स्वप्न

(ॠणनिर्देशः हिंदीत,मराठीत,आणि इंग्रजीत लिहिणारे कवी आणि
“वाचून बघा”
ह्या ब्लॉगचे लेखक श्री. सतीश वाघमारे यांच्या  “ख्वाब” ह्या हिंदी कवितेचा अनुवाद.)

स्वप्न

पहात आलो अनेक दिवस हे स्वप्न मी
तुजसम होऊन मलाच पाहिले मी
ह्या नयनातून त्या नयनात न्याहाळले मी
त्या मलाच तू पाहिलेस माझ्यातला मी

ऐटबाजी नजरफेक अन हास्याचे ताने
नखर्‍यांचे खंजीर अन निष्पापी बहाणे
पवनाचे पण आता असेच होई सतावणे
आणूनी सुगंधा फिरूनी होई माझे लुभावणे

दिनभर ही तुझी भ्रांती दर्शनाची
तुझी नी माझी रात्र असे स्वप्नाची
सांगाया दे स्मृती अपुल्या शपथेची
दाखव जरा असेल जर घडी विरहाची

मानले अजूनी जरी अतीव अंतरे असती
पाहूया दैवाची कोणती असे अनुमती
उमेदीची नित्य नवी अवलोभने वाढती
प्राप्त तुलाच करण्या उत्तूंग अभियाने येती

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

 1. वाचून बघा
  Posted जून 9, 2009 at 11:31 सकाळी | Permalink

  सामंतसाहेब,

  मराठी रुपांतर आवडलं — अनुवाद करुन माझ्या रचनेचा सन्मान केलात, आभारी आहे !

  सतीश

 2. Posted जून 10, 2009 at 7:53 सकाळी | Permalink

  नमस्कार सतीश,
  प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: