Monthly Archives: ऑगस्ट 2009

मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.

  आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले. “तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं” असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं, “घरी सर्व ठिक आहेना?” “ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी […]

पांढर्‍याचं काळं.

त्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं. आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं […]

आयुर्वृद्धितली सूंदरता.

गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची. तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. मला म्हणाली, “तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी […]

अतुलचा भयगंड

आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच  जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत. “ह्याचं पुढे कसं होणार?” ही त्यांची नेहमीचीच काळजी. मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो, “जसा […]

या सुखानो या!

आज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.एकमेकाची आम्ही चौकशी केली.नेहमी प्रमाणे ते प्रो.देसायाना ओळखत होते.आपण प्रि.वैद्य अशी ओळख करून दिल्यावर माझ्या लक्षात आलं पूर्वी मी ह्यांना माझ्या घरी ते भाऊसाहेबांबरोबर […]

सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला

तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला फुलाला खुलवूनी खुलविले सार्‍या बगिच्याला तू सूर्य अन मी सूर्यमुखी रे सजणा कसा जाईल दिवस माझा तुझ्याविणा सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला विलक्षण असती हे अनुबंध सजणा बंध बांधले तुझे न माझे धाग्याविणा हातात घेऊनी हात जाऊया फिरायला तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला न होवो […]

अद्भुत प्रकाराचा अनुभव.

“मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको.” फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला. समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून […]

माझ्या भूताला माझे धन्यवाद.

“मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं.” “लेखिका सौ.मालती मुकुंद प्रभू” असं लेखाच्या खाली नांव असलेला एक लेख मी अलीकडेच एका लोकल मासिकात वाचला.गोष्ट भूताची होती.आणि वातावरण आणि परिसर कोकणातला होता. कोकणात भूताखेताच्या,देवचाराच्या,संबंधी,खवीसाच्या आणि मुंज्याच्या गोष्टीना तोटा नाही. फार पूर्वी कुणावरही अन्याय झाल्यावर तो अन्याय सहनशिलतेच्या मर्यादा ओलांडून गेला […]

संगीतप्रेमी विरेन

“संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो.” कुणी तरी म्हटलंय, “जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं.” हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश […]

वेदना.

माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपना बाझारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, “वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात […]