आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…!

आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली!
“आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”
म्हणजेच,
 “अगं मी येते!, अरे मी येते! ”
असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”
तिच माऊली,
तिच मॉं,
तिच माय,
 म्हणजेच “my”- माय- माझी,
 MOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई.

नुसता “आई” हा शब्द्च पहाना,
पहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली.
दुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.
म्हणूनच ती “आई.”

आईचे गोडवे किती गावेत.आई बद्दल कुणी कुणी आणि किती किती लिहावं.किती कविता आहेत किती लेख असतील.तरीपण
 “मी पण आणखी लिहू कां?”
असे कुणाला नाही का  वाटणार?
आणि कुणीही कितीही लिहीलं तर ते पुरं पडत का?
पण आज Mother’s day असल्याने माझ्या आईची आठवण आल्याने थोड काही तरी आई विषयी लिहावसं मला वाटणं स्वाभावीक आहे.
आता,माझी आई हयात नसलेल्याना मला, कवी माधव ज्युलियनची ही कविता प्रकर्षाने जाणवते.
“प्रेम स्वरूप आई
वात्सल्य सिंधू आई
बोलावू तुज आता
मी कोणत्या उपायी
आई!”
असं लिहून झाल्यावर,
अण्णा (भालचंद्र ) पेंढारकरांचा “दीगू” गातो ते आठवतं,
“आई… तुझी, आ..ठ..व..ण येते
सुखद स्मृतींच्या कल्लोळानी
काळिज का जळते
आई काळिज का जळते”

असं म्हणून झाल्यावर कुणी म्हणतं,
 
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
किंवा कुणीतरी सवाल केला आहे,
“कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का?”

नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन)  मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं  म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज,
” बाळा,तुला लागलं का रे? ” असं सुद्धा विचारतं,
अशी जी दंतकथा आहे त्यातून पण माणुसकीचा परमोच्य असलेल्या आईचं वर्णन पराकोटीचं नव्हे काय?.
ती प्रेयसी-म्हणजेच पुढे होणारी तिच्या बाळाची “आई” – त्या मुलाची निघृण कृती पाहून,
“मी सांगितलं म्हणून माझ्यावर प्रेम दाखवायला खरंच एव्हडया पराकाष्टेला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा आणलं नव्हतं ”
असं म्हणून ती त्याला झिडकारते हा या दंतकथेचा पुढला भाग वेगळा म्हणा.

“मानव कुठले?देव देवताही
फुलती तुझ्याच पदरी
दुनियेत हा स्वर्ग असे
पायतळी तुझ्याच तो वसे

ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगं,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?”

असं मी माझ्या,
 “माझी सुंदर आई”
 ह्या कवितेत भारावून जाऊन लिहीलं ते आठवलं.
एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले,
 “खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं.
देव आहे हे आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवतं माझी आई सांगायची की,
 “देव खूपच सुंदर दिसतो”
असं सांगून भाऊसाहेब म्हणतात,
खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?”
पण त्या लहान बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की,
 “आई मी काही देवाला पाहिलं नाही पण खरं सांगू, तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस”
 हे सर्व भाऊसाहेबांकडून ऐकून मला एक हिंदी सिनेमातलं गाणं सुचलं.
” ओ मॉं! तेरी सुरतसे अगर,भगवान की सुरत क्या होगी”
आणि कविता सुचण्याअगोदर,असा सीन मी माझ्या डोळ्यासमोर आणला,
“लहान बाळाला आपल्या पदराखाली घेऊन, त्याला आई जेव्हा दुध पाजत असते, तो तिचा फुटलेला पान्हा मनोमनी पिणाऱ्या त्या बाळाचं लक्ष, तिच्या चेहऱ्याकडे केंद्रित झालेलं असतं, अशावेळी माझ्या मनात त्या बाळाच्या मनातले विचार येवून वाटलं की ते बाळ जणू आईला आठवण करून विचारतं,

” आई कोण हा देव? ज्याची तू नेहमी प्रशंसा करतेस?”
ह्यावर आई त्या बाळाला सांगते,
 “बाळा, तू त्याला पाहिलं नाहीस, आणि मी पण पाहिलं नाही रे!. पण माझ्यावर विश्वास ठेव.
आई गाण्याच्या दोन ओळीत सांगते,
“स्वरूप त्याचे किती मनोहर
रती मदनाहूनी किती तरी सुंदर”
 देव असा आहे असं म्हणतात.
आपल्या आईकडे टकमक पाहाणारं ते बाळ आईला म्हणतं,
”  नसेल पाहिले त्या देवाला जरी
परि पहाण्याची असे काय जरूरी
अगं,आई
कमलमुखी तू  सुंदर असता
रुप देवाचे कसे वेगळे ?”
                        
पृथ्वीला तिन फेऱ्या घालून पैजे साठी गेलेला श्रीगणेशाचा भाऊ, आणि आपल्या आईला तिन फेऱ्या घालून तोच उद्दयेश साध्य करणारा श्रीगणेश!, किती श्रद्धा आईवर त्या गणेशाची?.

“रक्तहि जेथे सूड साधते,तेथे कसली माया
कोण कुणाची बहिण भाऊ,पती पुत्र वा जाय़ा”

ही ह्या दोन ओळीत आईचीच व्यथा आहे. कारण सूड साधणारी आई होऊच शकत नाही, असं कवीला म्हणायचं आहे.
आईचे डोळे प्रत्येक प्रसंगात ओलेच झालेले दिसतात. ते आनंदाश्रु अथवा दुःखाश्रु असतात.त्या तिच्या नेत्राश्रुमधे अंतरातलं कारुण्य,तृप्ती आणि शाबासकीचे भाव असतात.
मूल जन्माला येताना आईला किती व्यथा होते.मुलाचा जन्म होईतो ती वेदनेने रडत असते. आणि जन्माला आल्यावर तिचं मुल रडतं.
रडताना ते मूल आईला जणू सांगत असतं,

” प्रथम पाहिले तुला मी रडताना
जन्म देऊनी भाग्यवान मला करताना
मी पण रडलो तुला पाहूनी
माझ्यासाठी तू कण्हताना

सुखदुःखाच्या तुझ्या अश्रूमधला
फरक मला कळेना
नेत्रात तुझ्या सदैव अश्रू असती
कारुण्याचे,तृप्तीचे अन शाबासकीचे ”
आणि नंतर मोठं झाल्यावर ते मूल नेहमीच म्हणतं,

“कधी दुःखाचे ऊन असे
कधी नैराश्याचा मेघ बरसे
हे कमलहस्त तुझ्या दुवांचे
सरसावती मम माथ्यावरती”
आणि पुर्ण मोठं, झाल्यावर तिच्या झालेल्या उपकाराची जाणीव म्हणून म्हणतं,
“असतां जवळी दुनियेची दौलत जरी
तुझ्यापुढे आम्हा त्याची काय जरुरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप विधात्याचे कसे वेगळे? ”

आंधळ्या आई बाबाना तहान लागल्याने आपला बाळ झऱ्यावरून पाणी आणतो आणि पाणी देताना आपल्याशी का बरं बोलत नाही? हे पाहून त्या श्रावणबाळाची आई त्याला अतिशय सद्गदीत होवून विचारते,

“बाळा तू असा आमच्याशी बोलत का नाहीस?आमची सेवा करताना तुला खूप कष्ट होतात का रे? ” दशरथ राजाला हे त्यांचे उद्गार ऐकून हुंदका दिल्याशिवाय राहवत नाही. आणि मग तो खरा प्रकार त्याना सांगतो,नंतर मुलाच्या दुःखाने ते मातापिता प्राण सोडतात.ह्या कथेवरून आईच्या प्रेमाचं महत्व कळतं.

अशी पण एक आईवर माझी कविता….

आई कुणा म्हणूनी
मी आईस हांक मारू?
येईल कां ती मज जवळी
ही ऐकुनी आर्त हांक

आई तुझ्या उच्चारात
“ब्रम्ह”दिसे मजसी
“आ” मधूनी दिसे ते आकाश
अन
“ई” मधूनी भासे तो ईश्वर

“आई”,”आई” असे म्हणूनी (मै आई)
येतेस तूं सदैव कामा
तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा
अन
तुझ्या त्यागाल नसे कसली तमा
तुझ्या ममतेला नसे कसली तुलना
अन
तुझ्या कर्तव्यापुढे न येई आड भावना

तूं जन्म देतेस थोराना
शूर आणि थोर
कधीही तुला विसरेना

आई,थोर तुझे उपकार
कुणी ते फेडू शकेल का?
ऐरावती वरचे रत्न देऊनी
कुबेरही ऋणमुक्त होईल का?

किंव येते त्या अभाग्यांची
नसे ज्याना ती माउली
दुर्भागी ते असती
नसे ज्याना तिची साउली

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी

                       

कचेरीत जाताना आई बाळाला आजीकडे ठेवून जाते,अशावेळी बाळाच्या मनातले विचार असे आहेत अशी मी कल्पना करून ह्या कवितेतून मांडले आहेत.

रविवारच्या दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
इतर दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी

मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
“नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी”

“पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू अशी अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी”    

प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले,
“आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया.
 मी म्हटलं, ”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात”
तसं काही नाही ,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय.
ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दुःखात अश्रु ढाळण्याची क्षमता दिली आहे.
शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस ेआपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो.
माणूस दूःखात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिलं आहे.आणि ते पण अपवादाने. एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दुःखात डोळ्यात अश्रू आणून आपल्या “पदरानें “पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल.
” भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला.”
“ओळखा पाहूं “
असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो. मला हंसताना पाहून  ते चटकन म्हणाले
“ओळखा पाहूं मला कोणत्या व्यक्ती बद्दल म्हणायचं आहे?”
मी पटकन म्हणालो,
 “अहो, माय माऊली आपली आई”

“तुम्हाला कसं पटकन कळलं ?”
त्यावर मी म्हणालो
“भाऊसाहेब.अशी आपल्याच पदरानें डोळे पुसणारी दुसरी कोणच व्यक्ती असूं शकत नाही.”
 “अगदी बरोबर “
प्रोफेसर म्हणाले.
 “लहानपणी बघा, मी विचारत असे माझ्या आईला”
“आई,मी तुला दुःख दिलं तरी तूं रडतेस,आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.असं का गं करतेस आई?”
 त्यावर ती फक्त हंसायची.
“हे काय गुढ आहे ते तुम्ही कवितेतून सांगा.”
यश आणि अपयश मिळालेलं पाहून आईचे डोळे ओले होतात.त्यावर मला खालील कविता सुचली.
 मुलगा आईला म्हणतो.

नको रडूं तूं आई
मी तुला दुःख देणार नाही.
कळत नाही मला
तुझ्या दुःखाचे कारण काही.

पाहिले प्रथम तुला रडताना
जेव्हां होऊन मी भाग्यवान
तूं घालीशी जन्मा मला
मी पण रडलो
तुला पाहुनी
माझ्यासाठी कण्हतानां

सुख दुःखाच्या अश्रू मधला
फरक मला कळेना
यशापयशाच्या प्राप्ती
मधला अर्थ जूळेना

काय चुकले माझ्याकडूनी
गोंधळतो मी तुला पाहूनी
पदराने डोळे पुसताना

कळले आता विचारांती
आईच्या अंतरी असते
अश्रूंची नेहमी भरती

जरी होई माझी
प्रगती अथवा अधोगती
नेत्रात तुझ्या सदैव
अश्रू भरून असती
कारुण्याचे अन त्रुप्तीचे

प्रत्येक व्यक्ति रोज स्नान करताना आपल्या पोटावरच्या नाभिकडे-बेंबीकडे- बघून आपल्या आईला म्हणत असावी,

“तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण
दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण
नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण
विसरून जाईन कधितरी तुझी आठवण
म्हणुनच ठेवली का गं आई!
ही माझ्या उदरावर कायमची खूण?”
                                      

“म्हणून आयुष्यातली एखादी घडी आपल्या आईसाठी ,तिच्या सन्मानासाठी ,कौतुकासाठी अधून मधून असू दे.या जगातील इतर कोणतीही व्यक्ती आईची जागा घेवू शकत नाही.
 स्वतःवर जितके प्रेम करतो त्याहूनही अधीक प्रेम तिच्यावर करूया.
कारण आई शिवाय जीवन निरर्थक आहे.”

    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
     shrikrishnas@gmail.com

               

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

73 Comments

 1. Atul
  Posted मे 18, 2009 at 11:55 pm | Permalink

  great……Excellant !!!!!
  kharach khup chan blog lihila aahe…….kharach dolyat pani yete ekdam…….
  tumache manapasun aabhar ani kautuk….
  Thank You……

 2. Arpita S.Chaudhari
  Posted जून 9, 2009 at 3:15 सकाळी | Permalink

  tumcha ha lekh mala khup bhavala.vachatana ashru anavar zale karan hota ki aaichi khup athvan aali.vatala aata jaun tila mithi maravi ani sangava ki aai,maz shiksan purna zalavar, motha kahi tari(CA)banaychay,aani jagala sangaych aahe ki he fakta me tuza mulech me banu shakale. karan yash ani apayashat tinech mala sath dili.me pass zalavar kiva fail zalavar ashru ani anandashru tichach dolyat aale.

 3. Posted जून 9, 2009 at 9:37 सकाळी | Permalink

  हलो अर्पिता,
  तुझी प्रतिक्रिया वाचून माझ्या ही डोळ्यात पाणी आलं.माझी तर आई हयात नाही. तरी तुझी आई मला माझ्या आई सारखीच आहे.नव्हे तर प्रत्येक आई अशीच असते.
  माणसाने ताजमहाल बनवले,पिरॅमिड्स बनवले आणखी काही नाविन्य तयार केली पण देवाने आईला
  बनवलं तसं तयार करणं माणसाला अशक्यही आहे आणि असंभवनीयही आहे.
  म्हणून आपली आई आपल्याबरोबर असे तोपर्यंत तिला सुखात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण सदैव असलं पाहिजे.
  ज्या ज्या वेळी तुला आईबद्दल विशेष वाटतं त्या त्या
  वेळेला तुला आई दिसली की तिला कडकडून भेट.
  कारण ती भेट तिच्या उपकाराची निशःब्द पावती आहे.

  तू नक्कीच CA होशील.माझ्या तुला शुभेच्छा आहेत.
  आणि तसं झाल्यावर आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू जरूर पाहून माझी आठवण काढ.
  तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
  श्रीकृष्ण सामंत.

  • nandakishor p.kadu
   Posted जुलै 11, 2009 at 4:36 सकाळी | Permalink

   आई,थोर तुझे उपकार
   कुणी ते फेडू शकेल का?
   ऐरावती वरचे रत्न देऊनी
   कुबेरही ऋणमुक्त होईल का?

   किंव येते त्या अभाग्यांची
   नसे ज्याना ती माउली
   दुर्भागी ते असती
   नसे ज्याना तिची साउली

   स्वामी तिन्ही जगाचा
   आईविना भिकारी

   form.nandakishor.kadu

  • Somnath R Mahale
   Posted मे 4, 2019 at 12:56 सकाळी | Permalink

   Mazi Aai Jaun Aaj 14 Varsh Zalit Pratyek divas Aai sathi mi zurat Asto.Mazya Rktatlya Prtyek Thembat Tiche Sanskar Ot prot bharle Aahet .Mi Aaila Khup miss Karto.Sukha pasun mi koso Dur Aahe.Aaj Mazi Mala Havi Aahe.

 4. Posted जून 29, 2009 at 12:01 सकाळी | Permalink

  aai

 5. Posted जून 29, 2009 at 12:12 pm | Permalink

  नमस्कार विजय
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 6. aboli
  Posted जून 29, 2009 at 10:53 pm | Permalink

  he vachun mala hi watal ki mazi aai asti tar mi pan gagywan asli asti
  thanks………………….

 7. Posted जून 30, 2009 at 8:00 सकाळी | Permalink

  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 8. Posted सप्टेंबर 10, 2009 at 12:59 सकाळी | Permalink

  khup chan mala khup aavdali tuji kavita.

 9. Posted ऑक्टोबर 8, 2009 at 7:00 सकाळी | Permalink

  ser I know english knowleg

  akdm changl ahe wachun far aannd jala

 10. Posted ऑक्टोबर 10, 2009 at 5:55 सकाळी | Permalink

  mom always sweetiest person in the world

  • Posted ऑक्टोबर 10, 2009 at 9:42 सकाळी | Permalink

   नितेश नमस्कार,
   आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
   सामंत

 11. Posted ऑक्टोबर 27, 2009 at 12:58 सकाळी | Permalink

  SIR,Aapla ‘Aaibabatcha lekh’ khup mhanje khupach awadla.Ha lekh wachtana dolyatel ashru thambavne kathin gele.

 12. Posted ऑक्टोबर 27, 2009 at 1:07 सकाळी | Permalink

  SIR, Mazhi aai majhyapasun khup lamb aaste. me mumbaila aaste aani ti punyala aste.Ha lekh wachtana asse watle ki aata jave aani tila kadkadun bhetave.

 13. Posted ऑक्टोबर 27, 2009 at 11:56 सकाळी | Permalink

  नमस्कार रेशम,
  मला वाटतं आपण वेळात वेळ काडून आपल्या आईला भेटायला अवश्य जावं तिलाही खूप आनंद होईल.
  मुंबई पुणं काही एव्हडं लांब नाही.आईला भेटायला श्रीगणेशाने पृथ्वीला तिन फेर्‍या घातल्या होत्याच ना?

 14. sagarkobal
  Posted नोव्हेंबर 14, 2009 at 12:06 सकाळी | Permalink

  sagar kobal

 15. Dinesh
  Posted मार्च 26, 2010 at 12:26 सकाळी | Permalink

  hi chan lekh aheeeeeeeee mala khup avdlaaaaaaaaaaa

 16. Prachi
  Posted जुलै 19, 2010 at 2:11 सकाळी | Permalink

  Khupach chan lekh. Vachtana Dolyat pani alyashivay rahat nahi.
  Aaplya aai la kadhich dukhau naye Tich aple Jivan Ghadvate tila Visruch naye. I Love My Mom..!

 17. Posted जुलै 19, 2010 at 5:21 pm | Permalink

  Prachi,
  so do I.

 18. विकी करडे
  Posted जुलै 28, 2010 at 4:02 सकाळी | Permalink

  THIS IS AN EXCELLENT POEM EVER.THANX

 19. Shilpa
  Posted ऑगस्ट 2, 2010 at 11:16 pm | Permalink

  Khupach sundar Blog lihila aahe.. me khup divsanpasun aai wishai matter search karat hote tichya janma divsala pathvaisathi.. Ithe tar pratkshya aaiche darshan zale.. dhanyawad.. Khup khup shubhechhya

  • Posted ऑगस्ट 5, 2010 at 10:32 सकाळी | Permalink

   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
   आपल्या आईच्या जन्मदिवशी आमच्या पण त्यांना शुभेच्छा सांगा

 20. rajshri
  Posted ऑगस्ट 6, 2010 at 1:58 सकाळी | Permalink

  kharach khup sundar lihal tumhi amcha aai vishai kas rahav te te ata amhala samjal thank you very very much…..aai aplayawar kiti maya karte he kunich sangu shakat nahi,pan……..aai che upkar amhi kadhich bhednar nahit…….thanks

  • Posted ऑगस्ट 7, 2010 at 9:21 सकाळी | Permalink

   नमस्कार राजश्री,
   आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 21. Posted ऑगस्ट 11, 2010 at 1:42 सकाळी | Permalink

  MI HA BLOG VACHALYANANTHER MAZE DOLE BHARUN ALE.HA LEKH MI KADHI VISARNAR NAHI.THANK

  • Posted ऑगस्ट 12, 2010 at 4:35 pm | Permalink

   आपल्याला हा पोस्ट आवडला हे वाचून बरं वाटलं.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 22. prasad pansare
  Posted ऑगस्ट 18, 2010 at 5:40 सकाळी | Permalink

  aai ek antkaranatu utsfurtpane nighanare nav. aj amhala aaich nako karan amhi sudharlo, amhi pragati keli nemke kay ti paha. nav mhine garbhatil sambhal amhi visarlo mhane amhi sudharlo. jave tyacha vavnsha tavhan kale, tya sathi aai vhave lagel.

  • Posted ऑगस्ट 18, 2010 at 5:57 pm | Permalink

   अगदी शंभर टक्के मी सहमत आहे.
   प्रतिक्रियेबद्दल आभार.

 23. viju laxman sonawane
  Posted ऑगस्ट 27, 2010 at 4:44 सकाळी | Permalink

  kharach khupach chan!tumche manpurvak abhar!

 24. Prasad Joshi
  Posted सप्टेंबर 12, 2010 at 11:48 pm | Permalink

  mala aai vishaye bharpur vachayache ahe male pl mail kara,
  mala ha lekh far avadala ahe taer mala mail kara

  • Posted सप्टेंबर 13, 2010 at 9:34 सकाळी | Permalink

   नमस्कार,
   माझ्या ह्या ब्लॉगवर आपल्याला आईविषयी खूप काही वाचायला मिळेल.
   categories मधे
   “आई विषयी”
   “कविता”
   “कवितेतून विचार”
   ह्या मधून आईविषयी नक्कीच वाचायला मिळेल.अधिक माझ्या ह्या ब्लॉगवरच्या बर्‍याच अशा पोस्टवर आईविषयी लिहिलेले पहाल.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 25. Posted सप्टेंबर 17, 2010 at 1:23 सकाळी | Permalink

  sir,
  aaie hi kiti thor aste……..
  mazya aaie madhe mala pramukhyane devch disato.
  aani sarwanach kadacit to disesel ase mala vatat nahi.
  karan aaila tras denare,shivi denarehi lok mala khup distat
  sir tumcha lekh kaljala bhidnara aahe

  • Posted सप्टेंबर 17, 2010 at 7:44 pm | Permalink

   नमस्कार अमोल,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माझा लेख आवडल्याबद्दल आभार.

   आपण म्हणता,
   “karan aaila tras denare,shivi denarehi lok mala khup distat”
   खरं सांगू का,
   “ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता”
   ह्या गाण्यात पं.हृदयनाथ मंगेशकर म्हणतात,

   “अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
   खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता”

   आईला त्रास देणार्‍या आणि शीवी देणार्‍या महाभागाना,
   “कंदील एकटा होता.” हे जाणवल्यावर,
   आईला त्रास देऊन आणि शीवी देऊनही “बाळ” म्हणून हक्काने आणि अधिकाराने, हांक मारणारं आता या जगी कुणीही नाही,हे जाणवल्याशिवाय कसं रहावेल?

 26. trupti
  Posted ऑक्टोबर 9, 2010 at 4:50 सकाळी | Permalink

  Hi I like this poem.really mummy is the nice in the whole world.

  • Posted ऑक्टोबर 9, 2010 at 8:23 सकाळी | Permalink

   मी सहमत आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार .

 27. Posted जानेवारी 12, 2011 at 2:17 सकाळी | Permalink

  thise topic is very very beautifull.
  i like this topic
  thank yoy… thank you…. thank you…..

  My good thought.
  one good mother is batter than hundred teachers.

  thanks writer..

  MARATHI

  Me ha lakh vachala ani maza Dil(ruday) yala chadun gala.
  ha lakh ekday tira sarkha vatala.

  this lakh is batter batter batter
  101% avadala….
  ok

  • Posted जानेवारी 13, 2011 at 7:57 pm | Permalink

   आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाट्लं.बद्दल आभार.

 28. snehal
  Posted फेब्रुवारी 10, 2011 at 12:10 सकाळी | Permalink

  AAi mhanje kya,
  lagdycha pay, vasrachi gaay, dudhavarchi saay……..
  mhanje AAi
  janmadati….
  viswrupini…

  • Posted फेब्रुवारी 10, 2011 at 6:30 pm | Permalink

   शंभर टक्के मी आपल्या म्हणण्याशी सहमत आह.
   आपल्या प्रतिक्रि्येबद्दल आभार

 29. Posted मे 19, 2011 at 11:41 pm | Permalink

  mazya aai var me khup prem karte.mazi aai dusryanche gharkam karun amha char bhavandana shikvat ahe tila vatate mazya mulani khup shikav mote houn kahitari banav.mala CA banayach ahe.khup kashat karte mazi aai.ek divas me ME CA banarch.

  I LOVE MY AAI

  • Posted मे 22, 2011 at 6:48 pm | Permalink

   नमस्कार सोनल
   तुझी आई ग्रेट आहे.देवाला सगळीकडे जायला वेळ नसतो म्हणूनच त्याने आईला निर्माण केली आहे असं कुणी तरी म्हटल्याचं मला आठवतं.तुम्ही सर्व भावंडानी तुमच्या आईच्या इच्छा पूर्ण करा.सोनल,तू नक्कीच CA होणार.माझे तुला आशीर्वाद आहेत आणि शुभेच्छा आहेत.

 30. H K MANE
  Posted जुलै 23, 2011 at 11:27 सकाळी | Permalink

  ———————-
  —————————
  ——————————-
  ————————————
  ————————————–
  SARSWATI KASYASATHI

 31. H K MANE
  Posted जुलै 23, 2011 at 11:29 सकाळी | Permalink

  ———————-
  —————————
  ——————————-
  ————————————
  ————————————–
  SARSWATI — KASYASATHI

 32. Posted ऑगस्ट 25, 2011 at 4:03 सकाळी | Permalink

  khupch chhan…..
  aaichi aathvan yet nahi asa divas nahi jat..
  pan aaj dole bharun aale…

  • Posted ऑगस्ट 25, 2011 at 10:17 सकाळी | Permalink

   नमस्कार,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 33. varsha
  Posted सप्टेंबर 15, 2011 at 10:48 pm | Permalink

  me mazya aai var khup prem karte. maji aai gavala rahte ek hi Sahn asa nahi ki tiji aatvan yet nahi. AAi Vina Jagan Ashay Hote mala. aai ne majya sathi khup kasht kelet mala majya aai che nav mote karayche ahe.I Love AAI I Love AAI

  • Posted सप्टेंबर 16, 2011 at 5:57 pm | Permalink

   वर्षा,
   तू तुझ्या आईचं नाव जरूर मोठं कर.माझ्या तुला शुभेच्छा आहेत.

 34. Posted सप्टेंबर 28, 2011 at 2:03 pm | Permalink

  Aai manje kay

  langdyacha pay
  vasrachi gay
  dudhavarchi say

  Aai manje

  A : Aadi
  I :ishwar

 35. Ramraj
  Posted एप्रिल 17, 2012 at 1:56 सकाळी | Permalink

  आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
  मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली!
  “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”
  म्हणजेच,
  ”अगं मी येते!, अरे मी येते! “
  असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”
  तिच माऊली,
  तिच मॉं,
  तिच माय,
  म्हणजेच “my”- माय- माझी,
  MOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई.

  नुसता “आई” हा शब्द्च पहाना,
  पहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली.
  दुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.
  म्हणूनच ती “आई.”

  आईचे गोडवे किती गावेत.आई बद्दल कुणी कुणी आणि किती किती लिहावं.किती कविता आहेत किती लेख असतील.तरीपण
  ”मी पण आणखी लिहू कां?”
  असे कुणाला नाही का वाटणार?
  आणि कुणीही कितीही लिहीलं तर ते पुरं पडत का?
  पण आज Mother’s day असल्याने माझ्या आईची आठवण आल्याने थोड काही तरी आई विषयी लिहावसं मला वाटणं स्वाभावीक आहे.
  आता,माझी आई हयात नसलेल्याना मला, कवी माधव ज्युलियनची ही कविता प्रकर्षाने जाणवते.
  “प्रेम स्वरूप आई
  वात्सल्य सिंधू आई
  बोलावू तुज आता
  मी कोणत्या उपायी
  आई!”
  असं लिहून झाल्यावर,
  अण्णा (भालचंद्र ) पेंढारकरांचा “दीगू” गातो ते आठवतं,
  “आई… तुझी, आ..ठ..व..ण येते
  सुखद स्मृतींच्या कल्लोळानी
  काळिज का जळते
  आई काळिज का जळते”

  असं म्हणून झाल्यावर कुणी म्हणतं,

  “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
  किंवा कुणीतरी सवाल केला आहे,
  “कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का?”

  नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज,
  ” बाळा,तुला लागलं का रे? ” असं सुद्धा विचारतं,
  अशी जी दंतकथा आहे त्यातून पण माणुसकीचा परमोच्य असलेल्या आईचं वर्णन पराकोटीचं नव्हे काय?.
  ती प्रेयसी-म्हणजेच पुढे होणारी तिच्या बाळाची “आई” – त्या मुलाची निघृण कृती पाहून,
  “मी सांगितलं म्हणून माझ्यावर प्रेम दाखवायला खरंच एव्हडया पराकाष्टेला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा आणलं नव्हतं “
  असं म्हणून ती त्याला झिडकारते हा या दंतकथेचा पुढला भाग वेगळा म्हणा.

  “मानव कुठले?देव देवताही
  फुलती तुझ्याच पदरी
  दुनियेत हा स्वर्ग असे
  पायतळी तुझ्याच तो वसे

  ममतेने भरती नयन जिचे
  देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
  अगं,आई
  कमलमुखी तूं सुंदर असतां
  रुप “देवाचे “कसे वेगळे?”

  असं मी माझ्या,
  ”माझी सुंदर आई”
  ह्या कवितेत भारावून जाऊन लिहीलं ते आठवलं.
  एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले,
  ”खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं.
  देव आहे हे आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवतं माझी आई सांगायची की,
  ”देव खूपच सुंदर दिसतो”
  असं सांगून भाऊसाहेब म्हणतात,
  खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?”
  पण त्या लहान बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की,
  ”आई मी काही देवाला पाहिलं नाही पण खरं सांगू, तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस”
  हे सर्व भाऊसाहेबांकडून ऐकून मला एक हिंदी सिनेमातलं गाणं सुचलं.
  ” ओ मॉं! तेरी सुरतसे अगर,भगवान की सुरत क्या होगी”
  आणि कविता सुचण्याअगोदर,असा सीन मी माझ्या डोळ्यासमोर आणला,
  “लहान बाळाला आपल्या पदराखाली घेऊन, त्याला आई जेव्हा दुध पाजत असते, तो तिचा फुटलेला पान्हा मनोमनी पिणाऱ्या त्या बाळाचं लक्ष, तिच्या चेहऱ्याकडे केंद्रित झालेलं असतं, अशावेळी माझ्या मनात त्या बाळाच्या मनातले विचार येवून वाटलं की ते बाळ जणू आईला आठवण करून विचारतं,

  ” आई कोण हा देव? ज्याची तू नेहमी प्रशंसा करतेस?”
  ह्यावर आई त्या बाळाला सांगते,
  ”बाळा, तू त्याला पाहिलं नाहीस, आणि मी पण पाहिलं नाही रे!. पण माझ्यावर विश्वास ठेव.
  आई गाण्याच्या दोन ओळीत सांगते,
  “स्वरूप त्याचे किती मनोहर
  रती मदनाहूनी किती तरी सुंदर”
  देव असा आहे असं म्हणतात.
  आपल्या आईकडे टकमक पाहाणारं ते बाळ आईला म्हणतं,
  “ नसेल पाहिले त्या देवाला जरी
  परि पहाण्याची असे काय जरूरी
  अगं,आई
  कमलमुखी तू सुंदर असता
  रुप देवाचे कसे वेगळे ?”

  पृथ्वीला तिन फेऱ्या घालून पैजे साठी गेलेला श्रीगणेशाचा भाऊ, आणि आपल्या आईला तिन फेऱ्या घालून तोच उद्दयेश साध्य करणारा श्रीगणेश!, किती श्रद्धा आईवर त्या गणेशाची?.

  “रक्तहि जेथे सूड साधते,तेथे कसली माया
  कोण कुणाची बहिण भाऊ,पती पुत्र वा जाय़ा”

  ही ह्या दोन ओळीत आईचीच व्यथा आहे. कारण सूड साधणारी आई होऊच शकत नाही, असं कवीला म्हणायचं आहे.
  आईचे डोळे प्रत्येक प्रसंगात ओलेच झालेले दिसतात. ते आनंदाश्रु अथवा दुःखाश्रु असतात.त्या तिच्या नेत्राश्रुमधे अंतरातलं कारुण्य,तृप्ती आणि शाबासकीचे भाव असतात.
  मूल जन्माला येताना आईला किती व्यथा होते.मुलाचा जन्म होईतो ती वेदनेने रडत असते. आणि जन्माला आल्यावर तिचं मुल रडतं.
  रडताना ते मूल आईला जणू सांगत असतं,

  ” प्रथम पाहिले तुला मी रडताना
  जन्म देऊनी भाग्यवान मला करताना
  मी पण रडलो तुला पाहूनी
  माझ्यासाठी तू कण्हताना

  सुखदुःखाच्या तुझ्या अश्रूमधला
  फरक मला कळेना
  नेत्रात तुझ्या सदैव अश्रू असती
  कारुण्याचे,तृप्तीचे अन शाबासकीचे “
  आणि नंतर मोठं झाल्यावर ते मूल नेहमीच म्हणतं,

  “कधी दुःखाचे ऊन असे
  कधी नैराश्याचा मेघ बरसे
  हे कमलहस्त तुझ्या दुवांचे
  सरसावती मम माथ्यावरती”
  आणि पुर्ण मोठं, झाल्यावर तिच्या झालेल्या उपकाराची जाणीव म्हणून म्हणतं,
  “असतां जवळी दुनियेची दौलत जरी
  तुझ्यापुढे आम्हा त्याची काय जरुरी
  अगं,आई
  कमलमुखी तू सुंदर असता
  रुप विधात्याचे कसे वेगळे? “

  आंधळ्या आई बाबाना तहान लागल्याने आपला बाळ झऱ्यावरून पाणी आणतो आणि पाणी देताना आपल्याशी का बरं बोलत नाही? हे पाहून त्या श्रावणबाळाची आई त्याला अतिशय सद्गदीत होवून विचारते,

  “बाळा तू असा आमच्याशी बोलत का नाहीस?आमची सेवा करताना तुला खूप कष्ट होतात का रे? ” दशरथ राजाला हे त्यांचे उद्गार ऐकून हुंदका दिल्याशिवाय राहवत नाही. आणि मग तो खरा प्रकार त्याना सांगतो,नंतर मुलाच्या दुःखाने ते मातापिता प्राण सोडतात.ह्या कथेवरून आईच्या प्रेमाचं महत्व कळतं.

  अशी पण एक आईवर माझी कविता….

  आई कुणा म्हणूनी
  मी आईस हांक मारू?
  येईल कां ती मज जवळी
  ही ऐकुनी आर्त हांक

  आई तुझ्या उच्चारात
  “ब्रम्ह”दिसे मजसी
  “आ” मधूनी दिसे ते आकाश
  अन
  “ई” मधूनी भासे तो ईश्वर

  “आई”,”आई” असे म्हणूनी (मै आई)
  येतेस तूं सदैव कामा
  तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा
  अन
  तुझ्या त्यागाल नसे कसली तमा
  तुझ्या ममतेला नसे कसली तुलना
  अन
  तुझ्या कर्तव्यापुढे न येई आड भावना

  तूं जन्म देतेस थोराना
  शूर आणि थोर
  कधीही तुला विसरेना

  आई,थोर तुझे उपकार
  कुणी ते फेडू शकेल का?
  ऐरावती वरचे रत्न देऊनी
  कुबेरही ऋणमुक्त होईल का?

  किंव येते त्या अभाग्यांची
  नसे ज्याना ती माउली
  दुर्भागी ते असती
  नसे ज्याना तिची साउली

  स्वामी तिन्ही जगाचा
  आईविना भिकारी

  कचेरीत जाताना आई बाळाला आजीकडे ठेवून जाते,अशावेळी बाळाच्या मनातले विचार असे आहेत अशी मी कल्पना करून ह्या कवितेतून मांडले आहेत.

  रविवारच्या दिवशी
  चिमुकली तनुली
  आईला म्हणाली
  इतर दिवशी
  असता मी सकाळी उठलेली
  पाहुन तुला घरात नसलेली
  होई मी किंचीत अळकुळी

  मग
  घेई मज आज्जी जवळी
  पाहुनी माझ्या डोळी
  म्हणे मला ती
  “नको होवू तू अळकुळी
  तुजसम तुझी आई असता
  अशीच घेही मी पण
  जवळी तिला त्यावेळी
  पण जवळी असे मी
  तिच्या वेळी अवेळी”

  “पक्षिण उडे आकाशी
  परी लक्ष असे पिल्लाशी
  आहे ना मी तुझ्या जवळी
  मग का होतेस तू अशी अळकुळी
  येइल तुझी आई संध्याकाळी”

  प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले,
  “आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया.
  मी म्हटलं, ”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात”
  तसं काही नाही ,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय.
  ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दुःखात अश्रु ढाळण्याची क्षमता दिली आहे.
  शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस ेआपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो.
  माणूस दूःखात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिलं आहे.आणि ते पण अपवादाने. एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दुःखात डोळ्यात अश्रू आणून आपल्या “पदरानें “पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल.
  ” भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला.”
  “ओळखा पाहूं “
  असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो. मला हंसताना पाहून ते चटकन म्हणाले
  “ओळखा पाहूं मला कोणत्या व्यक्ती बद्दल म्हणायचं आहे?”
  मी पटकन म्हणालो,
  “अहो, माय माऊली आपली आई”

  “तुम्हाला कसं पटकन कळलं ?”
  त्यावर मी म्हणालो
  “भाऊसाहेब.अशी आपल्याच पदरानें डोळे पुसणारी दुसरी कोणच व्यक्ती असूं शकत नाही.”
  “अगदी बरोबर “
  प्रोफेसर म्हणाले.
  “लहानपणी बघा, मी विचारत असे माझ्या आईला”
  “आई,मी तुला दुःख दिलं तरी तूं रडतेस,आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.असं का गं करतेस आई?”
  त्यावर ती फक्त हंसायची.
  “हे काय गुढ आहे ते तुम्ही कवितेतून सांगा.”
  यश आणि अपयश मिळालेलं पाहून आईचे डोळे ओले होतात.त्यावर मला खालील कविता सुचली.
  मुलगा आईला म्हणतो.

  नको रडूं तूं आई
  मी तुला दुःख देणार नाही.
  कळत नाही मला
  तुझ्या दुःखाचे कारण काही.

  पाहिले प्रथम तुला रडताना
  जेव्हां होऊन मी भाग्यवान
  तूं घालीशी जन्मा मला
  मी पण रडलो
  तुला पाहुनी
  माझ्यासाठी कण्हतानां

  सुख दुःखाच्या अश्रू मधला
  फरक मला कळेना
  यशापयशाच्या प्राप्ती
  मधला अर्थ जूळेना

  काय चुकले माझ्याकडूनी
  गोंधळतो मी तुला पाहूनी
  पदराने डोळे पुसताना

  कळले आता विचारांती
  आईच्या अंतरी असते
  अश्रूंची नेहमी भरती

  जरी होई माझी
  प्रगती अथवा अधोगती
  नेत्रात तुझ्या सदैव
  अश्रू भरून असती
  कारुण्याचे अन त्रुप्तीचे

  प्रत्येक व्यक्ति रोज स्नान करताना आपल्या पोटावरच्या नाभिकडे-बेंबीकडे- बघून आपल्या आईला म्हणत असावी,

  “तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण
  दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण
  नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण
  विसरून जाईन कधितरी तुझी आठवण
  म्हणुनच ठेवली का गं आई!
  ही माझ्या उदरावर कायमची खूण?”

  “म्हणून आयुष्यातली एखादी घडी आपल्या आईसाठी ,तिच्या सन्मानासाठी ,कौतुकासाठी अधून मधून असू दे.या जगातील इतर कोणतीही व्यक्ती आईची जागा घेवू शकत नाही.
  स्वतःवर जितके प्रेम करतो त्याहूनही अधीक प्रेम तिच्यावर करूया.
  कारण आई शिवाय जीवन निरर्थक आहे.”

 36. nutan
  Posted मे 13, 2012 at 8:49 सकाळी | Permalink

  Aapan lihilela lekh khup chan ahe. manala khup bhavala!mazi aai mazyasathi prernashtan ahe. me 2012 march madhe 10th chi pariksha deli aaine mala ethparyant khup chan sath deli ani yapudhehi ti mala ashiche sath deil.:)

 37. Posted जून 3, 2012 at 11:13 pm | Permalink

  अप्रतिम…..

 38. Posted ऑक्टोबर 1, 2012 at 6:30 सकाळी | Permalink
  आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच, ”अगं मी येते!, अरे मी येते! “ असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई” तिच माऊली, तिच मॉं, तिच माय, म्हणजेच “my”- माय- माझी, MOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई. नुसता “आई” हा शब्द्च पहाना, पहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली. दुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य. म्हणूनच ती “आई.” आईचे गोडवे किती गावेत.आई बद्दल कुणी कुणी आणि किती किती लिहावं.किती कविता आहेत किती लेख असतील.तरीपण ”मी पण आणखी लिहू कां?” असे कुणाला नाही का वाटणार? आणि कुणीही कितीही लिहीलं तर ते पुरं पडत का? पण आज Mother’s day असल्याने माझ्या आईची आठवण आल्याने थोड काही तरी आई विषयी लिहावसं मला वाटणं स्वाभावीक आहे. आता,माझी आई हयात नसलेल्याना मला, कवी माधव ज्युलियनची ही कविता प्रकर्षाने जाणवते. “प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी आई!” असं लिहून झाल्यावर, अण्णा (भालचंद्र ) पेंढारकरांचा “दीगू” गातो ते आठवतं, “आई… तुझी, आ..ठ..व..ण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळिज का जळते आई काळिज का जळते” असं म्हणून झाल्यावर कुणी म्हणतं, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” किंवा कुणीतरी सवाल केला आहे, “कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का?” नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज, ” बाळा,तुला लागलं का रे? ” असं सुद्धा विचारतं, अशी जी दंतकथा आहे त्यातून पण माणुसकीचा परमोच्य असलेल्या आईचं वर्णन पराकोटीचं नव्हे काय?. ती प्रेयसी-म्हणजेच पुढे होणारी तिच्या बाळाची “आई” – त्या मुलाची निघृण कृती पाहून, “मी सांगितलं म्हणून माझ्यावर प्रेम दाखवायला खरंच एव्हडया पराकाष्टेला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा आणलं नव्हतं “ असं म्हणून ती त्याला झिडकारते हा या दंतकथेचा पुढला भाग वेगळा म्हणा. “मानव कुठले?देव देवताही फुलती तुझ्याच पदरी दुनियेत हा स्वर्ग असे पायतळी तुझ्याच तो वसे ममतेने भरती नयन जिचे देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी? अगं,आई कमलमुखी तूं सुंदर असतां रुप “देवाचे “कसे वेगळे?” असं मी माझ्या, ”माझी सुंदर आई” ह्या कवितेत भारावून जाऊन लिहीलं ते आठवलं. एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले, ”खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं. देव आहे हे आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवतं माझी आई सांगायची की, ”देव खूपच सुंदर दिसतो” असं सांगून भाऊसाहेब म्हणतात, खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?” पण त्या लहान बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की, ”आई मी काही देवाला पाहिलं नाही पण खरं सांगू, तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस” हे सर्व भाऊसाहेबांकडून ऐकून मला एक हिंदी सिनेमातलं गाणं सुचलं. ” ओ मॉं! तेरी सुरतसे अगर,भगवान की सुरत क्या होगी” आणि कविता सुचण्याअगोदर,असा सीन मी माझ्या डोळ्यासमोर आणला, “लहान बाळाला आपल्या पदराखाली घेऊन, त्याला आई जेव्हा दुध पाजत असते, तो तिचा फुटलेला पान्हा मनोमनी पिणाऱ्या त्या बाळाचं लक्ष, तिच्या चेहऱ्याकडे केंद्रित झालेलं असतं, अशावेळी माझ्या मनात त्या बाळाच्या मनातले विचार येवून वाटलं की ते बाळ जणू आईला आठवण करून विचारतं, ” आई कोण हा देव? ज्याची तू नेहमी प्रशंसा करतेस?” ह्यावर आई त्या बाळाला सांगते, ”बाळा, तू त्याला पाहिलं नाहीस, आणि मी पण पाहिलं नाही रे!. पण माझ्यावर विश्वास ठेव. आई गाण्याच्या दोन ओळीत सांगते, “स्वरूप त्याचे किती मनोहर रती मदनाहूनी किती तरी सुंदर” देव असा आहे असं म्हणतात. आपल्या आईकडे टकमक पाहाणारं ते बाळ आईला म्हणतं, “ नसेल पाहिले त्या देवाला जरी परि पहाण्याची असे काय जरूरी अगं,आई कमलमुखी तू सुंदर असता रुप देवाचे कसे वेगळे ?” पृथ्वीला तिन फेऱ्या घालून पैजे साठी गेलेला श्रीगणेशाचा भाऊ, आणि आपल्या आईला तिन फेऱ्या घालून तोच उद्दयेश साध्य करणारा श्रीगणेश!, किती श्रद्धा आईवर त्या गणेशाची?. “रक्तहि जेथे सूड साधते,तेथे कसली माया कोण कुणाची बहिण भाऊ,पती पुत्र वा जाय़ा” ही ह्या दोन ओळीत आईचीच व्यथा आहे. कारण सूड साधणारी आई होऊच शकत नाही, असं कवीला म्हणायचं आहे. आईचे डोळे प्रत्येक प्रसंगात ओलेच झालेले दिसतात. ते आनंदाश्रु अथवा दुःखाश्रु असतात.त्या तिच्या नेत्राश्रुमधे अंतरातलं कारुण्य,तृप्ती आणि शाबासकीचे भाव असतात. मूल जन्माला येताना आईला किती व्यथा होते.मुलाचा जन्म होईतो ती वेदनेने रडत असते. आणि जन्माला आल्यावर तिचं मुल रडतं. रडताना ते मूल आईला जणू सांगत असतं, ” प्रथम पाहिले तुला मी रडताना जन्म देऊनी भाग्यवान मला करताना मी पण रडलो तुला पाहूनी माझ्यासाठी तू कण्हताना सुखदुःखाच्या तुझ्या अश्रूमधला फरक मला कळेना नेत्रात तुझ्या सदैव अश्रू असती कारुण्याचे,तृप्तीचे अन शाबासकीचे “ आणि नंतर मोठं झाल्यावर ते मूल नेहमीच म्हणतं, “कधी दुःखाचे ऊन असे कधी नैराश्याचा मेघ बरसे हे कमलहस्त तुझ्या दुवांचे सरसावती मम माथ्यावरती” आणि पुर्ण मोठं, झाल्यावर तिच्या झालेल्या उपकाराची जाणीव म्हणून म्हणतं, “असतां जवळी दुनियेची दौलत जरी तुझ्यापुढे आम्हा त्याची काय जरुरी अगं,आई कमलमुखी तू सुंदर असता रुप विधात्याचे कसे वेगळे? “ आंधळ्या आई बाबाना तहान लागल्याने आपला बाळ झऱ्यावरून पाणी आणतो आणि पाणी देताना आपल्याशी का बरं बोलत नाही? हे पाहून त्या श्रावणबाळाची आई त्याला अतिशय सद्गदीत होवून विचारते, “बाळा तू असा आमच्याशी बोलत का नाहीस?आमची सेवा करताना तुला खूप कष्ट होतात का रे? ” दशरथ राजाला हे त्यांचे उद्गार ऐकून हुंदका दिल्याशिवाय राहवत नाही. आणि मग तो खरा प्रकार त्याना सांगतो,नंतर मुलाच्या दुःखाने ते मातापिता प्राण सोडतात.ह्या कथेवरून आईच्या प्रेमाचं महत्व कळतं. अशी पण एक आईवर माझी कविता…. आई कुणा म्हणूनी मी आईस हांक मारू? येईल कां ती मज जवळी ही ऐकुनी आर्त हांक आई तुझ्या उच्चारात “ब्रम्ह”दिसे मजसी “आ” मधूनी दिसे ते आकाश अन “ई” मधूनी भासे तो ईश्वर “आई”,”आई” असे म्हणूनी (मै आई) येतेस तूं सदैव कामा तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा अन तुझ्या त्यागाल नसे कसली तमा तुझ्या ममतेला नसे कसली तुलना अन तुझ्या कर्तव्यापुढे न येई आड भावना तूं जन्म देतेस थोराना शूर आणि थोर कधीही तुला विसरेना आई,थोर तुझे उपकार कुणी ते फेडू शकेल का? ऐरावती वरचे रत्न देऊनी कुबेरही ऋणमुक्त होईल का? किंव येते त्या अभाग्यांची नसे ज्याना ती माउली दुर्भागी ते असती नसे ज्याना तिची साउली स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी कचेरीत जाताना आई बाळाला आजीकडे ठेवून जाते,अशावेळी बाळाच्या मनातले विचार असे आहेत अशी मी कल्पना करून ह्या कवितेतून मांडले आहेत. रविवारच्या दिवशी चिमुकली तनुली आईला म्हणाली इतर दिवशी असता मी सकाळी उठलेली पाहुन तुला घरात नसलेली होई मी किंचीत अळकुळी मग घेई मज आज्जी जवळी पाहुनी माझ्या डोळी म्हणे मला ती “नको होवू तू अळकुळी तुजसम तुझी आई असता अशीच घेही मी पण जवळी तिला त्यावेळी पण जवळी असे मी तिच्या वेळी अवेळी” “पक्षिण उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लाशी आहे ना मी तुझ्या जवळी मग का होतेस तू अशी अळकुळी येइल तुझी आई संध्याकाळी” प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले, “आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया. मी म्हटलं, ”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात” तसं काही नाही ,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय. ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दुःखात अश्रु ढाळण्याची क्षमता दिली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस ेआपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो. माणूस दूःखात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिलं आहे.आणि ते पण अपवादाने. एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दुःखात डोळ्यात अश्रू आणून आपल्या “पदरानें “पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल. ” भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला.” “ओळखा पाहूं “ असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो. मला हंसताना पाहून ते चटकन म्हणाले “ओळखा पाहूं मला कोणत्या व्यक्ती बद्दल म्हणायचं आहे?” मी पटकन म्हणालो, “अहो, माय माऊली आपली आई” “तुम्हाला कसं पटकन कळलं ?” त्यावर मी म्हणालो “भाऊसाहेब.अशी आपल्याच पदरानें डोळे पुसणारी दुसरी कोणच व्यक्ती असूं शकत नाही.” “अगदी बरोबर “ प्रोफेसर म्हणाले. “लहानपणी बघा, मी विचारत असे माझ्या आईला” “आई,मी तुला दुःख दिलं तरी तूं रडतेस,आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.असं का गं करतेस आई?” त्यावर ती फक्त हंसायची. “हे काय गुढ आहे ते तुम्ही कवितेतून सांगा.” यश आणि अपयश मिळालेलं पाहून आईचे डोळे ओले होतात.त्यावर मला खालील कविता सुचली. मुलगा आईला म्हणतो. नको रडूं तूं आई मी तुला दुःख देणार नाही. कळत नाही मला तुझ्या दुःखाचे कारण काही. पाहिले प्रथम तुला रडताना जेव्हां होऊन मी भाग्यवान तूं घालीशी जन्मा मला मी पण रडलो तुला पाहुनी माझ्यासाठी कण्हतानां सुख दुःखाच्या अश्रू मधला फरक मला कळेना यशापयशाच्या प्राप्ती मधला अर्थ जूळेना काय चुकले माझ्याकडूनी गोंधळतो मी तुला पाहूनी पदराने डोळे पुसताना कळले आता विचारांती आईच्या अंतरी असते अश्रूंची नेहमी भरती जरी होई माझी प्रगती अथवा अधोगती नेत्रात तुझ्या सदैव अश्रू भरून असती कारुण्याचे अन त्रुप्तीचे प्रत्येक व्यक्ति रोज स्नान करताना आपल्या पोटावरच्या नाभिकडे-बेंबीकडे- बघून आपल्या आईला म्हणत असावी, “तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण विसरून जाईन कधितरी तुझी आठवण म्हणुनच ठेवली का गं आई! ही माझ्या उदरावर कायमची खूण?” “म्हणून आयुष्यातली एखादी घडी आपल्या आईसाठी ,तिच्या सन्मानासाठी ,कौतुकासाठी अधून मधून असू दे.या जगातील इतर कोणतीही व्यक्ती आईची जागा घेवू शकत नाही. स्वतःवर जितके प्रेम करतो त्याहूनही अधीक प्रेम तिच्यावर करूया. कारण आई शिवाय जीवन निरर्थक आहे.” श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com About these ads Like this:LikeBe the first to like this. This entry was written by shrikrishnasamant, posted on मे 10, 2008 at 5:33 pm, filed under आई विषयी. Bookmark the permalink. Follow any comments here with the RSS feed for this post. Post a comment or leave a trackback: Trackback URL. « अशा ह्या दुनियेत मी एकटा निराळा“जसा व्याप तसा संताप!” » 58 Comments Atul Posted मे 18, 2009 at 11:55 pm | Permalink great……Excellant !!!!! kharach khup chan blog lihila aahe…….kharach dolyat pani yete ekdam……. tumache manapasun aabhar ani kautuk…. Thank You…… प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted मे 19, 2009 at 9:10 pm | Permalink अतुल, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार सामंत प्रत्युत्तर Arpita S.Chaudhari Posted जून 9, 2009 at 3:15 सकाळी | Permalink tumcha ha lekh mala khup bhavala.vachatana ashru anavar zale karan hota ki aaichi khup athvan aali.vatala aata jaun tila mithi maravi ani sangava ki aai,maz shiksan purna zalavar, motha kahi tari(CA)banaychay,aani jagala sangaych aahe ki he fakta me tuza mulech me banu shakale. karan yash ani apayashat tinech mala sath dili.me pass zalavar kiva fail zalavar ashru ani anandashru tichach dolyat aale. प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted जून 9, 2009 at 9:37 सकाळी | Permalink हलो अर्पिता, तुझी प्रतिक्रिया वाचून माझ्या ही डोळ्यात पाणी आलं.माझी तर आई हयात नाही. तरी तुझी आई मला माझ्या आई सारखीच आहे.नव्हे तर प्रत्येक आई अशीच असते. माणसाने ताजमहाल बनवले,पिरॅमिड्स बनवले आणखी काही नाविन्य तयार केली पण देवाने आईला बनवलं तसं तयार करणं माणसाला अशक्यही आहे आणि असंभवनीयही आहे. म्हणून आपली आई आपल्याबरोबर असे तोपर्यंत तिला सुखात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण सदैव असलं पाहिजे. ज्या ज्या वेळी तुला आईबद्दल विशेष वाटतं त्या त्या वेळेला तुला आई दिसली की तिला कडकडून भेट. कारण ती भेट तिच्या उपकाराची निशःब्द पावती आहे. तू नक्कीच CA होशील.माझ्या तुला शुभेच्छा आहेत. आणि तसं झाल्यावर आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू जरूर पाहून माझी आठवण काढ. तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार. श्रीकृष्ण सामंत. प्रत्युत्तर nandakishor p.kadu Posted जुलै 11, 2009 at 4:36 सकाळी | Permalink आई,थोर तुझे उपकार कुणी ते फेडू शकेल का? ऐरावती वरचे रत्न देऊनी कुबेरही ऋणमुक्त होईल का? किंव येते त्या अभाग्यांची नसे ज्याना ती माउली दुर्भागी ते असती नसे ज्याना तिची साउली स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी form.nandakishor.kadu प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted जुलै 11, 2009 at 10:47 सकाळी | Permalink आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्युत्तर vijay Posted जून 29, 2009 at 12:01 सकाळी | Permalink aai प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted जून 29, 2009 at 12:12 pm | Permalink नमस्कार विजय आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार प्रत्युत्तर aboli Posted जून 29, 2009 at 10:53 pm | Permalink he vachun mala hi watal ki mazi aai asti tar mi pan gagywan asli asti thanks…………………. प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted जून 30, 2009 at 8:00 सकाळी | Permalink आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार प्रत्युत्तर mahale lahu. Posted सप्टेंबर 10, 2009 at 12:59 सकाळी | Permalink khup chan mala khup aavdali tuji kavita. प्रत्युत्तर gajanan Posted ऑक्टोबर 8, 2009 at 7:00 सकाळी | Permalink ser I know english knowleg akdm changl ahe wachun far aannd jala प्रत्युत्तर nitesh mahale Posted ऑक्टोबर 10, 2009 at 5:55 सकाळी | Permalink mom always sweetiest person in the world प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑक्टोबर 10, 2009 at 9:42 सकाळी | Permalink नितेश नमस्कार, आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार सामंत प्रत्युत्तर RESHAM Posted ऑक्टोबर 27, 2009 at 12:58 सकाळी | Permalink SIR,Aapla ‘Aaibabatcha lekh’ khup mhanje khupach awadla.Ha lekh wachtana dolyatel ashru thambavne kathin gele. प्रत्युत्तर RESHAM Posted ऑक्टोबर 27, 2009 at 1:07 सकाळी | Permalink SIR, Mazhi aai majhyapasun khup lamb aaste. me mumbaila aaste aani ti punyala aste.Ha lekh wachtana asse watle ki aata jave aani tila kadkadun bhetave. प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑक्टोबर 27, 2009 at 11:56 सकाळी | Permalink नमस्कार रेशम, मला वाटतं आपण वेळात वेळ काडून आपल्या आईला भेटायला अवश्य जावं तिलाही खूप आनंद होईल. मुंबई पुणं काही एव्हडं लांब नाही.आईला भेटायला श्रीगणेशाने पृथ्वीला तिन फेर्‍या घातल्या होत्याच ना? प्रत्युत्तर sagarkobal Posted नोव्हेंबर 14, 2009 at 12:06 सकाळी | Permalink sagar kobal प्रत्युत्तर Dinesh Posted मार्च 26, 2010 at 12:26 सकाळी | Permalink hi chan lekh aheeeeeeeee mala khup avdlaaaaaaaaaaa प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted मार्च 26, 2010 at 10:06 सकाळी | Permalink आपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार. प्रत्युत्तर Prachi Posted जुलै 19, 2010 at 2:11 सकाळी | Permalink Khupach chan lekh. Vachtana Dolyat pani alyashivay rahat nahi. Aaplya aai la kadhich dukhau naye Tich aple Jivan Ghadvate tila Visruch naye. I Love My Mom..! प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted जुलै 19, 2010 at 5:21 pm | Permalink Prachi, so do I. प्रत्युत्तर विकी करडे Posted जुलै 28, 2010 at 4:02 सकाळी | Permalink THIS IS AN EXCELLENT POEM EVER.THANX प्रत्युत्तर Shilpa Posted ऑगस्ट 2, 2010 at 11:16 pm | Permalink Khupach sundar Blog lihila aahe.. me khup divsanpasun aai wishai matter search karat hote tichya janma divsala pathvaisathi.. Ithe tar pratkshya aaiche darshan zale.. dhanyawad.. Khup khup shubhechhya प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑगस्ट 5, 2010 at 10:32 सकाळी | Permalink आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपल्या आईच्या जन्मदिवशी आमच्या पण त्यांना शुभेच्छा सांगा प्रत्युत्तर rajshri Posted ऑगस्ट 6, 2010 at 1:58 सकाळी | Permalink kharach khup sundar lihal tumhi amcha aai vishai kas rahav te te ata amhala samjal thank you very very much…..aai aplayawar kiti maya karte he kunich sangu shakat nahi,pan……..aai che upkar amhi kadhich bhednar nahit…….thanks प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑगस्ट 7, 2010 at 9:21 सकाळी | Permalink नमस्कार राजश्री, आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्युत्तर chandrakant dadas Posted ऑगस्ट 11, 2010 at 1:42 सकाळी | Permalink MI HA BLOG VACHALYANANTHER MAZE DOLE BHARUN ALE.HA LEKH MI KADHI VISARNAR NAHI.THANK प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑगस्ट 12, 2010 at 4:35 pm | Permalink आपल्याला हा पोस्ट आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्युत्तर prasad pansare Posted ऑगस्ट 18, 2010 at 5:40 सकाळी | Permalink aai ek antkaranatu utsfurtpane nighanare nav. aj amhala aaich nako karan amhi sudharlo, amhi pragati keli nemke kay ti paha. nav mhine garbhatil sambhal amhi visarlo mhane amhi sudharlo. jave tyacha vavnsha tavhan kale, tya sathi aai vhave lagel. प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑगस्ट 18, 2010 at 5:57 pm | Permalink अगदी शंभर टक्के मी सहमत आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्युत्तर viju laxman sonawane Posted ऑगस्ट 27, 2010 at 4:44 सकाळी | Permalink kharach khupach chan!tumche manpurvak abhar! प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑगस्ट 27, 2010 at 8:38 pm | Permalink आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनस्वी आभार प्रत्युत्तर Prasad Joshi Posted सप्टेंबर 12, 2010 at 11:48 pm | Permalink mala aai vishaye bharpur vachayache ahe male pl mail kara, mala ha lekh far avadala ahe taer mala mail kara प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted सप्टेंबर 13, 2010 at 9:34 सकाळी | Permalink नमस्कार, माझ्या ह्या ब्लॉगवर आपल्याला आईविषयी खूप काही वाचायला मिळेल. categories मधे “आई विषयी” “कविता” “कवितेतून विचार” ह्या मधून आईविषयी नक्कीच वाचायला मिळेल.अधिक माझ्या ह्या ब्लॉगवरच्या बर्‍याच अशा पोस्टवर आईविषयी लिहिलेले पहाल.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्युत्तर amol tambe Posted सप्टेंबर 17, 2010 at 1:23 सकाळी | Permalink sir, aaie hi kiti thor aste…….. mazya aaie madhe mala pramukhyane devch disato. aani sarwanach kadacit to disesel ase mala vatat nahi. karan aaila tras denare,shivi denarehi lok mala khup distat sir tumcha lekh kaljala bhidnara aahe प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted सप्टेंबर 17, 2010 at 7:44 pm | Permalink नमस्कार अमोल, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माझा लेख आवडल्याबद्दल आभार. आपण म्हणता, “karan aaila tras denare,shivi denarehi lok mala khup distat” खरं सांगू का, “ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता” ह्या गाण्यात पं.हृदयनाथ मंगेशकर म्हणतात, “अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता” आईला त्रास देणार्‍या आणि शीवी देणार्‍या महाभागाना, “कंदील एकटा होता.” हे जाणवल्यावर, आईला त्रास देऊन आणि शीवी देऊनही “बाळ” म्हणून हक्काने आणि अधिकाराने, हांक मारणारं आता या जगी कुणीही नाही,हे जाणवल्याशिवाय कसं रहावेल? प्रत्युत्तर trupti Posted ऑक्टोबर 9, 2010 at 4:50 सकाळी | Permalink Hi I like this poem.really mummy is the nice in the whole world. प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑक्टोबर 9, 2010 at 8:23 सकाळी | Permalink मी सहमत आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार . प्रत्युत्तर suresh kochale Posted जानेवारी 12, 2011 at 2:17 सकाळी | Permalink thise topic is very very beautifull. i like this topic thank yoy… thank you…. thank you….. My good thought. one good mother is batter than hundred teachers. thanks writer.. MARATHI Me ha lakh vachala ani maza Dil(ruday) yala chadun gala. ha lakh ekday tira sarkha vatala. this lakh is batter batter batter 101% avadala…. ok प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted जानेवारी 13, 2011 at 7:57 pm | Permalink आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाट्लं.बद्दल आभार. प्रत्युत्तर snehal Posted फेब्रुवारी 10, 2011 at 12:10 सकाळी | Permalink AAi mhanje kya, lagdycha pay, vasrachi gaay, dudhavarchi saay…….. mhanje AAi janmadati…. viswrupini… प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted फेब्रुवारी 10, 2011 at 6:30 pm | Permalink शंभर टक्के मी आपल्या म्हणण्याशी सहमत आह. आपल्या प्रतिक्रि्येबद्दल आभार प्रत्युत्तर Sonal.M.Mhaske Posted मे 19, 2011 at 11:41 pm | Permalink mazya aai var me khup prem karte.mazi aai dusryanche gharkam karun amha char bhavandana shikvat ahe tila vatate mazya mulani khup shikav mote houn kahitari banav.mala CA banayach ahe.khup kashat karte mazi aai.ek divas me ME CA banarch. I LOVE MY AAI प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted मे 22, 2011 at 6:48 pm | Permalink नमस्कार सोनल तुझी आई ग्रेट आहे.देवाला सगळीकडे जायला वेळ नसतो म्हणूनच त्याने आईला निर्माण केली आहे असं कुणी तरी म्हटल्याचं मला आठवतं.तुम्ही सर्व भावंडानी तुमच्या आईच्या इच्छा पूर्ण करा.सोनल,तू नक्कीच CA होणार.माझे तुला आशीर्वाद आहेत आणि शुभेच्छा आहेत. प्रत्युत्तर H K MANE Posted जुलै 23, 2011 at 11:27 सकाळी | Permalink ———————- ————————— ——————————- ———————————— ————————————– SARSWATI KASYASATHI प्रत्युत्तर H K MANE Posted जुलै 23, 2011 at 11:29 सकाळी | Permalink ———————- ————————— ——————————- ———————————— ————————————– SARSWATI — KASYASATHI प्रत्युत्तर deepsitsjustme Posted ऑगस्ट 25, 2011 at 4:03 सकाळी | Permalink khupch chhan….. aaichi aathvan yet nahi asa divas nahi jat.. pan aaj dole bharun aale… प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted ऑगस्ट 25, 2011 at 10:17 सकाळी | Permalink नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार प्रत्युत्तर varsha Posted सप्टेंबर 15, 2011 at 10:48 pm | Permalink me mazya aai var khup prem karte. maji aai gavala rahte ek hi Sahn asa nahi ki tiji aatvan yet nahi. AAi Vina Jagan Ashay Hote mala. aai ne majya sathi khup kasht kelet mala majya aai che nav mote karayche ahe.I Love AAI I Love AAI प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted सप्टेंबर 16, 2011 at 5:57 pm | Permalink वर्षा, तू तुझ्या आईचं नाव जरूर मोठं कर.माझ्या तुला शुभेच्छा आहेत. प्रत्युत्तर kiran Posted सप्टेंबर 28, 2011 at 2:03 pm | Permalink Aai manje kay langdyacha pay vasrachi gay dudhavarchi say Aai manje A : Aadi I :ishwar प्रत्युत्तर shrikrishnasamant Posted सप्टेंबर 30, 2011 at 12:08 pm | Permalink किरण आपल्या प्रतिक्रियेबदाल आभार प्रत्युत्तर Ramraj Posted एप्रिल 17, 2012 at 1:56 सकाळी | Permalink आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच, ”अगं मी येते!, अरे मी येते! “ असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई” तिच माऊली, तिच मॉं, तिच माय, म्हणजेच “my”- माय- माझी, MOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई. नुसता “आई” हा शब्द्च पहाना, पहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली. दुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य. म्हणूनच ती “आई.” आईचे गोडवे किती गावेत.आई बद्दल कुणी कुणी आणि किती किती लिहावं.किती कविता आहेत किती लेख असतील.तरीपण ”मी पण आणखी लिहू कां?” असे कुणाला नाही का वाटणार? आणि कुणीही कितीही लिहीलं तर ते पुरं पडत का? पण आज Mother’s day असल्याने माझ्या आईची आठवण आल्याने थोड काही तरी आई विषयी लिहावसं मला वाटणं स्वाभावीक आहे. आता,माझी आई हयात नसलेल्याना मला, कवी माधव ज्युलियनची ही कविता प्रकर्षाने जाणवते. “प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी आई!” असं लिहून झाल्यावर, अण्णा (भालचंद्र ) पेंढारकरांचा “दीगू” गातो ते आठवतं, “आई… तुझी, आ..ठ..व..ण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळिज का जळते आई काळिज का जळते” असं म्हणून झाल्यावर कुणी म्हणतं, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” किंवा कुणीतरी सवाल केला आहे, “कुबेरानं आपलं सर्व धन देऊ केलं तरी आईचे उपकार फिटतील का?” नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज, ” बाळा,तुला लागलं का रे? ” असं सुद्धा विचारतं, अशी जी दंतकथा आहे त्यातून पण माणुसकीचा परमोच्य असलेल्या आईचं वर्णन पराकोटीचं नव्हे काय?. ती प्रेयसी-म्हणजेच पुढे होणारी तिच्या बाळाची “आई” – त्या मुलाची निघृण कृती पाहून, “मी सांगितलं म्हणून माझ्यावर प्रेम दाखवायला खरंच एव्हडया पराकाष्टेला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा आणलं नव्हतं “ असं म्हणून ती त्याला झिडकारते हा या दंतकथेचा पुढला भाग वेगळा म्हणा. “मानव कुठले?देव देवताही फुलती तुझ्याच पदरी दुनियेत हा स्वर्ग असे पायतळी तुझ्याच तो वसे ममतेने भरती नयन जिचे देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी? अगं,आई कमलमुखी तूं सुंदर असतां रुप “देवाचे “कसे वेगळे?” असं मी माझ्या, ”माझी सुंदर आई” ह्या कवितेत भारावून जाऊन लिहीलं ते आठवलं. एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले, ”खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं. देव आहे हे आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवतं माझी आई सांगायची की, ”देव खूपच सुंदर दिसतो” असं सांगून भाऊसाहेब म्हणतात, खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?” पण त्या लहान बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की, ”आई मी काही देवाला पाहिलं नाही पण खरं सांगू, तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस” हे सर्व भाऊसाहेबांकडून ऐकून मला एक हिंदी सिनेमातलं गाणं सुचलं. ” ओ मॉं! तेरी सुरतसे अगर,भगवान की सुरत क्या होगी” आणि कविता सुचण्याअगोदर,असा सीन मी माझ्या डोळ्यासमोर आणला, “लहान बाळाला आपल्या पदराखाली घेऊन, त्याला आई जेव्हा दुध पाजत असते, तो तिचा फुटलेला पान्हा मनोमनी पिणाऱ्या त्या बाळाचं लक्ष, तिच्या चेहऱ्याकडे केंद्रित झालेलं असतं, अशावेळी माझ्या मनात त्या बाळाच्या मनातले विचार येवून वाटलं की ते बाळ जणू आईला आठवण करून विचारतं, ” आई कोण हा देव? ज्याची तू नेहमी प्रशंसा करतेस?” ह्यावर आई त्या बाळाला सांगते, ”बाळा, तू त्याला पाहिलं नाहीस, आणि मी पण पाहिलं नाही रे!. पण माझ्यावर विश्वास ठेव. आई गाण्याच्या दोन ओळीत सांगते, “स्वरूप त्याचे किती मनोहर रती मदनाहूनी किती तरी सुंदर” देव असा आहे असं म्हणतात. आपल्या आईकडे टकमक पाहाणारं ते बाळ आईला म्हणतं, “ नसेल पाहिले त्या देवाला जरी परि पहाण्याची असे काय जरूरी अगं,आई कमलमुखी तू सुंदर असता रुप देवाचे कसे वेगळे ?” पृथ्वीला तिन फेऱ्या घालून पैजे साठी गेलेला श्रीगणेशाचा भाऊ, आणि आपल्या आईला तिन फेऱ्या घालून तोच उद्दयेश साध्य करणारा श्रीगणेश!, किती श्रद्धा आईवर त्या गणेशाची?. “रक्तहि जेथे सूड साधते,तेथे कसली माया कोण कुणाची बहिण भाऊ,पती पुत्र वा जाय़ा” ही ह्या दोन ओळीत आईचीच व्यथा आहे. कारण सूड साधणारी आई होऊच शकत नाही, असं कवीला म्हणायचं आहे. आईचे डोळे प्रत्येक प्रसंगात ओलेच झालेले दिसतात. ते आनंदाश्रु अथवा दुःखाश्रु असतात.त्या तिच्या नेत्राश्रुमधे अंतरातलं कारुण्य,तृप्ती आणि शाबासकीचे भाव असतात. मूल जन्माला येताना आईला किती व्यथा होते.मुलाचा जन्म होईतो ती वेदनेने रडत असते. आणि जन्माला आल्यावर तिचं मुल रडतं. रडताना ते मूल आईला जणू सांगत असतं, ” प्रथम पाहिले तुला मी रडताना जन्म देऊनी भाग्यवान मला करताना मी पण रडलो तुला पाहूनी माझ्यासाठी तू कण्हताना सुखदुःखाच्या तुझ्या अश्रूमधला फरक मला कळेना नेत्रात तुझ्या सदैव अश्रू असती कारुण्याचे,तृप्तीचे अन शाबासकीचे “ आणि नंतर मोठं झाल्यावर ते मूल नेहमीच म्हणतं, “कधी दुःखाचे ऊन असे कधी नैराश्याचा मेघ बरसे हे कमलहस्त तुझ्या दुवांचे सरसावती मम माथ्यावरती” आणि पुर्ण मोठं, झाल्यावर तिच्या झालेल्या उपकाराची जाणीव म्हणून म्हणतं, “असतां जवळी दुनियेची दौलत जरी तुझ्यापुढे आम्हा त्याची काय जरुरी अगं,आई कमलमुखी तू सुंदर असता रुप विधात्याचे कसे वेगळे? “ आंधळ्या आई बाबाना तहान लागल्याने आपला बाळ झऱ्यावरून पाणी आणतो आणि पाणी देताना आपल्याशी का बरं बोलत नाही? हे पाहून त्या श्रावणबाळाची आई त्याला अतिशय सद्गदीत होवून विचारते, “बाळा तू असा आमच्याशी बोलत का नाहीस?आमची सेवा करताना तुला खूप कष्ट होतात का रे? ” दशरथ राजाला हे त्यांचे उद्गार ऐकून हुंदका दिल्याशिवाय राहवत नाही. आणि मग तो खरा प्रकार त्याना सांगतो,नंतर मुलाच्या दुःखाने ते मातापिता प्राण सोडतात.ह्या कथेवरून आईच्या प्रेमाचं महत्व कळतं. अशी पण एक आईवर माझी कविता…. आई कुणा म्हणूनी मी आईस हांक मारू? येईल कां ती मज जवळी ही ऐकुनी आर्त हांक आई तुझ्या उच्चारात “ब्रम्ह”दिसे मजसी “आ” मधूनी दिसे ते आकाश अन “ई” मधूनी भासे तो ईश्वर “आई”,”आई” असे म्हणूनी (मै आई) येतेस तूं सदैव कामा तुझ्या कष्टाला नसे कसली सीमा अन तुझ्या त्यागाल नसे कसली तमा तुझ्या ममतेला नसे कसली तुलना अन तुझ्या कर्तव्यापुढे न येई आड भावना तूं जन्म देतेस थोराना शूर आणि थोर कधीही तुला विसरेना आई,थोर तुझे उपकार कुणी ते फेडू शकेल का? ऐरावती वरचे रत्न देऊनी कुबेरही ऋणमुक्त होईल का? किंव येते त्या अभाग्यांची नसे ज्याना ती माउली दुर्भागी ते असती नसे ज्याना तिची साउली स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी कचेरीत जाताना आई बाळाला आजीकडे ठेवून जाते,अशावेळी बाळाच्या मनातले विचार असे आहेत अशी मी कल्पना करून ह्या कवितेतून मांडले आहेत. रविवारच्या दिवशी चिमुकली तनुली आईला म्हणाली इतर दिवशी असता मी सकाळी उठलेली पाहुन तुला घरात नसलेली होई मी किंचीत अळकुळी मग घेई मज आज्जी जवळी पाहुनी माझ्या डोळी म्हणे मला ती “नको होवू तू अळकुळी तुजसम तुझी आई असता अशीच घेही मी पण जवळी तिला त्यावेळी पण जवळी असे मी तिच्या वेळी अवेळी” “पक्षिण उडे आकाशी परी लक्ष असे पिल्लाशी आहे ना मी तुझ्या जवळी मग का होतेस तू अशी अळकुळी येइल तुझी आई संध्याकाळी” प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले, “आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया. मी म्हटलं, ”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात” तसं काही नाही ,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय. ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दुःखात अश्रु ढाळण्याची क्षमता दिली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस ेआपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो. माणूस दूःखात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिलं आहे.आणि ते पण अपवादाने. एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दुःखात डोळ्यात अश्रू आणून आपल्या “पदरानें “पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल. ” भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला.” “ओळखा पाहूं “ असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो. मला हंसताना पाहून ते चटकन म्हणाले “ओळखा पाहूं मला कोणत्या व्यक्ती बद्दल म्हणायचं आहे?” मी पटकन म्हणालो, “अहो, माय माऊली आपली आई” “तुम्हाला कसं पटकन कळलं ?” त्यावर मी म्हणालो “भाऊसाहेब.अशी आपल्याच पदरानें डोळे पुसणारी दुसरी कोणच व्यक्ती असूं शकत नाही.” “अगदी बरोबर “ प्रोफेसर म्हणाले. “लहानपणी बघा, मी विचारत असे माझ्या आईला” “आई,मी तुला दुःख दिलं तरी तूं रडतेस,आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.असं का गं करतेस आई?” त्यावर ती फक्त हंसायची. “हे काय गुढ आहे ते तुम्ही कवितेतून सांगा.” यश आणि अपयश मिळालेलं पाहून आईचे डोळे ओले होतात.त्यावर मला खालील कविता सुचली. मुलगा आईला म्हणतो. नको रडूं तूं आई मी तुला दुःख देणार नाही. कळत नाही मला तुझ्या दुःखाचे कारण काही. पाहिले प्रथम तुला रडताना जेव्हां होऊन मी भाग्यवान तूं घालीशी जन्मा मला मी पण रडलो तुला पाहुनी माझ्यासाठी कण्हतानां सुख दुःखाच्या अश्रू मधला फरक मला कळेना यशापयशाच्या प्राप्ती मधला अर्थ जूळेना काय चुकले माझ्याकडूनी गोंधळतो मी तुला पाहूनी पदराने डोळे पुसताना कळले आता विचारांती आईच्या अंतरी असते अश्रूंची नेहमी भरती जरी होई माझी प्रगती अथवा अधोगती नेत्रात तुझ्या सदैव अश्रू भरून असती कारुण्याचे अन त्रुप्तीचे प्रत्येक व्यक्ति रोज स्नान करताना आपल्या पोटावरच्या नाभिकडे-बेंबीकडे- बघून आपल्या आईला म्हणत असावी, “तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण विसरून जाईन कधितरी तुझी आठवण म्हणुनच ठेवली का गं आई! ही माझ्या उदरावर कायमची खूण?” “म्हणून आयुष्यातली एखादी घडी आपल्या आईसाठी ,तिच्या सन्मानासाठी ,कौतुकासाठी अधून मधून असू दे.या जगातील इतर कोणतीही व्यक्ती आईची जागा घेवू शकत नाही. स्वतःवर जितके प्रेम करतो त्याहूनही अधीक प्रेम तिच्यावर करूया. कारण आई शिवाय जीवन निरर्थक आहे.” प्रत्युत्तर
 39. meenakshi
  Posted जानेवारी 10, 2013 at 1:00 सकाळी | Permalink

  Khupach sundar Blog lihila aahe.. me khup divsanpasun aai wishai matter search karat hote tichya janma divsala pathvaisathi..
  Ithe tar pratkshya aaiche darshan zale..
  dhanyawad..

  Khup khup shubhechhya

  really heart touching, god bless u

 40. SANDEEP THOPTE
  Posted मे 14, 2013 at 11:38 pm | Permalink

  lay bhari……

 41. Hemali Bagaram mhatre
  Posted मे 26, 2013 at 9:44 सकाळी | Permalink

  Khup aabhari….mi mazya aaila khup mante.tiche dukh mlach mahit aslyane nehmi mla aaivishyi vachavese vatte.aaichi ankhi vyathi mla tumchyakdun milali…Thanxxxx

 42. akshay kadam
  Posted ऑगस्ट 26, 2014 at 6:43 सकाळी | Permalink

  ha lekh vachlyaver mla evdech sangu vatate ki आई i love uuuuuuuuuuuuu
  tu kharch khup great ahes……….

 43. dhanraj dongre
  Posted डिसेंबर 13, 2014 at 3:06 सकाळी | Permalink

  lekh vachun mala mazya आईची aathavn आली…….

  mazi aai hya duniya nahi aahe me 12 vrsha cha astani mazi aai deva ghari geli…… aata me 35 varshacha aahe….

  dhanraj dongre

  • Posted डिसेंबर 13, 2014 at 8:01 pm | Permalink

   धनराज,
   आठवणी नेहमीच येतात.आठवणी कधीच जात नाहीत.आईची आठवण तर कधीही जाणार नाही.
   प्रतिक्रीयेबद्दल आभार

 44. सौरभ दिलीप माने
  Posted फेब्रुवारी 9, 2017 at 8:35 सकाळी | Permalink

  हा निबंध इतका सुंदर आहे कि मी

  • Posted जून 23, 2017 at 10:41 सकाळी | Permalink

   थॅन्क्स सौरभ,
   तुम्हाला निबंध आवडला हे वाचून आनंद झाला.


One Trackback

 1. By 2010 in review « कृष्ण उवाच on जानेवारी 2, 2011 at 11:26 सकाळी

  […] आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…! May 2008 39 comments 3 […]

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: