Monthly Archives: डिसेंबर 2008

उदात्त आशयामागचं गुढ

  “अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.” “करून हे एव्हडे सारे कुणी जरी पडे आजारी सेवेच्या कर्तव्या सारखे कर्तव्य वाटे फारच न्यारे” मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद […]

पायी प्रवासातली मजा.

“मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं” श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी […]

मनोमन प्रार्थना.

  “कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं.” जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्ष कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.निवृत्त होण्यापूर्वी तिच्या जागी येणार्‍या एका बाईला ती आपलं काम समजावून सांगत होती.मी बाजूला बसून ऐकत होतो. लिखिते म्हणाली, नेहमीची आमची कामं करीत असताना सकाळी प्रथम आल्याआल्या आपल्यासारखीच छोटीमोठी काम करणार्‍या लोकाना भेटून […]

मी सरिता तु असशी सागर

चंद्रमाच्या चांदणीची ही जादू ही वेळ अन अशी ही रात्र ही लहर प्रीतिची नेई मला नसे माहित कुठे ते मात्र नको विचारू काय माझ्या मनी जोवरी साथ देशी तू मजशी माझेच ठिकाण नसे माहित मला तुझ्या तुच प्रीतित मला हरविशी माझे माझ्याच मनावर नसे भान का ते समझावया नसे मी पात्र ही लहर प्रीतिची नेई […]

नम्रतेचा अमुल्य धडा.

  “शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं.” माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी […]

मनुष्याची प्रतिष्ठा.

  “मला वाटतं,आपण आपल्याला पूर्णपणे विकसीत झालेलं,पूर्णपणे बुद्धिसंपन्न आधूनिक माणूस समजणं ही चूक होईल.आपलासर्व इतिहास,आपली खरी महानता,आपला सामजिक विकास,या गोष्टींचे अस्तित्व आपल्या पुढच्या भविष्यात आहे.” आज माझी आणि प्रो.देसायांची भेट त्यांच्या घरीच झाली.काल त्यानी मला निरोप पाठवून तळ्यावर भेटण्या ऐवजी,घरीच या असं कळवलं होतं.मी पृच्छा केल्यावर तुम्हाला उद्दां ते इकडे आल्यावरच कळेल असं म्हणाले.मी त्यांच्या […]

कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती

  लोक पुसती प्रीति किती तुजवरती कसे समजावू बलिदान प्राण केल्यावरती लोक पुसती प्रीति किती तुजवरती तुच जीवलग अन प्रेम तुझ्या मैत्रीवरती जीवश्च तू कंटश्च तू जीवलग मैतर तू मनी जे वसे ते ओळखिशी तू तुला भेटूनी भासे माझ्या मनाला आली जवळीक तुझ्या न माझ्या नात्याला ह्याहूनी उच्चतम असेल का जीवनी प्रीति कसे समजावू बलिदान […]

अधिक, अधिक आवडणारं जग.

  ” मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही मानवाला ते सोसावे लागत असतानाही सुखही साध्य होण्याजोगं आहे.” मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं.त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला […]

जीवनगृहाची घडण.

  “मला वाटतं,प्रेम,करुणा,आणि सत्य ही मनुष्यजातिची सामाहिक सम्पती असावी.जीवन हे आत्माच आहे आणि आत्म्याला कुठलीच सीमा माहित नसते.” डॉ.संजय धारणकरची आणि माझी जूनीच ओळख आहे.कारगीलची लढाई सुरू झाल्यावर त्याने एका फार्मसीटीकल कंपनी मधली नोकरी सोडून सैन्यात भरती करून घेतली.देशप्रेमाच्या भावनेने भारावून जाऊन सैन्यात दाखल होऊन जखमी सैनिकांची सेवा करायची कल्पना त्याच्या मनात आली.जरूर वाटली तर […]

रामदुलारीला राग का आला?

  रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली. त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला […]