Monthly Archives: जानेवारी 2010

असंभव स्वपनाचं सामर्थ्य.

“मोडकळून पडलेलं वाडवडीलांनी बांधलेलं ते जूनं घर पुन्हा बांधायची स्वप्नं तुझ्या मामाला पडत होती.” कुसुम कर्णिक मला नेहमी म्हणायची, “काका तुम्हाला मी एक दिवस आमच्या कोकणातल्या वाड्यात घेऊन जाणार आहे.माझे मामा आणि मामी त्या वाड्यात रहातात.त्या वाड्याला इतिहास आहे.माझ्या मामीच्याच तोंडून तो ऐकायला हवा.” आज तो दिवस उजाडला.कुसुम बरोबर मी कोकणातल्या तीच्या गावाला गेलो होतो.वेंगुर्ल्याच्या […]

भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला

अनुवादीत. (ठंडी हवाएं……) थंड थंड हवा आली लहरत लहरत बोलावू कसे सजणां आला ऋतु बहरत चंद्रमा अन तारे हंसवे दृश्य सारे मिळूनी सगळे हृदयी जादू जागविणारे सांगवे ना मला रहावे ना मला भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला कथा अंतरातल्या जाणवे अंतराला ओढ अंतराची सजणा सांगू कशी तुला भिडता नजर तुझ्याशी लाज वाटे मला श्रीकृष्ण […]

माझी दाभोलीची भेट.

“ह्या मुक्या जनावरांकडून बरंच शिकण्यासारखं असतं.ह्या चरवीत दुध भरत असताना,आणि तुझी कपिला तीच्या समोर ठेवलेल्या वैरणीचं रवंथ करीत असताना,उपकारांची परत फेड लागलीच किती सहजगतीने करीत आहे हे माणसाने शिकण्या सारखं आहे.” आज बरेच दिवसानी मी कोकणातल्या दाभोली गावाला गेलो होतो.माझ्या चुलत भावाची ह्या गावात बरीच शेतीवाडी आहे.भातशेती तो तर करतोच त्याशिवाय ऑफसिझनमधे भाजीची पण लागवड […]

आशावादी अनिल.

“मला त्या माझ्या अपघाताबद्दल काहीच आठवत नसल्याने,मी त्याचा विचार करायचाच सोडून दिला आहे.इतक्या वर्षांनंतर मला हळू हळू जो स्वास्थ्यलाभ होत आहे त्याच्यावरच मी माझी भिस्त ठेवली आहे.” अनिल-अरूण हे भाऊ भाऊ मागे पुढे जरी जन्माला आले तरी जणू जूळेच भाऊ कसे वाटतात.दोघांत दोनएक वर्षाचं अंतर असावं.आता त्यांची लग्न वगैरे झाली आहेत आणि एकाच बिल्डिंगमधे जवळ […]

तांब्याचं कडं.

“प्रत्येकाकडे त्यांचीच स्वतःची कहाणी असते. हे कडं वापरून ज्याला त्याला त्याचा प्रत्यय येतो.” मागे एकदा मी मामा काण्य़ांच्या हॉटेलमधे चहा आणि बटाटावडा खाण्याच्या उद्देशाने गेलो होतो.मला वाटेत कर्णीकांची शोभा भेटली, तीला पण मी माझ्या बरोबर कंपनी म्हणून बोलावलं.आम्ही एका टेबलावर जाऊन बसलो आणि दोन कप चहा आणि दोन प्लेट वडे आणि त्याच्या बरोबर मामा काण्यांची […]

गोरेगांवचे सामंतगुरुजी गेले.

” मधुदादा, अखेर तुम्ही आम्हाला सोडून गेला.” त्या दिवसात अण्णा आई वेंगुर्ल्याला होते.अर्थात अण्णा अंथरूणात आजारी असल्याने ती दोघं येऊ शकली नाहीत. सुधाकर पण त्यांच्या बरोबर होता. मी अक्काच्या लग्नाच्या वेळेची आठवण येऊन म्हणतोय. मला वाट्तं ते १९५१ साल होतं.सुधाकर १५ वर्षाचा होता.मी १८ वर्षाचा होतो.मी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात शिकत होतो. अंधेरीच्या आराम नगर मधे […]

नका एव्हडे सतावू.

अनुवाद (भूली हुई यादों…..) विस्मरलेल्या स्मृतिनो नका एव्हडे सतावू घेऊ का मी जरा विश्राम कसे दूर तुम्हा मी ठेवू ओंजळीत माझ्या मी जमविले तारे सहारा घेऊनी स्वपनांचा कसे मी जगावे विक्षिप्त मी असे मुळचा नका विक्षिप्त आणखी करू विस्मरलेल्या स्मृतिनो नका एव्हडे सतावू नका लटू मला घालूनी कसला वाद दाखवण्या नवा मार्ग नका घालू साद […]

इतिहासातून शिकण्याजोगं.

“इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता असते” आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.आम्ही दोघे मिळून तळ्यावर फिरायला जाणार होतो.प्रो.देसाई सध्या आपल्या मुलाच्या घरी थोडे दिवस राहायला गेल्याने त्यांची कंपनी थोडे दिवस आम्हाला मिळणार नव्हती. पण झालं असं की मला कळलं वैद्य पण काही आवश्यक काम आलं म्हणून […]

प्रदीप गावड्याची वेगळीच भूक

“परंतु,एक गोष्ट मला नक्कीच माहित आहे की भूक असणं चांगलं ठरतं जेव्हा पोटात प्रभावशाली आवेश येण्याचं ईन्धन ती भूक पेटवते.आणि जीवनात प्रगति आणते.” ती शनिवारची दुपार होती.अंधेरी लोकल पहिल्या प्लॅट्फॉर्मवर येणार असं चर्चगेटचा इंडीकेटर दाखवत होता.अंधेरी आल्यावर पटकन उतरून ब्रिजवर चढता यावं म्हणून मी प्लॅटफॉर्मच्या बाहेरच्या टोकाला जाऊन एका बाकावर बसलो होतो.दुपारचा पेपर वाचत होतो.तेव्हड्यात […]

शब्दांच्या ओळी शिवायला स्मृतिची सूई.

“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं  लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.” त्या दिवशी माझी प्रो.देसायांबरोबर चर्चा चालली होती.विषय होता लेखनाबद्दल. मी त्यांना म्हणालो, “मला वाटत होतं की मी कंप्युटर जवळ बसलो की मला आपोआप शब्द सुचंत जाणार.मला वाटत होतं की लेखन करणं म्हणजे पेटी शिकणं,सायकल दुरुस्त करणं,चित्र काढणं यासारखं संवयीने […]