“विविधतेतून अखंडता”

 

“क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत.
“जगात असलेलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं.”

प्रो.देसायांच्या एका नातीचं सर्व आयुष्य कलकत्यात गेलं.कारण भाऊसाहेबांचा एक जांवई कलकत्याचा.अर्थात ह्या कुटूंबावर बंगाली रीतीरिवाजाची बरचशी छाप पडली होती.एकदा ती माझ्या घरी राहायला आली होती.मला म्हणाली,
“काका,मला सकाळी सकाळीच उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे.”
मी तिला म्हणालो,
“संध्याकाळी,जुहू चौपाटीवर जाऊन आपण मावळत्या सूर्याचं दर्शन पोटभर घेऊ शकतो.पण उगवत्या सूर्याचं दर्शन तुला कलकत्या सारखं सकाळी सकाळीच मुंबईत दिसणं जरा कठीण.आणि आमच्या फ्लॅटमधून तर नक्कीच कठीण.नऊ नंतर सूर्य वर आल्यावर नक्कीच दर्शन होईल.”
त्यावर ती मला म्हणाली,
“कलकत्यात आज सूर्यपूजेचा सण असतो.त्याची मला आठवण झाली.कलकत्यात राहून बंगाली प्रथा मला जास्त परिचयाच्या झाल्या आहेत.”
मी तिला म्हणालो,
“हा सूर्यपूजेचा सण काय खास गोष्टीसाठी करतात.?”
मला म्हणाली,
“बंगाली लोक सूर्यावर भरवंसा करतात.मानवाच्या अनेक समस्यामधे भितीची,लोभाची,आणि विसरभोळेपणाची  विफलता पाहून सूर्य त्यांना असंदिग्ध संदेश देतो. जेव्हा शोधकर्त्यांची  मुळ-मानवाशी गाठ पडली तेव्हा त्याना पाहून त्यानी त्याना सूर्यपूजक म्हटलं. सूर्याशी आपलं नातं आहे आणि सूर्य ह्या धरतीवरचा मार्ग सदैव प्रकाशित करतो.
आपल्यातले बरेच लोक ज्या विधी करतात त्या सूर्याशी आपलं असलेलं नातं सुनिश्चित करण्यासाठी करीत असावे.
रात्रभर गोलाकार करून नाचल्याने आपल्याला जाणीव होते की आकाशातल्या त्या सूर्यमालेचा आपण एक भाग आहो. मानवजात असुरक्षित आहे आणि सूर्याच्या आणि धरतीच्या कृपेवर आपलं अस्तित्व निर्भर आहे.आणि हे अस्तित्व त्या पवित्र क्षेत्राच्या उद्देश्यामुळे आहे.मागे मी एका कोकणातल्या खेड्यात गेले होते. तिथे एक धार्मिक कार्यक्रम चालू होता.तो सूर्याच्या संबंधाने होता.सूर्याला तो एक आवश्यक सन्मान देण्याचा नम्र प्रयत्न होता.
आपल्या पृथ्वीचं स्थानांतर होत आहे.ते उघड दिसत आहे.धृवावर रहाणार्‍या लोकांकडून दृष्टप्तिला आणलं जातय की सर्व काही बदलत आहे.तिकडे खूप गरम होत आहे.भरपूर अशी थंडी पडत नाही.स्थाईक प्राणी अस्त-व्यस्त झाले आहेत.तिकडचा बर्फ वितळत आहे.
क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत.
“जगातलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं.”
हे लक्षात आल्यावर पृथ्वीच्या होणार्‍या लड्खडाहटला काही तरी अर्थ येतो.पृथ्वीच्या पोटातून किती म्हणून खनिजतेल काढलंजावं की त्याला काही बदलावच नसावा.
अलिकडेच मी एकदा कलकत्याला माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते.माझ्या मैत्रिणीच्या नातीचा जन्म होऊन चौथा दिवस झाला होता.बंगाली लोकात नवबालकाला चौथ्यादिवशी उगवत्या सूर्याचं दर्शन देतात. तिला घेऊन आम्ही दोघं हुगळी नदीच्या काठावर गेलो होतो.त्या नवबालकाला सूर्याशी नातं जोडण्याच्या कल्पनेने प्रदान करण्याचा विधी करायचा होता.ढगानी आकाश आच्छादलेलं होतं. थोडा काळोखही होता.थोडा थोडा पाऊसही पडत होता.काही वेळाने सूर्यदर्शन झालं. माझ्या मैत्रिणीने तिच्या नातीला वर उचलून घेऊन सूर्याचं दर्शन दिलं.आता तिचं सूर्याशी नातं जुळलं होतं.आणि यापुढे ती तिचं नातं विसरणार नाही.आणि आम्ही दोघंही ही जीवनाची पवित्रता आठवणीत ठेवणार होतो.”

ही तिची सर्व माहिती ऐकून माझ्या मनात आलं की आपल्या अखंड देशात किती लोक किती विविधतेचे रीतिरीवाज करीत असतात.बंगाली लोकांची हे प्रथा मला प्रो.देसायांच्या नातीकडून कळली.आणि तिला पण तिच्या आईचं एका बंगाल्याशी लग्न झालं म्हणून ही प्रथा कळली.

“विविधतेतून अखंडता” असं काहीसं म्हणतात हे खरं आहे.

 

 
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. Posted जानेवारी 29, 2009 at 3:49 सकाळी | Permalink

  तुम्ही खुपच छान लिहिता हो..

 2. Posted जानेवारी 29, 2009 at 10:29 pm | Permalink

  नमस्कार महेंद्र कुलकर्णी,
  आपल्याला माझे लेखन आवडतं हे वाचून बरं वाटलं.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
  सामंत


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: