दूर असूनी सजण माझा भासे कसा तो जवळी

कधी हंसवी कधी रडवी
ही कसली गं! प्रीति
कधी घडवी कधी मिटवी
ही कसली गं! प्रीति
का न समझे वेडे मन माझे
ही कसली गं! लाचारी
का खळबळे हृदय माझे
ही कसली गं!  धास्ती

जे स्वप्न पाहिले जागेपणी
ते आले कसे गं!  वास्तवात
जरी सर्व काही मी गवसले
तरी भासे कसे गं!  हरवले
का प्रभाव झाला उन्मादाचा
क्षण आला जीवनी लहरण्याचा

ही कसली गं!  प्रेमासक्ति
ही कसली गं! अनुभूती
दूर असूनी सजण माझा
भासे कसा तो जवळी
कसे श्वसन झाले चंदनी
का मिळावी मला खूषी
का खळबळे हृदय माझे
ही कसली गं! धास्ती
कधी हंसवी कधी रडवी
ही कसली गं! प्रीति

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. sadashiv Patil
    Posted नोव्हेंबर 24, 2011 at 4:23 सकाळी | Permalink

    Dhanywad. You told about truth. Guru, god , grace & you are one.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: