Monthly Archives: नोव्हेंबर 2009

मन बहकल्यावरी सांभाळू कसे

अनुवाद.(आप अपने नशेमे जीत है…..) जीवन असे तुझे तुझ्या कैफात दवडतो दिवस मी माझे पिण्यात घसरता पाऊल तोल सांभाळतो मन बहकल्यावरी सांभाळू कसे चढता नशा मदिरेची उतरवीतो आल्यावरी कैफ पैशाची उतरू कसे डोळ्यात माझ्या दिसतसे मस्ती लहर हर्षाची फुटे तुझ्या माथी पीत असता मी एक पाहिले लोचन तुझे मात्र लाल जहाले चाल माझी जराशी लडखडते […]

सावल्याही अपुल्या न दिसो नजरेला

अनुवाद. (हर खूशी हो वहां जहा तू रहे…..) असशील तू जिथे मिळो खूशी तुला तिथे असशील तू जिथे मिळो जीवन तुला तिथे अंधकार आवडे मला कारण सांगतो तुला सावल्याही अपुल्या न दिसो नजरेला असशील तू जिथे प्रकाश असो तिथे असशील तू जिथे मिळो जीवन तुला तिथे दिसतो चंद्रमा धुरसटलेला दिसेना धुरसटलेला दुःख नसे मला सांवट […]

अजून स्वीट-डीश यायची आहे

“हे बघ, असे जगात कितीतरी लठ्ठ लोक आहेत.प्राप्त परिस्थिती स्विकार करून किंवा अन्य उपाय असतील तर ते करून पुढे जाणं हेच जास्त योग्य आहे.तुला नाही का वाटत?”   अलीकडे तळ्य़ावर लवकर काळोख पडतो.आणि त्यासाठी लवकर निघालं की चमचमीत उन्ह्यात निघावं लागतं.म्हणून मी जरा उशीराच निघालो.मला वाटलं होतं की प्रो.देसाई माझ्या अगोदर येऊन बसले असतील.पण कसलं […]

काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अनुवाद. (आँखें खुली थीँ आये थे वो भी नज़र मुझे…) डोळे उघडे असता दिसला सजणा मला काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला स्मृती हृदयामधे अन ओळख निजरेमधे दिपकाचा प्रकाश असे स्मृतीच्या मार्गामधे सोडून गेला तो ह्याच वळणावर मला काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला अंधकाराशी आता माझी प्रीति जडली नजरेला आता प्रतीक्षेची संवय जडली न्याहाळू […]

माझी दोन मतीमंद भावंडं.

“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे उघडपणे आणि निडर होऊन.”   आमच्या बिल्डींगच्या मागे जी बिल्डींग होती त्याच्या दुसर्‍या मजल्यावर भांगले कुटूंब रहात होतं.श्री.भांगले दक्षिण मुंबईतल्या एका कॉलेजात प्रोफेसर होते.गणीत विषय शिकवायचे. त्यांना तीन मुलं होती.मोठा उमेश लहानपणापासूनच वडलांसारखा फार हुशार होता. मात्र […]

मला निस्तब्धता का आवडते.

“माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.” माझ्या अनुभवानुसार मला गोव्याचे लोक बरेचसे देवभोळे वाटतात.इकडे असलेल्या चर्चाच्या आणि मंदिरांच्या संख्येवरून त्याची कल्पना येते. मग किरीस्तांव लोकांची निरनीराळी चर्च असोत,किंवा हिंदू लोकांची देवळं असोत. वर्षभरात बरेच उत्सव असतात.देवांच्या मंदिराबरोबर देवींची पण बरीच मंदिरं आहेत. किरीस्तांवांचा […]

हा तर आहे तराना प्रीतिचा

(अनुवादीत. एक प्यार का नगमा है…..) खरंतर प्रत्येकाचं जीवन हे एक कथाच असते.सागरातून येणार्‍या लाटेसारखा जीवन एक प्रवाह असतो.दोन पळ जीवनातून थोडं आयुष्य चोरी केल्यासारखं असतं.येणं आणि नंतर जाणं हा जीवनाचा आशय असतो. हा तर आहे तराना प्रीतिचा अन प्रवाह चंचल लहरीचा काय म्हणू मी जीवनाला आलेख तर हा अपुल्या कथेचा मिळवूनी हरवते हरवूनी मिळते […]

जर,तर,पण,परंतु.

  “माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.” आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला. मी म्हणालो, भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं. ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं […]

अज्ञात असण्यातली क्षमता.

  “एखाद्या छोट्याश्या रंगीबेरंगी फुलपांखराच्या इवल्याश्या पंखाच्या फडफडण्याने जगात काही परिणाम होत नाही.ह्या असल्या अज्ञात गोष्टीत असलेली क्षमता मी जाणूं लागलो आहे.” मी आमच्या बिल्डींग मधून खाली उतरत जात होतो.आणि अरूण-आमचा शेजारी-वर येत होता.मी घाईत असल्याने त्याच्याशी फक्त हंसलो.का कुणास ठाऊक दोन पायर्‍या वर जाऊन मागे वळून अरूण मला म्हणाला, “काका,तुमचं काम झाल्यावर घरी परत […]

आणि कुणासाठी तरी तो सूर्य उगवत असतो.

“सरतेशेवटी आपण लहान मोठ्या आपत्ती विसरून जातो.मी नेहमीच माझ्या मनात ठरवत असतो की जीवन मार्गस्थ होण्यासाठी होणार्‍या गोष्टी होऊं द्याव्यात.”   सुरेशची आणि माझी फार जूनी दोस्ती आहे.अलिकडे तो निवृत्त होऊन ठाण्या जवळच्या एका खेड्यात रहायला गेला आहे.मी मात्र मुंबईलाच चिकटून आहे.मला तो आपला पत्ता देऊन गेला होता.ह्या आठवड्यात मला तसा विरंगुळा होता,म्हणून त्याला भेटायला […]