पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग दुसरा.

 

“माझ्या वाचकाना दिवाळीच्या शुभेच्छा”

सत्तरी ओलांडलेला बुड्डा जॉन मेकेन यापूर्वी दोनदा प्रेसिडेन्ट होण्यासाठी असफल प्रयत्न करून थकला होता.रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीच्या चढाओढीत मेकेन अगदी नगणतीत होता.पण निवडणुकीचे वारे कसे फिरतील हे सांगणं कठीण. व्हीएटनाम युद्धात ऍट्याक पायलटचं काम करीत असता युद्धकैदी म्हणून पाच एक वर्ष व्हीऍटनाममधे तुरंगात होता.कैद्याला टॉर्चर कसं करतात ते त्याने चांगलंच अनुभवलं होतं.त्याचे वडील अमेरिकन नेव्हिच्या इस्टर्न फ्लिटचे ऍडमिरल होते.त्यासाठी शत्रुपक्षाकडून त्याला शिक्षेत मुभा मिळाली असती. नव्हेतर तसा प्रस्ताव आला ही होता पण ह्या बच्चम जीने तो प्रस्ताव धुडकावून लावला होता.त्यावेळी त्याचा छ्ळ करून कम्युनीस्टानी त्याचे दोन्ही हात वांकडे करून ठेवले होते.

आदल्या निवडणुकीत बुशबरोबर निवडणूक-डिबेटमधे त्या दोघांचे खटके उडाले होते.बुश अगदी खालच्या थराला गेला होता.
बंगलादेशमधून एका काळ्या अनऔरस मुलीला मेकेनने दत्तक म्हणून बाळगलं होतं.बुश त्याच्या फालतु विनोदाच्या पद्धतीत त्याबद्दल मेकेनला म्हणाला होता की,
“ही तुझी काळ्याबाईशी तुझ्या लफड्यातून झालेली मुलगी आहे”
असं ह्या शब्दात अगदी स्पष्ट बोलला. आणि ते खोटं आहे हे माहित असून सुद्धा तो असं बोलला.हे सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळी मेकन बुशवर खूपच चिडला होता.कुणीही चिडला असता म्हणा.परंतु चिडखोरपणा हा मेकनेच्या हाडांमासांत भिनला होता.
 “ओबामासारखा पोरकट माझ्याशी लढत तरी कशी देतो?”
ह्याचा त्याला खूप राग यायचा.माझा अनुभव, माझं वय, माझा त्याग, अमेरिकन लोक नक्कीच लक्षात घेतील असा त्याला भ्रम झाला होता.एका डिबेटमधे त्याने ओबामाकडे अंगुली निदर्शन करून “द्याट ” असं म्हणून त्याला फाल्तु माणूस आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता.पण ओबामाने हे ऐकून त्याच्या इश्यु न करता नेहमी प्रमाणे दोन्ही हाताने आपले खांदे झटकले.

ह्या विठोबाने सुरवाती पासून निरनीराळे अवतार घेतले होते.
ओबामाचा शांत स्वभाव त्याच्या आईकडून आणि त्याच्या गोर्‍या आजोबाकडून आला आहे असं तो म्हणतो.हा गोर्‍या देवकीचा सावळाकृष्ण देवकीनेच आपल्या आईवडीलांकडे वाढायला ठेवला होता.
हवाई ह्या अमेरिकेच्या पन्नासाव्या राज्यात गोकुळात हा मनमोहन आजीआजोबांच्या छायेखाली वाढत होता.हे राज्य अमेरिके़च्या मेनलॅन्डपासूनसहा हजार मैलावर आहे.तिथे वाढत असताना अधून मधून त्याला “गवळ्याचं पोर” म्हणून हिणवण्यात काही गोरे लोक भाग घ्यायचे असं तो म्हणतो. आणि त्याची गोरी आजी त्या लोकांना रागाने प्रत्युत्तर द्यायची.आजी बरोबर बाजारात किंवा पार्कवर गेल्यावर लोक त्याला हिणवून म्हणायचे.पण लहान असूनही ओबामा आपल्या आजीला समजावून सांगायचा.

“आजी,त्यांना म्हणू देत.माझ्या अंगाला काही  खड्डे पडत नाहीत आणि तुझ्या अंगाला पण. आजोबा कसे शांतपणे सहन करतात,ते मला आवडतं.त्यांना प्रत्युत्तर देऊन तुझ्याकडून त्यांना उगाच महत्व मिळतं.”मौनम सर्वार्थ साधनम” असं येशू म्हणतो असं तूच ना मला सांगतेस?”
आजी त्याला हृदयाजवळ कवटाळून घ्यायची.
“लहान असून तू किती रे विचारी आहेस.”
असं म्हणून ती डोळे ओले करायची.असं ओबामाबद्दल,
“फ्रॉम प्रॉमिझ टू पॉवर”
ह्या त्याच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे.
निवडणुक लढाईत तो मेकेनचा पुरेपूर सन्मान करायचा.पण कधी कधी त्याचा मान ठेवून खिल्ली उडवायचा.
अमेरिकेची सांपत्तिक परिस्थिती जेव्हा कोसळली,तेव्हा मेकेनला पत्रकारानी विचारलं होतं,
“तू ह्यावर काय उपाय सुचवतोस?”
“मला तेव्हडं एकॉनॉमित फारसं कळत नाही” असं मेकेनने आपलं प्रांजाळ मत दिलं होतं.
“जॉन(मेकेन) अनुभवी आहे,हुशार आहे,युद्धात खूप त्याने दुःख सहन केलं आहे. पण आता जे काय तो एकॉनॉमीबद्दल म्हणतोय ते त्याला कळत नाहीय.”
असं त्याला उद्देशून म्हणायचा.
मेकेन  हे ऐकून त्याच्यावर गोरामोरा व्हायचा पण निरुत्तर व्हायचा.
एक वेळ अशी आली होती की मेकेनच्या सभेला शेपाचशे लोक जमायचे आणि ह्या “गवळ्याच्या पोराची” प्रचंड सभा व्हायची.
“विठ्ठल,विठ्ठल,जय हरी विठ्ठल म्हणत”
त्याचे वारकरी लांब लांबच्या गावातून आदल्या दिवसापासून सभेला जमायचे. त्यांच्या रंगीबेरंगी बावट्यावर लिहिलेलं असायचं,
“यस वीई क्यान”,”
नो मोअर बुश फॉर नेक्स्ट फोर इयरस”
हा मेकेनला टोमणा असायचा.
तो सभेत आल्यावर पुढल्या पाच मिनटात लोकं उभे राहून टाळ्यांचा गजर करायचे.
“थॅन्क्स,थॅन्क्स,थॅन्क्यु व्हेरी मच” असं त्याला तेव्हडाच वेळ ओरडून सांगावं लागायचं.काही वेळाने लोक खाली बसायचे.
हे सर्व मेकेन आणि त्याच्या पार्टीचे लोक पेपरात वाचायचे आणि टीव्हीवर बघायचे.
हा “फ्लुट पायपर”- “कान्हा” -आपली फ्लुट-बांसरी- वाजवीत लोकांना आपल्या जवळ खेचून घ्यायचा.
शेवटी मेकेनने एक आयडीया शोधून काढली.
त्याबद्दल तिसर्‍या भागात.

 खास…. ओबामाने व्हाईट हाऊसवर दिवाळी साजरी करायला दिवे, पणत्या लावल्या आहेत.आणि यात खास बात अशी की,हा पहिलाच प्रेसिडेन्ट ज्याने व्हाईटहाऊस दिवाळीसाठी सजवलं आहे.
 बुश-४३ने बाजूच्या बिल्डिंगमधे दिवे लावून दवाळीसाठी सजावट केली होती.बूश आपण स्वतः कधीच प्रत्यक्ष हजर राहिला नाही.आपलं भाषणवाचायला देत होता.
ओबामाने स्वतः मेणबत्ती घेऊन समई उज्वलीत केली.भटजींशी हस्तान्दोलन केलं.आणि भारतीय पाहूण्यात मिसळून लाडू,करंज्याचा आस्वाद घेत होता.

क्रमशः…

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

3 Comments

 1. ravindra
  Posted ऑक्टोबर 18, 2009 at 9:37 सकाळी | Permalink

  आता असे वाटायला लागले आहे दिवाळी हा भारताचा राष्ट्रीय सन नसून जगाचा सन झालेला आहे.

 2. Posted ऑक्टोबर 18, 2009 at 9:59 सकाळी | Permalink

  नमस्कार रविंद्र,
  आपल्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे.भारताविषयी इकडे लोकाना आत्मीयता वाटायला लागली आहे.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

  • ravindra
   Posted ऑक्टोबर 18, 2009 at 12:36 pm | Permalink

   अमेरिकेला आपुलकी वाटली म्हणजे जगाला वाटेलच पुढे मागे.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: