वर्तमानात राहाण्याचा फायदा.

 

“अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं.”

किशोर पाटलाचा भाऊ एव्हड्या तरूण वयात आत्महत्या करील असं वाटलं नव्हतं. मी किशोर पाटलाला योगायोगानेच एकदा ठाण्याला गेलो होतो तेव्हा भेटलो. गोविंदराव सामंतांच्या घरी ते एम.एच हायस्कूल मधून निवृत्त झाले म्हणून निरोपाची पार्टी होती.गोविंदराव माझ्या पत्नीच्या मावशीचे यजमान.त्यांचे अनेक विद्दार्थी ह्या पार्टीला आले होते.
किशोर पाटलाची माझी जूनी ओळख होती.पण मुंबईतल्या झकाझकीच्या आयुष्यात कुठली भेट व्हायची.अशाच काही प्रसंगातून योगायोग आला तरच.मी त्याच्या भावाचा विषय काढला नाही.मला त्या पार्टीत त्याला निरूस करायचं नव्हतं. पण माझी आणि त्याच्या भावाची चांगलीच गट्टी होती ते किशोरला माहित होतं.म्हणूनच तो म्हणाला,
सहा वर्षापूर्वी माझा धाकटा भाऊ,जो माझा खरा मित्र होता,आणि आमच्या अगदी जवळच्या नात्यातला उरलेला सदस्य होता त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला होता. यापूर्वी कधीही मला असा अनुभव जाणवला नाही किंवा त्यानंतर सुद्धा असा अनुभव जाणवून पण माझा विश्वास बसण्यासारखा हा मला अनुभवाचा प्रचंड धक्का होता.
तोपर्यंत,जीवन नेहमी माझ्या बाजूला सरकायचं.माझं मन हे काय झालं याचा आढावा घेण्यात हरवून जायचं,किंवा भविष्यात काय होईल यासाठी अपेक्षीत राह्यचं. माझं वर्तमान, भविष्यात आणि भूतकाळात गायब झाल्यासारखं भासलं.जे जीवन आपण उपभोगतो ते मुळातच आंखूड असतं.ते जीवन जेव्हडं आपण हरवून बसतो तेव्हडं ते कमीच होत जातं.
मी माझ्याशीच प्रतिज्ञा केली की माझ्या भावाचा मृत्युचा सन्मान करायाचा झाल्यास मला माझ्या जीवनात वर्तमानातच राहावं लागणार.मला दिसून आलं की नव जग माझ्या समोर खुललं गेलं आहे.जे जीवन विस्ताराने समृद्ध होतं.ते व्यापक होतं आणि उजाडही होतं. चिंतन करण्याची, पर्वा करण्याची,दूरदर्शितेची आणि क्रियाशिलतेची माझी संभवता वाढली. जे बोलायचंतेच निशःब्द राहिलं.
वर्तमानात राहणं सोपं नाही.एखाद्दा चांगल्या दिवशी मी एक दोन टक्के जागरूत राहायचो.उरल्यावेळात मी प्रतिक्रिया द्दायचो.बहुदा त्या प्रतिक्रिया प्रत्यक्षपणे विचारपूर्ण नसायच्या.त्या केवळ प्रतिसादात्मक असायच्या.
अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं.
प्रतिक्रिया न देण्यात जास्त परिश्रम लागतात.आणि जेव्हडं म्हणून मी असं करायला जायचो तेव्हडं मला मीच जास्त आकांक्षा करतोय असं वाटायचं.
मला दिसून यायचं की माझं स्वतःचं मनच माझी सीमा असायची.ज्या काही मनात कुठल्याही गोष्टीच्या संभवता यायच्या त्या आपल्या आवाक्याबाहेर आहेत अशी मी समजूत करून घ्यायचो.त्यांची आशा करणं शक्यतेच्या पलिकडचं आहे आणि त्यावर विश्वास ठेवणं विक्षिप्त वाटायचं. पण जर का त्या घडवून आणण्य़ाच्या आपल्या क्षमतेवर विश्वासच ठेवला नाही तर त्या कधीच घडणार नाहित हे नक्की.
माझ्या लक्षात आलं की जे मी वर्तमानात राहाण्याचं मनात ठरवलं होतं-म्हणजेच जे आजूबाजूला होत आहे त्याच्यावर केंद्रित राहणं-ते पायाभूत होतं.
माझ्या भावाची आठवण येऊन मी नेहमीच रडत असतो.अनेक गोष्टी मधली ही एकच गोष्ट की ज्या साठी मी माझे डोळे अश्रूनी भिजवत असतो. त्याच्या बरोबर राहून मी अनेक संध्या घालवल्या कारण मी त्याच्याबरोबर वर्तमानात नव्हतो. त्या घालवलेल्या संध्या मला पुन्हा कधीच मिळणार नाहीत.एक ना एक मार्गाने तो वर्तमानात पूर्ण हजर असायचा.त्याला  दुसरा कसलाच मार्ग माहित नसावा. आता मला माझं जीवन जे कमी झालं त्याहून आणखी कमी करायचं नाही. वर्तमानात राहून, जागरूत राहून,अवगत करून आणि डोळे उघडे ठेवून राहिल्याने मला वाटतं मी माझ्या भावाचा सन्मान करीत राहीन.रोजच अगदी थोडा का होईना.”
किशोर पाटलाला मी “स्टिम-आऊट होऊं दिलं.मला माहित होतं की त्याचं जे वर्तमानात राहण्याचं मन होतं ते माझ्याकडे त्याला उघड करायचं होतं. प्रसंग जरी थोडा वेगळा असला तरी.
त्याचं सर्व सांगून झाल्यावर मीच त्याला म्हणालो,
“किशोर,खरोखरंच तुझी विचारसरणी मला आवडली.मुख्य म्हणजे तू म्हणतोस ते,
“जे जीवन आपण उपभोगतो ते मुळातच आंखूड असतं.ते जीवन जेव्हडं आपण हरवून बसतो तेव्हडं ते कमीच होत जातं.”
सामंतसरांच्या पार्टीची मजा मिळालीच त्याउप्पर तुझ्याकडून जो संदेश मिळाला तो लाख मोलाचा ठरला.”
किशोर पाटिल खूष झालेला पाहून मला ही आनंद मिळणं उघडच होतं.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: