मनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.

आज तळ्यावर प्रो.देसायांबरोबर त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रो.गंगाधर तेंडूलकर पण आले होते.ह्यांच नांव मी फार पूर्वी ऐकलं होतं.पण त्यांचा शिकवण्याचा विषय जरा मला जटिलच वाटायचा.पण आता एव्हड्या वर्षानी त्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना सरळच प्रश्न केला,
“तेंडूलकरजी,ऍनथ्रुपोलॉजीस्ट म्हणजे काय हो? त्याला मानव-वैज्ञानीक असं म्हणतात एव्हडं मला माहित आहे.तुमची जर हरकत नसेल तर जरा विस्ताराने सांगाल काय?”
“सांगाल काय? अहो त्यासाठीच मी ह्यांना तळ्यावर घेऊन आलोय.ते आनंदाने तुम्हाला सांगतील.”…….प्रो.देसाई मला म्हणाले.
प्रो.तेंडूलकर सांगू लागले,
“लहान मुलं खेळ खेळताना असा एक खेळ करतात.एकाएकी अंगुलीनिदर्शन करून कुणालाही “तुम्ही कोण ?” असं विचारायचं. आणि काही लोक उत्तर देताना सांगतात, “मी मनुष्य आहे” किंवा काही आपली प्रांतियता सांगतात किंवा कुठच्या धर्माचा ते सांगतात.
जेव्हा हा प्रश्न मला विचारला गेला तेव्हा मी म्हणालो “मी मानव वैज्ञानीक”  (ऍनथ्रुपोलॉजीस्ट) आहे.मानव-विज्ञान म्हणजे मानवी जीवनातल्या सर्व क्षेत्रातला म्हणजे मानवाचा उगम,त्याचं चलनवळण,त्याचा शारिरीक,सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा विकास ह्या गोष्टींचा अभ्यास. आणि हे करण्यासाठी सर्व तर्‍हेने आणि सदासर्वकाळ वचनबद्ध राहून झाल्यावर, जेव्हा मी एक व्यक्ति म्हणून जो मला समजतो आणि त्याबद्दल बोलतो, जेव्हा मी मानव-वैज्ञानीक पण आहे हे विसरून जाऊन मला मी निराळा करूं शकत नाही तेव्हा मी मानव-वैज्ञानीक होतो.

मनुष्याला समजून घेताना तो मनुष्य इतर प्राणी मात्रातला एक आवश्यक भाग आहे असा विचार झाला पाहिजे.
आपली मानव जात जटिल जैविक संरचनेवरच -जी युगायुगातून अगदी सामान्य राहून  विकसीत झाली आहे-त्यावर अवलंबून आहे असं नसून उलट महान सामाजीक अविष्कार जे मानवानेच निर्माण केले जे कधीही विस्मरणावस्थेत जाऊ नये म्हणून मानवाने काळजी घेतली आणि त्याउप्पर जावून विकसीत करणारा, विचारवंत,राजनीती-विशारद,कलाकार, भविष्यद्रष्टा म्हणवून घेण्यासाठी   मानवानेच मानवाला महत्ता दिली त्यावर ही अवलंबून आहे.
 
मला वाटतं,हे महान शोध,भाषा,कुटूंबव्यवस्था, उपकरणांचा उपयोग, शासनप्रणाली, विज्ञान,कला आणि तत्वज्ञान ह्यांच्या अंगी अशी गुणवत्ता आहे की ती प्रत्येक मानवाच्या स्वभावाच्या क्षमतेला संमिश्र करू शकते.आणि ही प्रत्येक गोष्ट शिकून तशीच्या तशी राखून ठेवायला कुठचाही मानवी समुह तयार असतो.मग ज्यात त्यांचे जनक राहिले ती जात, संस्कृती कुठलीही का असेना.आणि एखादं नवजातबालक एखाद्दा मागासलेल्या जमातीतलं असलं जरी तरी ते मूलभूत दृष्ट्या एखाद्दा नावाजलेल्या विश्वविद्दालयातून पदवीधर व्हायला,एखादा कवितासंग्रह लिहायला,किंवा एखादा मूलभूत शोध लावायला सक्षम असू शकतं.

तरी पण मला वाटतं,की एखाद्दा मुलाचं कुठल्याही देशात पालन-पोषण झालं, तरी ते त्या देशातले संस्कार अंगिकारतं,आणि ते संस्कार दुसर्‍या देशातल्या अशाच पालन-पोषण केलेल्या मुलाच्या संस्कारापेक्षा इतके वेगळे असतात की त्यातले भेदभाव समजून घेऊनच मग आपल्याला फरक कळतो.आणि त्यातूनच आपल्याला मानवाच्या विधीलिखीतावर नवीन नियंत्रण आणता येतं.

मला वाटतं मनुष्याचा स्वभाव तात्विक रुपाने चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो. परंतु,व्यक्तिरूपाने पाहिल्यास जो जन्माला येतो तो संमिश्र क्षमता घेऊन येतो.आणि हा स्वभाव त्या व्यक्तिंच्या पालनपोषणाने – प्रेम आणि विश्वास कसा वाढवतात, परिक्षण,निर्मीती कशी करतात,किंवा शंकीत राहून,द्वेष करून ,किंवा कुणाच्या अनुसराने कसे वागतात- ते कसे माणूस बनतात हे ठरतं.

मला वाटतं,अजून आपण मानवाच्या क्षमतेला चाचपडायलाही सुरवात केली नाही.आणि म्हणून नम्र राहून,सतत माणसाच्या चालचालवणूकीचा अभ्यास करून जागरूत राहून संपन्न समाज निर्मीती करून जगत असताना वाढत्या प्रमाणात लोकाना त्यांच्यात कोणत्या पूर्ततेचा आभाव आहे याची जाणीव व्हायला सुरवात होईल.
मला वाटतं,माणसाच्या जीवनाला अर्थ तेव्हा येतो की जेव्हा तो त्याचं नातं, व्यक्तिगत ध्येय, संपन्न समाज,काल आणि कोणत्या देशात राहतो ह्याच्याशी तो निगडीत असतो.आज त्याचा अर्थ असा होईल की आपण आपल्यावर ह्या जगाच्या निर्मीतीच्या कामाचा भार अशा तर्‍हेने घेतला पाहिजे की आपलं भविष्य सुरक्षित आणि मुक्त राहिलं गेलं पाहिजे.”
हे सर्व सांगून झाल्यावर प्रो.तेंडूलकरानी आपल्या हातातलं पुस्तक वाचायला मला दिलं.
नांव होतं.
“मनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.”
लेखक- प्रो.गंगाधर तेंडूलकर.
मी ते आता वाचायला घेतलंय.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: