काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अनुवाद. (आँखें खुली थीँ आये थे वो भी नज़र मुझे…)

डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

स्मृती हृदयामधे अन ओळख निजरेमधे
दिपकाचा प्रकाश असे स्मृतीच्या मार्गामधे
सोडून गेला तो ह्याच वळणावर मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

अंधकाराशी आता माझी प्रीति जडली
नजरेला आता प्रतीक्षेची संवय जडली
न्याहाळू दे वाट तुझी जीवनभर मला

डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. Posted नोव्हेंबर 25, 2009 at 1:04 सकाळी | Permalink

    KHUPACH ………APRATIM….

    u can also visit my blog @ http://www.akhiljoshi.wordpress.com


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: