चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

 

पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कुणाचीही बाचाबाची होत नसे.एक्मेकाला सॉरी म्हणून निघून जायचे.कधी कधी सॉरी हा शब्द मोठ्याने ऐकायला यायचा तर कधी कधी ओठांच्या हालचाली वरून सॉरी म्हटल्याचं भासायचं.हे त्यांच फ्रेंडली वागणं पाहून मला कौतूक वाटायचं.
फक्त दोन अक्षरांचा शब्द किंवा पुटपुटणं आणि सर्व कसं शांतिने होऊन जायचं.हा  केवळ एक सामान्य सदभावनेचा प्रतिसाद असायचा पण माझ्या मनावर त्याचा बरेच दिवस आठवणीत ठेवण्यासारखा परिणाम झाला होता.

दया,आस्था,आणि फिकीर हे एकमेकांचे रक्ताचे नातलग समजले पाहिजेत.आणि त्यांचा वापर करून मनाला मिळणारी समाधानी ही एक देणगी सारखी वाटली पाहिजे.
एकमेकाच्या वाटेत आल्यावर एकाने दुसर्‍याला आपण कळ सोसून जाऊ द्दावं आणि त्या दुसर्‍याला त्याचा आनंद वाटून त्यानेगोड स्मित करणं आणि हे स्मित म्हणजेच एक उपकृततेची पावती त्याने दिली आहे असं समजून, जाऊं देणार्‍याने सुखावणं, ह्या क्रियेतून दोघांच्याही मनात एक खूषिचा प्रकाश चमकून जातो.तसं पाहिलं तर ही एक साधी घटना आहे.पण ती एक उमद्दा प्रवृतीची ओळख आहे.शेवटी ह्या वृत्तिचा संबंध आस्था आणि फिकीर ह्यांच्याशी जुळला जातो,जी ही वृत्ति अलीकडे बरिचशी शॉर्ट सप्लाय मधे आहे आणि कमी कमी होत चालली आहे.

पण म्हणून आपली फसगत करून घेण्यात अर्थ नाही.कारण तसा विचार करून घेणं म्हणजे निराशा पदरी पाडून घेणं.कुणाकडून झालेल्या चूका ही वृत्ति सुधारून घेईल,जखमा भ्ररिल, आणि ह्या शतकात शांति आणि अमन आणून आता पर्यंत जगात झालेल्या अत्याचारांपासून ही वृत्ति डोकं वर काढील असं वाटत नाही.खूपच अपेक्षा केल्यासारखं होईल.

शांत सागरात स्फुरणिय प्रवास होणं ही काही बातमी होऊ शकत नाही पण खवळत्या समुद्रात फुटलेल जहाज आणि त्याची हानि ही  मात्र बातमी होऊ शकते.वाईट बातम्यानाच जास्त प्रसिद्धि मिळते.परंतु आस्था आणि फिकीर असण्याने वाईटाबरोबर चांगली बातमी पण प्रसिद्धिला येऊ शकते.
जोपर्यंत आतल्या आवाजाचे स्मरण करणारे आणि काळजी घेणारे लोक अवतिभोवती असतील,जोपर्यंत त्यांचा आवाज दबला जाणार नाही,जोपर्यंत ते जागृत राहून पुढे सरसावतील तोपर्यंत रास्त गोष्टीना मरण नाही.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: