Monthly Archives: ऑगस्ट 2008

सोन्याचं परिवर्तन

गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत फेकायची.अशा तर्‍हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या […]

हे थेंब नसूनी असती तारे

  हे थेंब नसूनी असती तारे येती आकाशगंगे मधूनी सारे एकावेळी शंभर शंभर उतरती गगनामधूनी तुझ्याच अंगावरती मोत्यापरी थेंब नभातूनी दमकत येती वा कभिन्न रात्री काजवे चमकती जसे पदरामधे शिरती तुफान वारे हे थेंब नसूनी असती तारे येती आकाशगंगे मधूनी सारे जवळी बसून मला तू सुंदर दिसशी हाताच्या विळख्यात तू तस्वीर होशी जसे प्रतिबिंबामधे दिसती […]

पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत. “मी, माझे, मला”

  आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत.”मी,माझं,मला”, एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांनासहज विचारलं, “सध्या कसला विषय डोक्यात घोळत आहे.?” माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले, “आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया.” मनात म्हणालो, […]

वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी

वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी प्रतिमा तुझी माझ्या हृदया जवळी वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी दैव माझे सजवूनी दिलास तू आकार निष्कामी मला तू बनविलेस मुर्तिकार शब्द नी शब्द ठेविला मी हदया जवळी वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी आणूनी स्मरणात केली मी पुजा रात्रंदिनी अचंबीत झालो ततक्ष्णी पाउलांची निशाणी पाहूनी झुकवूनी मस्तक माझे वाहतो फुलांची […]

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

  जाता जाता मी शिलाला म्हणालो, “म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही.”  हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला […]

दर्शन प्रियाविणा व्याकूळ होते

  पहा पहा वर्षाविणा जलधारा येते दर्शन प्रियाविणा व्याकूळ होते प्रियाविणा दुनिया एकाकी होई दुःख मनाचे दुप्पट होत जाई जागती दुःखे नशिबही झोपी जाई लोलक नयनाचे अश्रूनी चमकते पहा पहा वर्षाविणा जलधारा येते विरहीण हार फुलांचे गुंफीत जाई तुटली स्वपने मोती विखरून जाती ज्योत दिव्याची विझली जाई स्वप्नं मनातले विरून जाते पहा पहा वर्षाविणा जलधारा […]

अवघे पाऊणशे वयमान.

 अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली. १४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते काढदिवस. जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत, कुकलं बाळ होतो. त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत अल्लड मुलगा होतो. त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत शाळकरी होतो. त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत कॉलेज वीर होतो. त्यानंतर थोडी वर्ष चाकरमानी होतो. त्यानंतर […]

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

  पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट […]

दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!

  गगन समजे चंद्र सुखी चंद्र म्हणे तारे लाटा सागराच्या म्हणती सुखी असती किनारे दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे! पर्वत राशी दूरूनी पाहूनी दिसती सुंदर छोटे जवळ जाऊनी दृष्य पाहता भासती दगडी गोटे कळी समजे बाग सुखी बाग म्हणे बहारे दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे! रात्र काळी म्हणते मनी दिवसा असे उजाळ दिवस […]

द्दावं,द्दावं आणि द्दावं

  “हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे” माणसांची आयुष्ये खरोखरंच  गोष्टींचा “एनसायक्लोपीडाया” आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार. मंजूचे अनुभव ऐकून […]