मन बहकल्यावरी सांभाळू कसे

अनुवाद.(आप अपने नशेमे जीत है…..)

जीवन असे तुझे तुझ्या कैफात
दवडतो दिवस मी माझे पिण्यात

घसरता पाऊल तोल सांभाळतो
मन बहकल्यावरी सांभाळू कसे
चढता नशा मदिरेची उतरवीतो
आल्यावरी कैफ पैशाची उतरू कसे
डोळ्यात माझ्या दिसतसे मस्ती
लहर हर्षाची फुटे तुझ्या माथी

पीत असता मी एक पाहिले
लोचन तुझे मात्र लाल जहाले
चाल माझी जराशी लडखडते
तुझ्या चालीत मात्र चाल दिसते

जीवन असे तुझे तुझ्या कैफात
मी दवडतो दिवस माझे पिण्यात

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. Posted नोव्हेंबर 29, 2009 at 11:15 pm | Permalink

    sundar zaliy poemmmm sirji………..

    ekdum khub……… badhiya…………….


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: