पानी तेरा रंग कैसा?

 

“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोधलागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हापण त्यातलाच प्रकार असावा.”

 

मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते”
मी म्हणालो,
” आपण अवश्य ऐकू या”

“देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
“माझा देवावर विश्वास आहे” असं एखाद्याचं  म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक  विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या  श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की “मला वाटतं देव नाही” अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.

“माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्याश्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही.”
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, “गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही.”
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मीबरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती  करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं.”
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
” हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स.”
मी त्याला म्हणालो,
“ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिचतर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा.”
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.
 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com 
  

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: