कृतज्ञतेवर माझा विश्वास आहे.

आज मी व प्रो.देसाई आमच्या एका सामूहिक मित्राच्या घरी गेलो होतो.खरं तर हा आमचा मित्र आता ह्या जगात नव्हता.पण त्याची एकूलतीएक मुलगी त्या घरात राहात होती.तिलाच भेटायला म्हणून गेलो होतो.

अलिकडे आमचा हा मित्र-अनिल धायगुडे- वरचेवर आजारी पडायचा.आता वयोमानामुळे आजार येत राहणं क्रमपात्र होतं,पण अनिलला जरा जास्तच त्रास होत होता.मुळात त्याला मधूमेहाची बाधा होती.हा छूपा रोग एव्हडा भयंकर आहे की तो सर्व शरिर निरनीराळ्या कारणानी खाऊन टाकतो.आणि बरेचवेळां स्थूल शरिरयष्टी असली की मधूमेहाचा शिरकाव हटकून होतो.

तशात त्याच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या.त्याशिवाय त्याच्या किडण्यापण नीट काम करीत नव्हत्या.
असं असतानाही तो एका अर्थी नशिबवान समजला पाहिजे. जाण्यापूर्वी त्याला त्याच्या नातीचं तोंड बघायला मिळालं. आपल्याच नातवंडाकडून आजोबा म्हणून घेण्याची त्याला फार इच्छा होती.
त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या मुलीने- मृदुलाने- आमचं स्वागत केलं.
अनिलच्या आजाराच्या संदर्भाने ती बोलल्याचं मला आठवतं,
“माझ्या बाबांना जरी रोगांनी पछाडलं होतं तरी पहिलं नातवंड बघण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचं पाहून त्यांच्या मनाला समाधान मिळालं होतं.कुठच्याही आईवडीलाना नातवंडाची इच्छापूर्ती होण्यासाठी कसलाही आजार सहन करण्याची तयारी असणं स्वाभाविक आहे.”
मी मृदुलला म्हणालो,
“मला आठवतं,त्याच्या बरोबर मी एका फर्निचरच्या दुकानात जाऊन सुंदर पाळणा विकत घेतला होता.तो घरी आणून त्याने लागलीच ऍसेंबल केला होता.”
हे ऐकल्यावर मृदूल पटकन म्हणाली,
“मी त्यांची ती पाळणा ठिकठाक करण्याची धडपड पाहून त्यांना म्हणाले होते,
 “बाबा तुम्ही तुमच्या नातीला ह्या पाळण्यात झोपलेली पाहून खूपच खूष दिसता. पण असा विचार करा की अलिकडच्या तुमच्या जीवघेण्या आजारातून वाचण्यासाठी आणि त्यातून बरं होण्यासाठी तुम्ही केलेली धडपड आज नातीचं तोंड पाहून पूर्ण फळाला आली.असं नाही का तुम्हाला वाटत.?
त्यावर मला माझे बाबा म्हणाले ते मला अजून आठवतं,
” तिच्यासाठी मी त्या दुखण्यातून परत जायला तयार आहे”
प्रो.देसाई तिला म्हणाले,
” मला वाटतं,त्याला एक प्रकारची कृतज्ञता वाटत होती की ही इवलीशी बेबी त्याला पहायला मिळाली. आणि तिच्यासाठी तो जगू शकला.आणि त्यासाठी तो किती ही कष्ट झेलायला तयार होता.”
“ती वर्षाची झाल्यावर तो गेला असेल नाही का?”
मी मृदुलला विचारलं.
ती म्हणाली,
“हो ती वर्षाची झाल्यावर ते गेले.पण माझे बाबा त्यांच्या इच्छेनुसार गेले.ते आजारात ताटकळत राहिले नाहीत,आणि त्यांना कसल्या वेदनापण सहन कराव्या लागल्या नाहीत.त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं त्यांच्या अवतिभवती होती.आणि ते पण त्यां सर्वांवर प्रेम करायचे.”
मी मृदुलला म्हणालो,
“त्याच्या जाण्याने तुला खूपच शॉक बसला असेल.कारण तू त्यांची खूप आवडती होतीस.”डॅडीझ गर्ल” नव्हे काय?”
त्यावर ती म्हणाली,
“सुरवातीला मिळालेला दुःखाचा धक्का ओसरल्यावर, मी हळू हळू नेहमीच्या कामात ध्यान देऊ लागली. पण त्याने मला बरोबर वाटत नव्हतं.कारण भरपूर असं वाईट वाटत नव्हतं.मी त्यांच्या जाण्याच्या दुःखाने उजाडून जाईन अशी माझी अपेक्षा होती.तुम्ही म्हणता तशी मी”डॅडीझ गर्ल “होती.माझ्या नजरेत “त्यांच्याकडून कधीही चूक होणे नाही.”आणि शिवाय माझ्यासाठी त्यांच्या मनात गहरी समज होती.माझ्या मनोमनी होतं की सदैव मी त्यांच्यावर निर्भर होते, त्यांच्या मदतीसाठी,  किंवा त्यांच्याकडून मिळणार्‍या करुणामय ध्यानासाठी.”
भाऊसाहेब म्हणाले,
“मला आठवतं तू काही दिवस तांबेगुरुजींचा सल्ला घेण्यासाठी येत होतीस,मला तू तिथे भेटायचीस.त्याचं काय झालं?”
भाऊसाहेबांना चांगलंच आठवतं ते लक्षात येऊन ती म्हणाली,
“हो तुम्ही तिकडे मला भेटायचा ते मला आठवतं. जोरदार दुःखाच्या धक्क्याच्या आभावी माझ्या मी मला भयानक अपराधी समजायला लागले. म्हणून मी गुरुजींचा सल्ला घ्यायला जायची.पण त्यानी जे मला सांगितलं त्याचं आश्चर्यच वाटलं.
गुरूजी म्हणाले,
“माझं ते दुःख ही एक सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.ज्या कुणाशी चांगले संबंध असतात त्यांची अशीच प्रतिक्रिया असते.”
“आणि पुढे जाऊन गुरूजी म्हणाले,
ज्या संबंधांमुळे शब्द निःशब्द होऊन रहातात,आणि आकांक्षा अधुर्‍या रहातात ते संबंध वादळी विसंबंधन आणून जहरी दुःखाला निमंत्रीत करतात.एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतर अचानक कसलीच सुधारणा होऊ शकत नाही.मग आपल्याला आपल्या संबंधातला दुरावा आणि त्याचं विभेदन दुसर्‍या कसल्याही प्रकारापेक्षा तीव्रतेने जाणवतं ”
मी मृदुलाला म्हणालो,
“हे गुरुजींचे सुविचार ऐकून तुझ्यावर काय परिणाम झाला?”
ती म्हणाली,
“तत्तकाळ मी जे भाकीत करीत होते त्यापेक्षा काहिसं प्रबळ वाटायला लागलं. आणि ते भाकीत म्हणजे कृतज्ञता.
मी कशासाठी कृतज्ञ असावं?माझ्या बाबांचा विचार केला तर त्यांच्याबद्दल कसल्याही वाईट स्मृतिंचा पगडा माझ्या मनावर नव्हता.
त्यांनी कसलाही पक्षपात केला नव्हता,नव्हेतर प्रेम आणि शब्दपण रोखून ठेवले नव्हते. साध्या साध्या गोष्टीवर ते त्यांचं ध्यान केद्रीत करायचे नव्हेतर ज्या गोष्टी साध्या भासायाच्या त्यावर ते भान केंद्रीत करायचे,जश्या कुटूंब, शिक्षण  ,मेहनत,सहनशीलता.
ह्या गोष्टीवर ते ध्यान ठेवायचे आणि ह्या गोष्टी अध्यारत आहेत असं ते कधीही मानत नव्हते.

एखादी व्यक्ति आपल्या अख्या जीवनाची संरचना आपल्या प्रेमळ व्यक्तिच्या हानिच्या धक्क्यापासून मुक्त ठेऊ शकते,आणि तिथपर्यंत पोहोंचण्याचं टाळू शकते. हे बघून मी मला भाग्यवान समजते.”
बराच वेळ गप्प बसून एकणारे भाऊसाहेब बोलते झाले.म्हणाले,
“ह्याचा अर्थ मृदुला,कृतज्ञता ही आनंददायी आणि मुक्त करणारी आहे.त्यावर माणसाचा विश्वास हवा.”
मृदुलेला ते ऐकून सतर्क व्हायला संधी मिळाली. आणि म्हणाली,
“माझ्या बाबांनी मला जे काय केलं त्याची मी निश्चितच परतफेड करू शकत नाही.पण मी एका गोष्टीचा दिलासा घेऊ शकते की त्यांच्याकडून मिळालेलं खरं इनाम म्हणजे त्यांनी मला जे काही दिलं ते परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलं.मी कृतज्ञ होऊन सांगेन की माझ्या बाबांची स्मृति मी कोणत्याही तर्‍हेचं दुःख मनात न ठेवता अनुभवते.
रोज मी खरी उदासिनता अनुभवते,जास्त करून जेव्हा मी माझी मुलगी वाढत असताना पाहून.आणि मनोमन विचार करते माझे बाबा हे अनुभवायला हयात असायला हवे होते. पण ह्या विचाराबरोबर कृतज्ञतेचा विचार येऊन मनात येतं,की शेवटचं आणि कदाचीत अत्युतम इनाम आईवडील आपल्या मुलांना देतात ते म्हणजे-पराधीन न रहाता पूढे जाण्याची क्षमता.

 

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: