Monthly Archives: फेब्रुवारी 2010

वाचक हो, तुमच्यासाठी

(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन) आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर पाच शतके लेखनाची लिहूनी अमुच्या ब्लॉगवर येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी वाचक हो, तुमच्यासाठी लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी वाचक हो, तुमच्यासाठी आराम विसरलो आम्ही आळसा मुळी […]

कमलचा आनंदाचा क्षण

“मला अजून माझ्या विनयचे पहाटेचे त्यावेळचे ते पाण्याने डबडलेले चमकदार डोळे आठवतात.आणि तो बहूमुल्य शब्द उच्चारतानाचा त्याचा आवाज आठवतो.अशा तर्‍हेचे क्षण माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करतात.येणार्‍या उद्याकडे आशाळभूत व्हायला मदत करतात.” ते जून महिन्याचे दिवस होते.उन्हाळा प्रचंड भासत होता.पाऊसही पडेल अशी शक्यता वाटत होती.अशावेळी आम्ही आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन थंड हवेत गप्पा मारतो.माझी चुलत […]

किशोर आणि प्रकाश.

“ह्या प्रकाशावर आणि त्याच्यात असलेल्या अंतीम दयाशीलतेवर- जी दयाशीलता आपणा सर्वांत चमकून दिसते- त्यावर माझा दृढविश्वास आहे.” असं म्हणतात चूका करतो तो माणूस असतो.पण त्याचत्याच चूका करतो तो माणूस नसतो.किशोर पाटलाने जरी त्याचत्याच चूका केल्या तरी तो माणूस होता.हा अपवाद एव्ह्ड्यासाठी की त्या चूका त्याने त्याच्या किशोर वयात केल्या होत्या.त्या वयात मेंदूचा पुढचा भाग तेव्हडा […]

जीवन आणि समय एकच आहे.

“आजूबाजूच्या जंगली झाडांकडे पाहून एक डोक्यात कल्पना आणली आणि ती कागदावर कविता समजून उतरवली.” माझा थोरला भाऊ तसं पाहिलं तर सदाचा स्वपनाळू.त्याच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर आहे.त्याच्याशी गप्पा मारीत बसल्यावर वेळ मजेत जातो.आज मी त्याच्या घरी त्याच्या गावी जाण्याऐवजी तोच माझ्याकडे काही कोर्टाच्या कामानिमीत्त दोन दिवस राहायला आला होता.रात्री जेवणं झाल्यावर आम्ही दोघे बाल्कनीत […]

होऊ घातलेला लक्षाधीश.

“ज्या ठिकाणी माझ्या म्हणण्याला अर्थ होता,असं ते ठिकाण आहे अशी माझ्या मनात आशा निर्माण केली गेली आणि शेवटी मी सयशस्वी झालो.” रघूनाथचा छापखाना आहे हे मला नव्यानेच कळलं. त्याचं असं झालं,की पब्लिशर ओळखीचा असल्यानंतर छपाई करून घेण्याच्या कामात लागणारे जरूरीचे सोपास्कार करून घ्यायला जरा सोपं जातं हे मला माहित होतं.लहानपणी माझ्या वर्गात बरेचसे मित्र होते […]

“विश-फूल थिंकीन्ग”

“एका जंगलात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला मी एक पुतळा पाहिला.मी जेव्हा त्या पूतळ्याच्या जवळ जवळ जात गेलो तसं माझं आश्चर्य वाढत गेलं.” आज प्रो.देसाई जरा उदास दिसत होते.बर्‍याच दिवसानी आम्ही दोघे तळ्यावर भेटत होतो.मी माझ्या कामात दंग होतो.आणि भाऊसाहेब आपल्या मुलाकडे थोडे दिवस राहायला गेले होते.प्रो.देसाई मुलाकडे राहायला गेले की तिकडे भरपूर वाचन करतात असं मला […]

डोंबार्‍याची कसरत.

“जसं योगासनं करताना योगाला शरीराच्या केंद्र-भागातून क्षमता घ्यावी लागते,तसं जीवनातलं संतूलन संभाळताना जीवनमुल्यांतून श्रद्धेमधून आणि मुलतत्वातून क्षमता घ्यावी लागते.” “रस्त्यावरचा डोंबारी रस्त्यावर दोन बाजूला तीरकांड ठेऊन मधे घट्ट दोरी बांधून हातात एक काठी घेऊन तोल संभाळून त्या दोरीवरून चालाण्याचा त्याचा प्रयत्न पाहून मी ते लक्षात घेऊन आयुष्यात तोल संभाळायचं शिकले.” रेखा खानोलकर असं म्हणून,मी देत […]

लाकडी जमीन.

“पुष्कळ वर्ष वापरून वापरून जुनाट झालेल्या लाकडी जमीनी विषयी मला विशेष वाटतं.” बरेच वेळा एखाद्याच्या कुटूंबात दुर्दैवाने आनुवंशिकतेचं बरंच बंड माजलेलं असतं.शास्त्रिय कारण काहीही असूंदे त्याचे दुष्परीणाम कुटूंबातल्या काही लोकाना भोगावे लागतात. सुनंदाच्या कुटूंबात अपंगत्व येण्याची परंपरा होती.तीच्या मावशीला पोलियो झाल्याने ती अपंग होती आणि सुनंदाला स्वतःला डाव्या हातापेक्षा उजवा हात काहीसा तोकडा असल्याने अपंगत्व […]

विजय अणावकरचा समजूतदारपणा.

“मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.” “मला नेहमी असं वाटतं की जीवनात आनंदी-आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीतून मिळतो.एखादं रानटी रंगीबेरंगी फूल पहाण्यात, आवाज करीत जाणारा एखादा ओहळ पहाण्यात,नुसतं जरी कुणी सकाळी नमस्ते म्हणण्यात,एखादं सुंदर हस्त-चित्र पहाण्यात,एकांतात, एखाद्या पक्षाचं […]

अरूण आणि अरूणची आजी.

अरूणचा आपल्या आजीवर खूप जीव होता.तो आईपेक्षा आजीच्याच मांडीवर वाढला.लहानपणी झोपण्यापूर्वी आजीकडून एक तरी गोष्ट ऐकून घेतल्या शिवाय त्याला झोपच येत नसायची. तो चालायला लागल्यावर आजी त्याला आजुबाजूच्या परिसरात त्याचा हात धरून फिरायला न्यायची.जेव्हा आजी खूपच वयस्कर झाली तेव्हा त्याने आजीजवळ येऊन राहायचं ठरवलं.आजी जाईपर्यंत त्याने तीची सेवा केली.संध्याकाळ झाली की तीला तो उचलून आणून […]