दुःखाची देवाण-घेवाण.

 

श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला.
गेल्या वर्षी मी त्याच्या घरी गेलो होतो ते त्याचं सांत्वन करण्यासाठी.त्याला त्यावेळी लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन पाहूण्याच्या आगमनाच्या बातमीने तो खूपच खूष झालेला दिसला होता.मुलाचा जन्म झाल्या नंतर ती त्याची खूषी जास्त दिवस टिकली नाही.दुरदैवानं ते मुल होता होताच गेलं.त्या धक्क्यातून सावरता सावरता हे दुसरं मुल पाहून मला सहाजिकच आनंद झाला.मला त्याच्या बरोबर त्या घटनेचा विषय काढायचा नव्हता.पण त्यानेच तो विषय काढला आणि म्हणाला,
“मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.गेल्या वर्षी झालेल्या घटनेची आठवण येण्यासाठी तुम्हाला पाहून मला अवसर मिळाला.
माझी पत्नी सातव्या महिन्यावर गरोदर होती.आणि तिचा रक्तदाब एकाएकी उंचावला.तिची लिवर बंद पडायच्या मार्गावर आली.तेव्हा डॉक्टरनी तिचं सिझरीन करून बाळंतपण कराण्याचं ठरवलं त्यामुळे आईचे आणि बाळाचे प्राण वाचणार होते.
पहिल्यावेळी जेव्हा माला माझ्या मुलाचं दर्शन झालं,ते त्याला इनक्युबेटर मधे ठेवलं असताना.त्याच्या नाकापासूनच्या श्वास नळ्या नर्ससीस साफ करीत होत्या.एखादा पाण्यातला मासा पहातो तसं त्याने मला पहिल्यांदा पाहिलं असा मला भास झाला.मी अशी कमजोर चिमुकली बेबी पहिल्यांदाच पाहिली असेल.
पुढल्या दोन आठवड्यात माझ्या पत्निची प्रकृती बरीचशी स्थिर झाली होती.पण माझ्या मुलाची स्थिती खपूच बिघडली होती.अपरिपक्वपणे जन्मलेल्या बाळाची फुफ्फुसं कोपर्‍यातल्या त्या कोळ्याच्या जाळ्यासारखी  नाजूक,कमजोर असतात आणखी हलक्याश्या दबावाखाली चक्काचूर होतात.क्षणभर मला वाटलं की मी त्याला माझ्याच छातीच्या आत ठॆवावं आणि माझी फुफ्फुसं देऊन श्वास घ्यायला मदत करावी.आम्ही त्या बाळाला आमच्या छातीजवळ घेतलं,त्याच्या इवल्याश्या कपाळ पट्टीवर हात ठेवला आणि शेवटी सगळ्या तारा आणि नळ्या दूर सरकवून त्याच्या हाताच्या मागे एकच बोट सरकवून हाताला आधार द्दायला यशस्वी झालो.
काही वेळाने त्याची फुफ्फुसं निकामी झाली आणि आम्हाला तो सोडून गेला.तो कधीच रडला नाही.मी आणि माझ्या पत्नीने दोघानी त्याला जवळ घेतलं, त्याला आंघोळ घातली,त्याचे केस पुसले,त्याला इवलेसे कपडे घातले आणि मग तो त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेला.एक देवदूत येऊन त्याने आमच्या मुलाच्या सभोवती हात घालून त्याला उचलून घेऊन जणू एखादं सोन्याचं नाणं खिशात ठेवतात तसंच ठेवलं असं माझ्या मनात आलं.त्यावेळी तुम्ही माझ्या घरी आला होता ते मला आठवलं.
जसे दिवसा मागून दिवस जाऊ लागतात,तसं तुम्ही डोळे मिटून तुमच्या दुःखाला एक एका बोटातून निसटू देऊन,अपरिमीत झालेली हानी तुमच्याच आत प्रस्थापीत करायला बघता.तुम्ही आणि तुमचं दुःख ह्या मधली ही देवाण घेवाण म्हटली पाहिजे.मनातल्या तणावाचा पूढे मागे होणारा हा एक झोका समजला पाहिजे.एखादी होडी पालथी होवून पाण्यात डुबून जावी असं जीवन वाटतं.सरते शेवटी तुमचं दुःख तुम्हाला स्थीर करतं,आणि आलेल्या वाईट परिस्थितीत  स्थैर्य निर्माण करतं.
मी एक चांगला पति आहे.तसाच चांगला बाप आणि चांगला माणूस म्हणून माझ्या हानीकडे मी पहातो.मी दयाशिल,आणि सहानुभूती ठेवणारा आणि जरूरी प्रमाणे गोष्ट करणारा आहे.आमचं लग्न नव्याने रुपाला आलं.आमच्या संबंधात असलेली घाण मुलाच्या मरणाच्या भट्टीत जळून गेली.आपल्या मुलाजवळ त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच्या सहवासात राहायला मिळणारं भाग्य थोड्याच भाग्यवान लोकांच्या नशिबात असतं.आणि माझा मुलगा त्याच्यावर प्रेम करणार्‍यांच्या बाहूपाशात राहून मग गेला.
आता दहा महिन्यापूर्वी माझ्या पत्निने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.आणि माझ्या मुलाच्या जाण्याने झालेल्या हानीची भरपाई माझ्या मुलीच्या जन्माच्या आनंदाने भरून आली.कारण आता आमच्याकडे काय राहिलं आहे त्याची आम्हाला जाणीव झाली.देवदूताने आपले दोनही हात फैलावले आहेत.जेव्हा माझी मुलगी माझ्याकडे पहिल्यांदा पाहू लागली तेव्हा मी तिला जवळ घेऊन सुखावलो.आता मी खूष आहे.
माझी पत्नीपण आनंदात असते.त्यामुळेच मी सुरवातीला म्हणालो की मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.”
मला त्याचं हे सर्व बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं.विषय बदलण्यासाठी मी लगेचच त्याला विचारलं ह्या मुलीचं नांव काय तू ठेवलंस.तो समजायचा ते समजून गेला.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: