पन्नास टक्के थेअरी

 

“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”

नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांनाभेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
“मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्‍या सर्व चांगल्या गोष्टी सहजच होऊन गेलेल्या वाईट गोष्टीवर मात करतात.
वाईट गोष्ट सर्वसाधारण चांगल्या गोष्टीपेक्षां जास्त काळ टिकून राहूच शकत नाहीत.शांती आणि भरभराटीचा मी चहाता आहे.
मी “पन्नास टक्के थेअरी” मानतो.अर्धाअधीक वेळ घटना सर्वसाधाराण गोष्टीपेक्षा चांगल्या असतात.आणि अर्ध्याअधीक वेळात्या वाईट असतात.मला वाटतं जीवन हा एक लंबकाचा झोका आहे. सर्वसाधारण गोष्ट कळायला वेळ जावा लागतो आणिअनुभव मिळवावा लागतो.आणि त्यानेच मला भविष्यातल्या येवू घातलेल्या आश्चर्यांचं आकलन होतं.
आपण जर का एक यादी केली तर असं दिसून येईल.
मला मरण येणार आहे.माझ्या आजीआजोबांच्या,जवळच्या मित्राच्या,प्रेमळ बॉसच्या,आणि माझ्या प्रेमळ कुत्र्याच्या निर्वतण्याच्या प्रसंगाला, मी तोंड दिलं आहे.ह्यातले कांही प्रसंग खूपच धक्कादायक होते.आणि काही रेंगाळलेले आणि दुःखदायी होते.ह्या सर्व वाईट गोष्टी एकदम खालच्या पातळीवर ठेवता येतात.
 दुसरे वरच्या पातळीवर ठेवता येतील असे  मुद्दे म्हणजे,आपल्याला आवडेल त्या व्यक्तिशी लग्न होणं.मुल होणं आणि त्या मुलाचा बाबा म्हणून त्याच्यासाठी केलेल्या गोष्टी. उदा.त्याच्या बरोबर बॅट-बॉलने खेळणं,त्याच्या बरोबर पोहायला जाणं,कीड-मुंगीकडे पण दयाळू अंतःकरणाने पहाण्याचीत्याची वृत्ति पाहून त्याच कौतूक करणं.पत्याचे बंगले बनविण्याची त्याची कल्पनाशक्ति आणि अंगातली कला पाहून आनंदी होणं.
 पण मधल्या वेळात जीवनाचं विखुरलेल असंही कुरण असतं जिथे वाईट आणि चांगल्या गोष्टी आलटून पालटून कसरत करीत असतात.ती माझी “पन्नास टक्के थेअरी” इथे माझ्या उपयोगी येते.
आता हेच बघा माझा एक मित्र कोकणात शेती करतो.पावसाचा अंदाज घेऊन त्याने एकदा भाताची पेरणी थोडी अगोदरच केली.त्या वर्षी पाऊस थोडा उशिरा आला.आणि त्याला परत पेरणी करावी लागली.त्याची मेहनत फुकट गेल्याबद्दल त्याला जरा वाईट वाटलं.पण त्यावेळेला मोठा दुष्काळ आला होता.त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता.पण त्याची खात्री होती की असे दुष्काळ नेहमीच येत नाहीत.माझ्या त्या “पन्नास टक्केच्या थेअरीची” मदत झाली.दुसर्‍या पावसाळ्यात त्या दुष्काळाची कसर निघाली.त्या वर्षी भरपूर भाताचं पिक आलं.आणि दिवस तसेच राहत नाहीत हे सिद्ध झालं.”
हे सर्व ऐकून मी त्याला म्हणालो,
“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: