“जसा व्याप तसा संताप!”

 तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो “आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.
anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना “जसा व्याप तसा संताप!” हेच खरं.”

रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ. रंजना रमाकांत रणदीवे जिला आम्ही गंमतीत “अंरंरर” म्हणायचो ती आता दोन मुलांची आई झाली आहे.ती दोन मुलांची आई झाली तरी अजून तिची तब्यत ठेवून आहे.तशीच किडकीडीत,पण सतेज चेहऱ्याची,चुटपुटीत आणि सदैव एनर्जीने भरलेली अजूनही असते.आणि हे असण्याचं कारण तिची लहानपणची मैत्रिण शोभा.
मला केव्हा कळलं,की मी तिला एकदा मुद्दाम अर्थात कुतहलाने विचारलं,
“ह्या वयात सुद्धा तू अशी तब्यत ठेवून कशी आहेस?”
हे ऐकून ती मला म्हणाली,
“ह्या सर्वाचा कारण माझी जीवश्च कंटश्च मैत्रिण शोभा.मला आठवतं शोभा त्यावेळी आरशात पण बघायला घृणा करायची.अगदी निष्ठुरपणे ती आपलीच चामडी ओढायची आणि चिमटे घ्यायची,जणू प्रत्येक वेळी असं करून तिच्या शरिरावरच्या कमतरताना शिक्षाच करायची. तिचे हात आणि पाय ह्या असल्या आघाताने चट्टे आलेले दिसायचे.शोभा नेहमीच दुर्मुखलेली दिसायची,आणि त्याबाबत तिला काही वाटतही नव्हतं.रखरखत्या आणि दमट उन्हाळ्यात सुद्धा ती स्वेटर चढवायची आणि थरथरण्याचा अविर्भाव करून त्यातच काही विशेष केल्याच्या आनंदात असायची.सहजगत्या माझ्या मनात आलेल्या तिच्या बद्दलच्या हेव्याची आणि तिच्या त्या कमजोर सौंदर्याच्या कौतुकाची मला आठवण यायची.तिचे ते किडकीडीत शरिर,आणि फ्फु केल्यास वाऱ्यावर उडून जाण्याईतप असलेल्या त्या शरिराची, कल्पना येतायेताच ती  त्याग करून काय मिळवीत आहे याचं गांभिर्य लक्षात आणलं.”

मी अंजनाला म्हणालो,
“हे तिने कसं आचारणात आणलं?”

त्यावर माहिती देत म्हणाली,
“सुरवातीला ती तांदळाची पेज,किंवा तत्सम सुपं घ्यायची.मग जरा वरच्या थराचं लंघन करायला लागली.नंतर नियमाने चुर्ण घ्यायची. मग दिवसातून सफर्चंदा सारखं एखादं फळ खायची.कधी कधी अर्ध सफर्चंद खायची. शेवटी तिची सर्व खाण्यावरची इच्छाच मेली. आम्ही तिच्या मैत्रीणी,तिला सुरवातीला काहीच बोलत नव्हतो.त्यावेळी आम्ही सर्व एकशिवडी प्रकृती ठेवण्यात वेड लागल्या सारखे मनात ठेवून डायटींग करणं हे आमच्या आयुष्याचं ब्रिद वाक्य असायचं.असं करताना काही खाण्याच्या गोष्टीचा त्याग करायला कसलेच सीमा नव्हती.
त्यामुळे शोभाची वागणूक पाहून तिला स्वारस्य न दाखवणं म्हणजे एक तऱ्हेने तिच्या आनंदाला आणि तिच्या स्वपनाना तिलांजली दिल्यासरखं होत होतं,आणि चूपचाप बसणं म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाची परिसीमा दाखवणं असं होत होतं.

मी अंजनाला म्हणालो,
“तुम्हा मुलींना ’शेवग्याच्या शेंगेसारखी’ आपली प्रकृती ठेवण्याचं एका ठरावीक वयात एक प्रकारचं वेडंच असतं नाही काय?”
अंजना म्हणते,
“त्या वयात प्रत्येक मुलगी कुठचा तरी एक दिवस जागी होवून स्वतः दिसते त्या आपल्या शरिराकडे पाहून कष्टी मनाने जागृत होत असते. आमच्या सारख्या अतिजागृत मुलींसाठी हा दिवस जरा लवकरच उगवतो,आणि येणाऱ्या प्रत्येक पहाटेला रेंगाळत ठेवतो.
परंतु,मी मला anorexia-म्हणजेच स्थुल होण्याच्या भितीने आहाराकडे दुर्लक्ष करणं- होवू दिला नाही.कदाचीत मी खंबीर मनाची असेन किंवा नसेन.कारण शोभा आमच्या सर्वांत अतिशय खंबीर असावी.ती तिच्या शरिराच्या सांगाड्यात सर्व काही दोषविरहीत कोरून ठेवलं आहे असं समजत असावी.तिच्या शरिराचं वजन प्रत्येक पौंडाने कमी होण्यात तिला आपलं भविष्य लपलेलं आहे असं वाटायचं.कायपण भविष्य म्हणायचं?.
तिच्या वडीलानी तिला शेवटी नर्सिंग होम मधे नेवून परत आणल्यावर ती जरा निरोगी दिसू लागली.पण बरीच मानसिक रुग्ण दिसू लागली.तिला पुन्हा नर्सिंग होम मधे न जाता ह्या रोगावर घरी बसून आणि घरच्या लोकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या आधारावर उपचार करायचा होता.
इतरांप्रमाणे मी पण थोडी साशंक होते.तिला परत नर्सिंग होम मधे नेल्यावर मी काही विषेश विरोध दाखवला नाही.ती घरी राहून बरं होणं पसंत करीत होती पण आमचा कुणाचा त्यावर विश्वास नव्हता.आम्ही ती आशा केव्हाच  सोडली होती.
मी माझ्या मनात समजूत करून घेत होते की कदाचीत डॉक्टर आणि मनोवैज्ञानीकांकडून तिच्यावर आमच्या संगतीत राहण्यापेक्षा जास्त चांगले उपचार होणार.पण खरं सांगयचं तर कुणाचीच तिच्या रोगावर मात करण्याची हिम्मत झाली नाही आणि तिच्या येवू घातलेल्या मृत्युशी झुंज द्दयायला हिम्मत झाली नाही.मी तिला माझ्या दृष्टीतून आणि मनातून काढायला बघत होते.मी तिच्यावर पाणी सोडलं होतं.मी तिच्यावरचा विश्वास सोडला होता.तिच्या मनाची क्षमता आणि तिची इच्छाशक्ति ह्या दोन्ही बद्दल मी साशंक होते.
माझ्या लक्षात आलं नाही की प्रत्येक व्यक्ति स्वतंत्र असते आणि डॉक्टर काही जादूगार नसतात.मला वाटतं तिने पण तसंच समजून तो नाद सोडला आणि शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की शोभा सारखी एक टोकाची भुमिका न घेता मी सुद्दृढ, सशक्त राहून माझ्या शरिरावर प्रेम करू लागले.
कोणत्याही परिस्थितीत प्रेम म्हणजेच, श्रद्धा असणं आणि विश्वास असणं.कधीही हताश न होणं म्हणजेच प्रेम.अगदी संकटाची पराकाष्टा झाली असतानाही इच्छा-शक्ति घालवू न देणं आणि मनुष्याच्या बदलावाच्या क्षमतेचा संशय पण मनात न आणणं म्हणजेच प्रेम.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिने विनाअट प्रेमात असावं”

हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो “मी प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही.
anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय ना ’जसा व्याप तसा संताप!’ हेच खरं.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
  

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: