प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.

 

त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्‍या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता.
लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो.
त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्यांना प्रश्न केला की ते हे सर्व कसं मॅनेज करू शकतात.
त्यावर ते मला म्हणाले,
“मला नेहमीच वाटतं की मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.हरकत नाही मी काय करीत असेन,हरकत नाही मी कुठे असेन,हरकत नाही मी कसल्या प्रसंगातून जात असेन,पण मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.आज मी कुणाची तरी मदत घेऊन माझ्या मनात आलेले विचार त्याच्या कडून लिहून काढण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्या पूर्वीमाझं आयुष्य हजारो कागदाच्या फोली घेऊन त्यावर काही ना काही तरी लिहिण्यात गेलं होतं.परंतु आता मला बोटात पेन धरून कागदावर खरडण्यासाठी ती बोटं वापरता येत नाहीत.

मला अशा प्रकारचा व्याधी झाला आहे,की हा व्याधी हळू हळू माझे एकएक शरिरातले स्नायू निकामी करून शेवटी माझ्या शरिरातले असतील ते स्नायू निकामी करणार आहे. सरते शेवटी मी सरकू शकणार नाही,बोलू शकणार नाही,आणि शेवटी श्वास पण घेऊ शकणार नाही.आत्ताच मी दुसर्‍यानवर अवलंबून आहे.म्हणून मी रोज माझ्या पर्याया विषयी तपासणी करीत असतो.

ह्या व्याधी बरोबर दिवस काढणं म्हणजे जणू कोर्टातल्या साक्षीच्या पिंजर्‍यात उभं राहून कोर्टाला माझ्याच विषयी मला काय माहित आहे ते सांगणं.मी कसा दिसतो,मी कसा वागतो,मी जगाशी कसा रदबद्ली करतो आणि हे सर्व आता झपाट्याने बदलत चाललं आहे.तरीपण ह्या बद्दला बरोबर मला अजून पर्याय पहाण्याची क्षमता आहे.
ज्यावेळी मी कागदावर लिहू शकत नाही हे मला कळलं,त्याचवेळी कुणा दुसर्‍याची मर्जी संपादून त्याच्याकडून लिहून घेण्याची खडतर खटपट मला करावी लागणार आहे हे ही समजलं.पण गंमत म्हणजे ह्या पद्धतीने मी पूर्वी पेक्षा जास्त लेखन करू लागलो.

आणि जास्त क्रियाशील पातळीवर रोज माझा पर्याय पहाताना मी कसा जगणार आहे? हे न पहाता, जर का मी जगलो तर? ह्या पर्यायावर आधार घेऊ लागलो आहे. माझ्यावर कुठल्याच प्रकारचा धार्मिक बंधनाचा पगडा नाही की जेणे करून मला आयुष्यरेषे बद्दल अमुकच तर्‍हेने विचार करावा लागणार आहे. आणि ह्या माझ्या व्याधीला त्यामुळे तिच्या मर्जीप्रमाणे काय करायचं हे करायला मुभा मिळणार नाही. आणि अगदी इथेच मला माझ्या पर्याय पहाण्याच्या क्षमतेचा खरा अर्थ मिळतो. ही व्याधी ही जणू मला फाशिची शिक्षाच आहे अशा दृष्टीने तिच्याकडे मी पहातो.किंवा ही व्याधी मला मी खरा कोण आहे हे पडताळण्यासाठी मिळणारं आमंत्रण समजतो.

कोर्टातल्या पिंजर्‍यातल्या साक्षिदारालासुद्धा त्याच्या बद्दलची मुलभूत दृष्टी बदलता येत नाही. मग माझी तरी माझ्या विषयी दृष्टी काय असणार? असला काही तरी विचार मी रोज मनात आणून शिकत असतो.आणि आता पर्यंत मी बर्‍याच विषेश गोष्टी शोधून काढल्या आहेत.पण ह्यातली एक गोष्ट इतर गोष्टीमधे जरा वरचढ आहे.माझ्या मधेच मी एक गोष्ट शोधून काढली आहे आणि ती अशी की आता मला माझ्यातच काळजी करणं आणि करून घेणं हे चांगलच कळायला लागलं आहे.
हा व्याधी होण्यापूर्वीच्या माझ्या  आयुष्यात जेव्हडं मला माहित नव्हतं त्याहिपेक्षा जास्त आता मला माहित झालं आहे. मी पूर्वी एव्हडा स्वतंत्र आणि स्वतःची खासगी ठेवायचो,तो मी आता आजूबाजूच्या  मित्र आणि परिवारांकडे एव्हडा मोकळाझालो आहे की ते सर्व माझ्या जीवनाचा हिस्सा झाले आहेत.पूर्वी हे असं होणं मला महाकठीण होतं.मला वाटायचं की ह्या व्याधीच्या मगरमिठीत राहण्याशिवाय मला तरणोपाय राहिला नसून, खडतर आयुष्य काढणं आणि एकाकी राहण्याला पर्याय नाही. त्याऐवजी आता वाटतं नेहमीच पर्याय पहाण्याचा मला मार्ग मिळाला आहे, मला आता इतर शक्यतांचा वापर करता येईल. आणि आता ज्या गोष्टीला मी कटकट किंवा नकोशी म्हणायचो त्याच गोष्टीने माझं जीवन अविट गोडीने सुखद केलं आहे.ते तसं पूर्वी होतच पण आता मी  तसं पहाण्याच्या पर्यायाची निवड केली आहे. ही गोडीच मला जणू ठसाकावून सांगतेकी मला कसलाही पर्याय पहाण्याची क्षमता आहे.”
हे त्या गृहस्थांचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.आणि आयुष्यात पर्याय पहाण्याच्या त्यांचा विचार पाहून नविन काही तरी शिकलो.  

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: