दिवस ते गेले कुठे

कुणाच्या तरी आयुष्यात कधीकधी असे ही दिवस येतात की प्रश्नावर प्रश्न विचारून सुद्धा एक ही उत्तर मिळत नाही.कारण उत्तर देण्यासारखं जीवनात काही ही राहिलेलं नसतं.

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे
नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा
तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा
घरटे ते जळले कसे
सांग ना! घरटे जळले कसे

निष्ठा माझी विसरलास कसा
सांग ना! निष्ठा विसरलास कसा
छपली आहे तुझजवळी माझ्या मनाची दशा
कंपीत हृदयामधे दिसेल कशी मनातली आशा
कठीण समयी निर्वाह केला कसा
सांग ना! निर्वाह केला कसा

प्रीतिची प्रथा तू सोडलीस कशी
सांग ना! प्रथा सोडलीस कशी
राहिले आता मी अन माझी बाग उजाडलेली
संपले मनोरथ अन माझी यष्टी मरगळलेली
दिपावर झेपवून पतंग जळला कसा
सांग ना! पतंग जळला कसा

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

4 Comments

 1. poonam
  Posted मार्च 4, 2011 at 3:45 सकाळी | Permalink

  Namskar Kaka,tumchy kavita khup chan aahet.Coffeecha lekhhi aavdla.Aashch aankhi jivnavar sundar kavita karat raha.

  • Posted मार्च 4, 2011 at 11:17 सकाळी | Permalink

   थॅन्क्स पुनम
   तुझी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.मी आणखी लिहिण्याचा अवश्य प्रयत्न करीन
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 2. Posted मार्च 15, 2011 at 1:34 सकाळी | Permalink

  wonderful I like very much

  • Posted मार्च 15, 2011 at 10:03 सकाळी | Permalink

   अश्विनी,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: