Monthly Archives: जून 2008

ठाम मताचे आमचे बंडूतात्या

तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं. मला एकदा म्हणाले, “ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही.” मी त्यांना म्हणालो, “बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न […]

का लपवूनी ठेविसी तुझे गुपित

  पाहिले जेव्हा मी तुला मन माझे गेले हरवूनी धडधडून तेव्हा सागे ते मला प्रीती जडली लपुनी छपुनी ओठ ही सांगती मला मन माझे गेले गुंतूनी हकीकत माझी कशी तुला सांगू आहे कोण मी ते कुठवर लपवू का लपवूनी ठेविसी तुझे गुपित प्रयत्न करूनी झाले सर्व मला माहित जागो जागी आणुनी शब्द जिव्हेवर सांगतील सर्वां […]

आतला आवाज

आतला आवाज “मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात. माझ्या आईने मला हे सिद्ध करून दाखवलं आहे.” अशोक त्या दिवशी माझ्या घरी मुद्दाम म्हणून आला होता.त्याचे वडिल अलीकडेच निर्वतले होते.त्यांचे काही फोटो आणि […]

परि तुज सम आहेस तूच

लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच वहा रे! ते नजर फेकणे वहा रे! ते नखरेल चालणे कसा सावरू सांग माझे भूलणे हा केशभार की काळे घन समजू हे नयन तुझे की लख्ख बिजली समजू कुणा कुणाला देशिल असली सजा लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या परि तुज सम आहेस तूच   तुही […]

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची […]

करिन मी तुजवर प्रीति

छोट्या छोट्या रात्री होत जातात लांब लांब धावत पळत जाणाऱ्या झोपेला सांगू कसे मी जरा थांब थांब मनात माझ्या बेचैनी प्रतिक्षा माझ्या नयनी होईल जेव्हा अशी स्थिती करिन मी तुजवर प्रीति भोळा खूळा अशी माझी महती नको विचारू मज इच्छा कोणती घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत वाटे मला मी वसतो स्वर्गात फुलासम खुलुनी मन देई […]

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

  “ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात” आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले, “ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.” तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला […]

जखम मनाची ताजी असता

नयन माझे अश्रुनी भरले सांगशी तू मला हंसण्या जीवन माझे नैराशाने भरले सांगशी तू मला ते विसरण्या दिवस माझे कठिण झाले काय करू मी आता मन माझे उचंबळून आले दाह सहन करता करता जखम मनाची ताजी असता दुषणे देतोस कसा आता कसे बरे जीवनामधे प्रीति करीती लोक नावे ठेवूनी सच्छिलतेला हेवा करीती लोक विझूनी गेली […]

तू जवळी रहा आयुष्यभर

तू दे मज साथ जीवनभर तू जवळी रहा आयुष्यभर दाखविन मी माझे रंग तुही दाखवी तुझे ढंग मग कसली असेल उमंग अन कसला होईल अपेक्षाभंग दिसेल तेव्हा वेगळा आगळा तुझा नी माझा संगम आहेस तू सकाळचे किरण बांधले करकचूनी त्यासी तुझे न माझे भोळे मन दूर असूनी नसशी दूर किती जवळ आहो आपण तू दे […]

फा्दर्स डे

कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो “माफ करा”असे म्हणून मी […]