मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.

 
आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले.
“तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं”
असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं,
“घरी सर्व ठिक आहेना?”
“ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी निदान बिझी असल्यासारखं दाखवावं लागतं.सध्या जॉब टिकण्याची काही खात्री नाही.राहाता राहिलो आम्ही म्हातारी कोतारी माणसं.सकाळी उठल्यावर गुडघे दुखत नाही हे समजल्यावर समजावं आपण ठिक आहो.ह्यावरून कळलं ना तुम्हाला की सर्व ठिक आहे ते.?”
प्रो.देसायानी एव्हडं सविस्तर स्पष्टीकरण केल्यावर माझ्या लक्षात आलं की काही तरी जगाच्या विवंचनेत भाऊसाहेब आहेत आणि त्यावर माझ्याशी त्यांना बहुदा चर्चा करायची असणार.मला म्हणाले,
“मी जगातल्या हिंसेबद्दलच्या बातम्या ऐकून हैराण झालो आहे.लोक बरेचसे आपमतलबी आणि स्वार्थी झाले आहेत.समोर हिंसा होत असताना मौन राखून असतात.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,
हिंसेबद्दल मौन राखलं गेलं म्हणजे हिंसा मौन आहे असं नव्हे.हिंसेचा प्रकार हाच मुळी मौन सोडून सर्व काही असं मानलं पाहिजे.जेव्हा हिंसा केली जाते तेव्हा हा उघड उघड माणसाच्या आत्म्यावर हल्ला आहे”

“जंगलात एखादा वृक्ष कोसळून पडला आणि तो पडताना कुणीही तिथे होणारा आवाज ऐकायला नसला तर कोण कसं बरं सांगणार की प्रचंड आवाज झाला होता. मला वाटतं एखाद्याचा कोपर्‍यापासूनचा हात काठीचा मार वाचवण्यासाठी उंचावलेला असताना त्याला लागलेला फटका एव्हडा दाह देणारा असतो की त्यावेळचं त्याचं किंचाळणं सुद्धा त्याच्या लक्षात येत नसावं.पण म्हणून हिंसा होत असताना वातावरण शांत राहिल कां?”
ही प्रो.देसायांची उदाहरणं ऐकून मी मनात नक्की ठरवलं की भाऊसाहेब हिंसे विरुद्ध आवाज उठवण्याच्या लोकांच्या समानुभुतीबद्दल आवर्जून सांगणार असावेत. आणि माझा अंदाज खरा ठरला.
“अश्रू निमुटपणे ओघळत असतात,विरोध गिळून टाकला जातो,चेहरा भावनाशुन्य दिसतो,सुन्न होतो,दगडा सारखा दिसतो.आणि मौन वातावरण जगाला संदेश देतं की सगळं काही आलबेल आहे.
चोप देण्याच्या आणि ढकलाढकलीच्या प्रबलतेमुळे भिती,लज्जा,आणि धाकटधपटशा जागीच दाबली जाते.दाह झाल्याचा आक्रोष रात्रीच्या शांततेला छेदून टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्याहून कानठिळ्या बसतील अश्या मानहानिच्या आणि जबरदस्तीच्या कबुली जबाबाच्या ओरडण्याच्या दबावाखाली माणूस दबून जातो.
“खेळ संपला मंडळी, आता घरची वाट पकडा.काही बघण्यासारखा तमाशा नाही”
असं अत्याचार करणारा ओरडून सांगतो.आणि बघे मुक सम्मती देतात.शेजारीपाजारी खिडकी दरवाज्याचे पडदे ओढून गप्प बसतात.शांत मनाने विचार करतात आणि तर्काचा आधार घेतात. आणि स्वतःशीच म्हणतात,आम्ही सामील का व्हावं? अशावेळी पीडित झालेली व्यक्ती प्रार्थाना करीत असते की कुणी तरी ह्या हिंसेची दखल घ्यावी आणि मौन भंग करावं.झालेला परिणाम प्रत्येकाच्या कानात घुमत असतो जणू तोफखान्यातून गोळे फुटल्यासारखा छाती धडधडणारा आवाज असतो.द्सरे कुणी ऐकत नसतील का?
सुनासुना भास,सतर्क,रहस्यमय कुजबुज,आणि क्षणिक नेत्रपल्लवी ओरडून सांगते “काही सुद्धा बरं नाही”  निशःब्द संकेतातून मित्राना सांगतात किंवा कुटूंबियाना सांगतात.आणि जे बाहेर ऐकलेलं नाही तेही ते सांगत असतील एकमेकाच्या फोन मधून, पण नंतर फोन हळूहळू शांत होतात,त्यामुळे मित्राना आणि कुटुंबीयांना सोपा मार्ग खूला होतो.जणू ते त्यांच्या स्वतःच्या मौनातून होणार्‍या बेचैनीतून मोकळे झाले असं त्यांना वाटतं..पण हे त्यांचं मौन मात्र जे हिंसा करतात त्याना चक्क मोकळं मैदान खुलं करून देणारं ठरतं.”
मला वाटलं प्रो.देसायानी एव्हडं आवर्जून सांगितल्यावर आपलं ही मत द्यावं.मधेच त्यांना थांबवीत मी म्हणालो,

“भाऊसाहेब, माझं मत असं आहे की मौनभंग करणं जरा जिकीरीचं आणि कठीण आहे.तो काही सोपा प्रवास नाही.मौनभंग केल्याने कान किटण्या इतक्या जोरजोरातल्या घाबरलेल्या आणि शांत असलेल्या हृदयाची धडधड ओढून घेतली जाते. आणि असं माहित असून की तिथे उपस्थित राहाणं म्हणजे नक्कीच मरण ओढवून घेणं,स्वतःच्या अस्तित्वाचं मरण नसेलं तरी आत्म्याचं मरण.
निर्भयतेची आयोजना करावी लागते आणि हृदयभंगही होतो.मौन तोडलं म्हणजे ते सत्याला सामोरं आणतं आणि तेच काहीना बेचैन करतं की जे नैतीक निर्णयाच्या सबबीचा आधार घेऊन दुखावलेल्या हातापासूनच्या किंवा दुखावलेल्या आत्म्यापासूनच्या वास्तविकते पासून दूर जायची संधी पहातात.”
मला वाटलं माझा हा विचार ऐकून प्रो.देसाई मला काही तरी आणखी सुनावतील.पण त्यांना हा विषय आवरता घ्यायचा होता असंदिसलं,मला म्हणाले,
“मला वाटतं मौन सोडल्याने पीडा देणार्‍याकडे पीडा देण्याबद्दलची जबाबदारी येते.तरीही खोट्या समर्थनाच्या मौनरूपी गुहेतून त्यांना उचकून काढल्याने ते दबले जाऊनही विकसीत होण्याच्या प्रयत्नात असतात.मौन तोडल्याने मुक्तिची मुभा मिळते.पीडा देणार्‍यांना कठोर दन्ड दिल्याने कसलीही लज्जा किंवा भिती न ठेवता आवाज वाढवल्याने जे दुसर्‍याचा अनादार करतात, हिंसा करतात हे स्विकारणीय नाही. कोणत्याही परिस्थितीत अस्विकारणीय आहे.हा उघड उघड संदेश दिला जातो.पुढल्या खेपेला आपण ह्या विषयावर आणखी विस्ताराने बोलूंया”
असं म्हणून त्यानीच आवरतं घेतलं.
“हो,नक्कीच असं मी म्हणालो”
आणि घरी जायलो निघालो.

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: