मग समजावे माझी प्रीती तुजवरती

जगणे कठीण झाले
ते तुझ्या कारणे झाले
दुःखाची आवड वाढली
मग समजावे प्रीती झाली

हळू हळू मन डुले
धुंदित अपुल्या ते बोले
नयनी काजळ जमले
मग समजावे प्रेम जहाले

रात्री नाचती गाती
तारे पावा वाजवीती
मेघ मस्तीने झुमती
मग समजावे झाली प्रीती

अकारणे कंगणे खणखणती
छ्न छ्न छन छन घुंघुर वाजती
प्याले नयनाचे खणखणती
मग समजावे माझी प्रीती तुजवरती

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

One Comment

  1. Rahul mahajan
    Posted ऑक्टोबर 13, 2010 at 1:41 सकाळी | Permalink

    hi


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: