रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

 

तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले
बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले
काही हरवून काही गवसण्याचे दिन आले

पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले
भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले
मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर
उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर
गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

3 Comments

 1. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
  Posted ऑगस्ट 9, 2008 at 10:24 सकाळी | Permalink

  दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावरउमललेल्या फुलानी गंध उधळल्यावरगुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आलेरात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
   
  क्या बात है,अनुवाद आवडला.

  अनुवाद आवडला !!!

 2. Posted ऑगस्ट 9, 2008 at 2:01 pm | Permalink

  डॉ.दिलीपजी,
  आपल्याला अनुवाद आवडला हे वाचून आनंद झाला.
  कवी मंगेश पाडगांवकर म्हणतात,
  “एक गोष्ट पक्की असते
  तिन्ही काळ नक्की असते
  तुमचं न माझं मन जुळतं
  त्या क्षणी दोघानाही गाणं कळतं”

  आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

 3. mehhekk
  Posted ऑक्टोबर 9, 2019 at 1:26 सकाळी | Permalink

  Mast khup Sundar.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: