…………
  *
  Anuradha Mhapankar hyanchya pratyek kavitech gambhiry kalan far mahatwach asat.
  Vidamban ha prakar, itaka sopa asto kay?
  aani mulat asha gambhirypurvak vishayala, vidambanachi jod lagate kay?

 7. dkulkarni70
  Posted एप्रिल 21, 2008 at 3:08 pm | Permalink

  First I would like to appreciate on all the contents that Mr. Samant writes last few years on WordPress.com. Most are his original thoughts that I can link going back to Konkan.

  I read comments on Mr. Samant’s latest poem publication from Mr. Alex Taraya. Alex has a good point and therefore, we should be very considerate with our next generation. A different point of view shouldn’t drive us to disown them or become sensitive to their thoughts, but rather embrace their thinking to bring commonalities to be with them. The same message also goes to the next generation.

  Mrs. Mhapankar, web is driven by contents and until unless you copyright your publications there is no need to be sensitive. Mr.Samant does “Cite ” on his thoughts for Mrs. Mhapankar when responding to Mr. Alex’s remark; however, if he should have done that in his original document is still a debatable issue. Does everyone does that?

  Thanks
  Dinesh Kulkarni
  USA

 8. Posted एप्रिल 21, 2008 at 10:28 pm | Permalink

  नमस्कार मिसेस.म्हापणकर,
  मी पण आपल्या ब्लॉगचा नियमीत वाचक आहे.एव्हडंच नाही तर आपला ब्लॉग आवडण्याची जी काय एक दोन कारणं आहेत

  त्यापैकी,
  १..आपण लिहिता ते मला आवडतं.आपल्या कविता,घरेलू-family oriented-कुटूंबातल्या लोकांबद्दल आवड असलेल्या,विशेषतः आई बद्दल अत्यंत प्रेम आणि आनंद प्रदर्शित करणाऱ्या,आणि in general वाचण्यालायक असतात.माझ्या पत्नीला मी त्या नेहमीच वाचून दाखवतो.
  २.. आम्ही दोघं कोकणातली असल्याने आपले नांव ’म्हापणकर’ हे वाचून थोडी जास्त जवळीक येते.आणि ते स्वाभाविक असावे.असं मला वाटतं.माझ्या आजीचं माहेर म्हापणचं.
  ३…”सौ.अनुराधा सचिन म्हापणकर” हे आपल्या ब्लॉगचं नाव आमच्या दृष्टीने बरेचसं traditional वाटतं.(म्हणजे चांगल्या अर्थाने)आणि ते वाचून बरं वाटतं
  असो.
  मी आपली पुर्वी एक कविता वाचून त्याची प्रशंसा करण्यादृष्टीने एकदां प्रयत्न केलेला आठवतो.पण आपला ब्लॉग blogspot चा असल्याने wordpress सारखा सहजगत्या comments साठी मिळत नाही.त्यांच्या बऱ्याच प्रश्नाना उत्तरं देवून परत ब्लॉगधारकाची परवानगी लागते.तेव्हां कधी comment accept होते. त्यामुळे मी त्यावेळी अयशस्वी झालो होतो.पण आता माझा सुद्धा दुसरा ब्लॉग “shrikrishna’s blog” हा blogspot चा
  असल्याने कदाचीत मला सहज comment लिहिता आली.
  श्री.संजय पेठ्यांची comment वाचून आणि दुसरी कविता त्यानी सुचवलेल्या विषयावर “आपण लिहावी” हे वाचून सुद्धा मी ते विडंबन लिहायला का उद्दयुक्त झालो हे माझं मलाच माहित नाही.आणि “माझी कविता तुझी कविता” असं काही नसतं हो!.
  कुणीही कुठच्याही ब्लॉगवर जावून काही वाचू शकतो,comments करू शकतो,फक्त as it is copy करत नाही.(करणारे पण आहेत,त्यांच देव भलं करो.)
  मला माझ्या ब्लॉगवर comment न लिहिता एक दोन व्यक्तिंची ईमेल आली आणि त्यावर विडंबनाचा विषय पाहून त्यानी प्रशसा पण केली.अर्थात त्यानी आपली कविता वाचली असावी हे उघडंच आहे.जास्त करून ’marathiblogs.net’ एव्हडा पॉप्युलर आहे की रोज शेकडो लोक शेकडो ब्लॉगस वाचतात.आणि हे आपल्याला माहितही असेल.मी काही खास माहिती देत नाही.
  त्यामुळे “अमुक अमुकांची क्षमा मागून वगैरे,वगैर ” लिहित बसलो नाही.श्री.दिनेश कुलकर्णी USA यांची माझ्या त्या post वर आपल्या comment च्या खाली लिहिलेली comment वाचावी.
  आपली कविता सुंदर आहे हे मी आपल्या कवितेवर comment करताना लिहिले आहेच त्या शिवाय Dr. Alex यांच्या उत्तराला माझ्या पोस्ट वर आपल्या कवितेचा संदर्भ देवून ती सुदर कविता सौ.म्हापणकरानी लिहिली आहे ती वाचावी असेही लिहिले आहे.
  “सुंदर”ह्या एका शब्दाने कविता,तिचा आशय,शब्दांची जूळणी,रिदम हे सर्व आपल्या कवितेच्या प्रशंसेत आलंच,असं मी समजलो होतो.मी,आपल्या पोस्ट वर आपले धन्यवाद मानले आहेतच.आणि आपण म्हणता तसं ताशेरा उठला वगैरे काही नाही.”पसंत अपनी अपनी ख्याल अपना अपना” त्याप्रमाणे त्यांनी आपलं मत दिलं एव्हडंच.”कवयित्री आणि कविता “ह्याचा संदर्भ देण्याचं कारण असं की इतरांसारखे ते फ्रिलान्स वाचक वाटले नाहीत माझी कविता त्याना कदाचीत ओरिजनल वाटली असावी नाहिपेक्षा आपल्या कवितेचा संदर्भ त्यानी दिला असता.त्याना त्यांच्या प्रसंगाची आठवण येवून त्यानी तशी समिक्षा केली असावी.उगाच का त्यानी लिहिलंय ” If you are talking about your own personal
  relationship then please talk to your own family members; we did with our parents and things got resolved.” ते स्वतः M.D Cardilogist असल्याने त्यांचे काही म्हणणे आपल्याला ताशेरे वाटले असावे.आमच्या घरी असले काही प्रकार झालेले नाहीत,फक्त तो कवितेचा विडंबनाचा प्रकार होता.असं मी त्यांना explain केल्याचे आपण वाचले असावे.
  एक मात्र खरं,”शब्दांना ताकद” असते.
  मिसेस म्हापणकर,विडंबनाचे निरनीराळे प्रकार असतात अशी माझी वाचक म्हणून समजूत आहे.त्यात श्री.संजय पेठे म्हणतात तसं “विडंबन म्हणजे एखाद्दया विषयाचे गांभिर्य अबाधीत राखून त्याकडे हसत खेळत बघणे”हा त्यांचा त्या अनेक प्रकारातला एक प्रकार आहे.हा एकच प्रकार नाही.कधी कधी एखाद्दया कवितेची “खिल्ली” उडवण्यासाठी पण विडंबन करतात.कधी कधी विडंबनाने मुळ कवितेत १८० डीग्री विरूद्ध विचार लिहिला जातो.
  google मधे नुसते “विडंबन” हा एकच शब्द लिहून मी अनेक कवितांची अनेक विडंबने वाचू शकलो.तेव्हा माझ्या समजूती प्रमाणे आपण म्हणता तसे, “विडम्बनात तुम्ही मूळ कवितेचे नुसते गाम्भिर्य च बदतलेत असे न्हवे तर पूर्ण आशयच बदलला आहेत.. त्यामुळे खरे तर त्याला विडम्बन म्हणणेही किती योग्य.. मला शन्का आहे..” हे आपले म्हणणं मी लक्षातच घेतलं नाही.
  शेवटी आपण लिहिता “आशा आहे की पुन्हा असे होणार नाही..” हे मात्र जरा अति झालं असं मला वाटतं.
  अहो!सर्वांच्या, सर्वच कविता काही “विडंबन” करण्या जोग्या नसतात. तुमच्या ह्या कवितेचा आशय आणि विषय तोच ठेवून मी फक्त व्यक्तिसाद्दृश्य बदललं एव्हडंच.आणि गांभिर्य म्हटलं तर अशा गोष्टी झालेल्या आहेत.हे आपण सिनेमात किंवा अलीकडे टिव्ही सीरयलवर बघतोच की.त्याशिवाय मला काही लोकानी “कविता छान जुळली आहे”असं उगाचच लिहलंय.?
  एक मात्र खरं की कुणाच्याही कविता कुणालाही आवडल्या तर वाचण्याचं कुणी बंधन आणू शकत नाही.मग प्रशंसा होवो न होवो.
  Any way आपल्याला तसं काही वाटलं असेल तर क्षमस्व.कुणाच्याही भावना दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता.
  असं हे चालायचच.
  श्री.संजय पेठे याच्या comment वर मी उद्दयां माझं मत लिहिनच.
  सामंत.

 9. Posted एप्रिल 21, 2008 at 11:09 pm | Permalink

  नमस्कार दिनेशजी,
  आपल्या comments बद्दल आभार.
  एकंदर प्रकरणावर आपले अतिशय balance
  ठेवून दिलेलं मत वाचून बरं वाटलं
  आपण माझ्या ब्लॉकचे वाचक आहात हे कळून आनंद होतो.
  आपला
  सामंत

 10. Posted एप्रिल 22, 2008 at 4:44 pm | Permalink

  नमस्कार संजयजी,
  आपली comment वाचली.त्याला आपण दिलेलं उत्तर वाचून मला असं लिहावंस वाटतं.

  माझं नाव श्रीकृष्ण हे माझ्या आईवडिलानी सुमारे ७५ वर्षापुर्वी मला दिलं.आणि शाळेत नांवघालताना इंग्रजी मधे त्यांनी shrikrishna असं दिलं.(श्रीक्रीष्ण असा शब्द्शः उच्चार) असं वापरलं गेलं.इंग्रजी मधे phonetics मधे (the process, which makes analysis of speech sounds,or confirming to pronunciation or classification of phonemes) कधी कधी कठीण जातं.
  उदाहरण म्हणून आपलं नांव पहा ’संजय पेठे’
  हे इंग्रजी मधे sanjay pethe असं आपण लिहिता.पण काही sanjay हे नांव sanjai असंही लिहितात. तसंच पेठे हे नांव आपण pethe असं लिहिता पण त्याचा काही जण उच्चार “पेथे” असाही करतात. किंवा “पेध” असाही करतात.
  अलीकडे phonetics लिहिण्यामधे खूप क्रांती झाली असून computer वर देवनागरीत( मराठीत) लिहिण्यासाठी सुलभ नियम आले आहेत.त्यामुळे निष्कारण उच्चार करण्याबाबतचे वाद कमी झाले आहेत.unicode मधे समजण्यासाठी आपल्याला संजय पेठे हे नांव saMjaya peThe असं लिहावं लागेल, नाही पेक्षा ” (sanjay pethe)” सनजय पेथे” असं होतं. आपण मुद्दाम लिहून पहावं.

  आता मला सांगा आपला ब्लॉग “संजय पेठे” असा आहे आणि मी माझ्या मनाने वाटेल ते स्पेलींग करून लिहिलं जसं “कृष्ण उवाच “असं मराठीत(देवनागरीत) लिहायला “kRuShNa uvaacha” असं लिहिण्या ऐवजी “Shrikrushn”(आपल्य़ा म्हणण्या प्रमाणे krishn navhe) असं लिहून google search engine काय किंवा आणखी कुठचही इनजीन कसं चालणार?

  आपण म्हणता,
  “Utsukatepoti, Krushn Uvaach vachun kadhal. (Te netvar shodhayalach aadhi
  khup shram ghyave lagale, Hehi ek vidamban asav, karan tya pratikriyet kuthehi
  Krushn Uvaach hya naave link suddha dileli nahi)” “Krushn Uvaach ” म्हणून तुम्हाला वाटलं तसं लिहून नेटवर शोधलंत आणि ते लिंकवर “कृष्ण उवाच”असं चक्क देवनागरीत असेल तर आपण श्रमच काय परिश्रम घेतले असते तरी जमलं नसतं.आणि नेटवर नांव शोधणं म्हणजे “विडंबन” म्हणता त्याचा अर्थ ही आपली विडंबनाची दुसरी व्याख्या झाली.त्या कवितेच्या विडंबनाची व्याख्या आपण निराळी केली आहेच.हे आपल्याला माहित आहेच.
  संजयजी,आपण चक्क देवनागरीत का लिहित नाही.? अहो,marathiblogs.net वर गेलात तर “देवनागरीत कसं लिहावं” हे छान सांगितलं आहे.तो तुमचा प्रश्न आहे म्हणा माझी इनव्हॉलमेंट तेव्हाच झाली की आपण
  “Shrikrushn (krishn navhe)Samant,
  असं लिहून एक तर माझं “बारसं” करायचा प्रयत्न करता किंवा “आपल्या म्हणण्या प्रमाणे” जग चालावं, असा “आग्रह ” करता.हे कसं शक्य होईल?.
  आपण जर कां “कृष्ण उवाच” एव्हडंच देवनागरीत google वर दिलत तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही माझाचाच ब्लॉग मिळाला नसता निरनीराळ्या ब्लॉग aggregater ची नांव पण पहायला मिळाली असती.

  संजयजी,नुसतं माझ्या ब्लॉगचं नावंच नाही तर, चुकून सुद्धा आपण कुठल्याही दुसऱ्या रेफरन्सने कुठचाही शब्द google मधे दिला तर उदा. “लळा जिव्हाळा”, “भोळा” किंवा तत्स्म,दूर कशाला गेलं पाहिजे आपण “वा..बाबा..वा”असंही google मधे लिहिलत मराठीत (देवनागरीत)तरही माझा “कृष्ण उवाच” ब्लॉग लिंक म्हणून येतो.
  हे सांगण्याचा माझा उद्देश “आत्म स्तुतीचा ” नसून मला एव्हडंच म्हणायचं आहे की search engine च्या दृष्टीने शब्द मिळाल्यावर ही engines एव्हडी powerful झाली आहेत की कुणाचा ही संदर्भ येतो माझाच असा नाही.
  हे झालं “ब्लॉग शोधण्याच्या विडंबना” बद्दल.

  काय हो संजयजी,श्री.दिनेश कुलकर्णी म्हणतात त्या प्रंमाणे “Mrs. Mhapankar, web is driven by contents and until unless you copyright your publications there is no need to be
  sensitive.”
  ह्या त्यांच्या समिक्षेनुसार कुणालाही comment करण्याची मुभा असताना” (itarnkadun nahi)” लिहिले जावू नये हे आपण कसं अपेक्षीत करता.?
  अहो,तुमची idea जी की”Mazyamate, Vruddhanchya Vyathe pramanech, Mulanchi ichha /
  aani kadhi kadhi vyatha mandanari kavita “ही आपली comment वाचून मला आवडले म्हणून जर का मी पण त्यांच्या सुंदर कवितेचा गाभा(आशय नव्हे आणि ते गांभिर्य नव्हे)वापरून मी एखादी कविता लिहिली आणि माझ्या दृष्टीने मी त्याला “किंचीत विडंबन,क्वचित विडंबंन”असं म्हटलं तर त्यात “Vrudhhanchyavyathevaril sunder kavitevar, Vidamban mhatalyavar aadhich hasyaspad watal te….” ह्यात हास्यासपद काय आहे हो?
  जश्या वृद्धांच्या व्यथा असतात तश्या”Mulanchi ichha / aani kadhi kadhi vyatha ” असतात असं आपणही म्हणता.
  मी पण वृद्ध आहे.सगळ्यांच नसतील पण काही वृद्धांच्या व्यथा मला पण माहित असणे स्वाभाविक आहे असं तुम्हाला नाही का वाटत?.
  मला पण “मुलांच्या व्यथा ” माझ्या डोक्यातून लिहायला स्फुर्ती आली तर काय झालं.मी फक्त वृद्धांच्याच व्यथा लिहाव्या असं मल वाटत नाही.मग तसं म्हटलंतर तरूण कवयित्रीने “वृद्धांच्या व्यथा” कवितेत लिहून गांभिर्य आणावे तर मग वृद्ध कवीने “तरूणाची व्यथा” लिहिल्यास त्यात हास्यास्पद काय आहे?
  कविता कविता आहे.गांभिर्य आपल्या जागी असतं.
  एकदां जाहिर ब्लॉगवर जावून एखादी व्यक्ती कविता लिहू लागली की ती कविता सर्वांचीच होते नाही काय? एव्हडं खरं की ती कविता जशी त्या तशी copy करून कुणी स्वतःच्यानावावर post केली तर मात्र कुणीही चूक म्हणेल.पण जर का एकाद्दया कवितेचे “विडंबन” केले.(विडंबनाची व्याख्या ज्याची त्याची आहे.एकदा गंभिर विषयाचं विडंबन आपण हास्यास्पद म्हणता आणि दुसऱ्यांदा “श्रम घेवून ब्लॉग न मिळण्याच्या बाबीलाही तुमच्या दृष्टीने( खिल्ली करण्याला) ही विडंबनाचा प्रकार म्हणता.) तर काही गुन्हा होतो असं मला वाटत नाही.people have taken it sportingly.विडंबनासाठी मुळ कविता वापरली जावी हे ही त्या कवितेचे कौतुक नाही काय?
  This is not fair संजयजी.
  मिसेस.म्हापणकरांच्या ब्लॉगचे मी आणि माझी पत्नी पण वाचक आहो.आम्हाला ही त्यांच्या कविता वाचायला आवडतात. त्यांच्या कविता घरेलू, कौटुंबिक,आणि आईच्या प्रेमाबद्दल touchy असतात.
  मी पण आई वर बऱ्याच कविता लिहिल्या आहेत,येत्या ११ मेला Mother’s Day आहे.
  “आई तुझी आठवण येते….सबकुछ आई”हा माझा लेख त्यादरम्यान post करणार आहे तो आपण अवश्य वाचावा.
  shrikrishnasamant.wordpress.com ही माझी website आहे
  आणि google मधे “कृष्ण उवाच”असं मराठीत दिलं तर ही माझा ब्लॉग मिळतो.
  By the way,
  “Baraha.com”वर जावून “BarahaIME 1.0 ” हे सॉफ्टवेअर download केल्यास(ते मोफत आहे) direct मराठीतून लिहिता येईल.आपण phonetics चांगले लिहिता.आपल्याला ह्याबाबतीत काही सहाय्य लागल्यास मी अवश्य देईन.
  अर्थात आपल्याला इच्छा असल्यासच.कदाचीत आपल्याला सर्व माहित असूनही मराठीत लिहिण्याची इच्छा नसल्यास गोष्ट वेगळी.
  “मराठी(लिहिणारा)तितूका मिळवावा महाराष्ट्र धर्म राखावा” हीच इच्छा.
  आपला
  सामंत

 11. Amruta
  Posted फेब्रुवारी 23, 2010 at 4:28 सकाळी | Permalink

  Please send me the lyrics of Udyahi mala Office la jayala hava. Please. Thanks & Regards.
  Amruta.

 12. Posted फेब्रुवारी 23, 2010 at 8:24 pm | Permalink

  नमस्कार अमृता,
  मला आठवत नाही की ” उद्या मला ऑफिसला जायला हवं” ह्या विषयावर मी काही लिहिलं असेल असं.
  सामंत


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: