एकांती होतील गुजगोष्टी तुला आठवून

मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी
प्रीतिचे भाग्य बनवीले माझ्या विलापानी

नेत्रातल्या अश्रूंना पापण्यानी सावरले
रक्तातल्या शाईने चित्र तुझे रेखाटले
भेटण्या सजणा पाहिले उपाय करूनी
मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी

श्रावणातल्या सुरम्य रात्री करीती बेचैन
एकांती होतील गुजगोष्टी तुला आठवून
वेडी होऊन मीच मला बांधिले शृंखलानी
मुर्ती तुझी बनवीली माझ्या आंसवानी
प्रीतिचे भाग्य बनवीले माझ्या विलापानी

 
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

3 Comments

 1. Posted एप्रिल 2, 2009 at 4:40 सकाळी | Permalink

  सुंदर कविता आहे. कूणाची आहे ओरिजिनल कविता?

 2. Posted एप्रिल 2, 2009 at 9:56 सकाळी | Permalink

  हलो महेंद्र,
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
  हे गाणं “देख कबिरा रोया” ह्या हिंदी चित्रपटातलं असून ते कवी राजेंद्रकृष्ण यांच असून ते आशा भोसले यानी गायलं असून त्याचं संगीत मदन मोहन यांनी केलं आहे.
  “अश्कों से तेरी हमने तस्वीर बनाई है” ह्या ओळीने गाण्याची सुरवात आहे.

 3. Posted एप्रिल 2, 2009 at 4:21 pm | Permalink

  अरे हो… किती वेडा आहे मी.. हजारदा ऐकलं असेल ते गाणं, पण लक्षात नाही आलं. तसाही मदन मोहन माझ्या आवडिचा संगितकार. धन्यवाद जुन्या आठवणी जाग्या करुन दिल्या बद्दल..


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: