ऋण काढून सण

प्रोफेसर देसाई आज जरा खुषीत दिसले.मला म्हणाले,
 “सामंत, तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी  तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चं “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटतं बघा.
त्या फन साठी ते असलेल्या पैशाची चंगळ करतात. दिवाळखोरी झाली तरी त्याना हरकत नसते.चंगळ करण्याचं काही झालं तरी सोडणार नाहीत.आहे की नाही गंमत? त्यांची “एकॉनॉमीच” म्हणे तशीच आहे.क्रेडीट कार्डावर कर्ज घ्या. फेडायचा विचार सध्या करूं नका.कमीत कमी हाप्ता फेडत चला.पुढचं पुढे.त्यामुळे जो तो आपला  पैसा खर्च करतो.गिफ्ट द्दा, गिफ्ट घ्या पण खरेदी करा.

अहो,प्रे.बुशने तर ९/११ झाल्यावर चक्क सांगितलं,
“खर्च करा,घरी बसू नका.हिंडा फिरा.”
शेवटी पैशासाठी हवरटपणा एव्हडा वाढला की कुणाची पैसे परत फेडायची लायकी असो वा नसो “कर्ज काढा, घरं घ्या” असा संदेश देत कर्ज देणारे मागे लागले.आणि शेवटी काय झालं सर्व एकॉनॉमी कोसळली. आणि आता पुढचं रामायण सर्वश्रूत आहे.आता सगळे “बचत करा बचत करा” म्हणून सांगायला लागलेत.
अहो आपले संस्कार म्हणजे काटकसर करा.अंथरूण बघून पाय पसरा.पैशाचा अपव्यय करूं नका.बचत केलीत तर कधी पुढे अडीअडचणीत तिचा उपयोग होईल.ऋण काढून सण करूं नका.सर्वच दिवस सारखे नसतात…..वगैरे वगैरे एक ना दोन सांगणी असतात.
ह्या विषयावर एखादी कविता सुचते का बघा
पुढल्या खेपेला आपण भेटू त्यावेळी वाचून दाखवा.”

असं म्हणून ते निघून गेले.जरा गंमत म्हणून मग मी ही कविता लिहीली.

अमेरिकन फन

पैसा पाण्या सारखा असतो
जैसा येतो तैसा जातो
शहेन्शहा शहांजहा म्हणे
ऐष- आरामात रहात असे
करातून आलेल्या मिळकतीतून
पैशाचा ओघ होत असे
मुम्ताजसाठी ताजमहाल बांधायला
त्याला कसलीच अडचण नसे
आपले बुजुर्ग सांगत आले
काटकसरीचा बांध घालून
पैश्याचा अपव्यय थोपवावा
फन करून मन सूखावते
झरा आटला की पाणी संपते
पैसा घटला की सर्वच संपते.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: