नको म्हणू रे मनुजा!

हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मात्र
करू नको कॉपी दुसऱ्याची

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॉलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

4 Comments

 1. sandhyavj
  Posted जून 14, 2008 at 3:06 सकाळी | Permalink

  आपली लेखन कला अप्रतिम आहे. आम्ही जरा उशीराच फिरकलो इकडे…पण काही हरकत नाही. आता मला छानसं लेखन वाचायला मिळणार हा आनंद काय कमी आहे कां.. 🙂

  दीपिका जोशी ‘संध्या’

 2. Posted जून 14, 2008 at 7:39 pm | Permalink

  नमस्कार दीपिका,
  आपण केलेल्या प्रशंसे बद्दल आपले आभार.
  चांगलं लेखन करून मी आपल्याला आनंद
  देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.
  सामंत

 3. mehhekk
  Posted जून 16, 2008 at 9:43 सकाळी | Permalink

  :):) so true nature has made so beautiful things surrounding,ha ha no copying of others,kaka ekdam barobar mhanalat bara ka.chan.

 4. Posted जून 16, 2008 at 10:02 सकाळी | Permalink

  नमस्कार मेहेक,
  आपल्या ब्लॉगवर जावून मी नेहमीच वाचून आनंद घेतोच.आपलं पण लेखन आणि कविता थोडक्यात आणि प्रशंसा लायक असतात.इतरांचे लेखन आणि कविता वाचून आपण आवडल्यानंतर
  कघीही प्रशंसा केल्या शिवाय सोडत नाही हा आपला गुण आमच्या सारख्याने घेण्यासारखा आहे
  पुन्हा आभार
  सामंत


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: