“विश-फूल थिंकीन्ग”

“एका जंगलात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला मी एक पुतळा पाहिला.मी जेव्हा त्या पूतळ्याच्या जवळ जवळ जात गेलो तसं माझं आश्चर्य वाढत गेलं.”

आज प्रो.देसाई जरा उदास दिसत होते.बर्‍याच दिवसानी आम्ही दोघे तळ्यावर भेटत होतो.मी माझ्या कामात दंग होतो.आणि भाऊसाहेब आपल्या मुलाकडे थोडे दिवस राहायला गेले होते.प्रो.देसाई मुलाकडे राहायला गेले की तिकडे भरपूर वाचन करतात असं मला एकदा म्हणाले होते.कारण त्यांच्या मुलाच्या घराजवळ एक सुंदर वाचनालय आहे. तिकडे जाऊने ते आपला वेळ वाचनात घालवतात.
जगात चाललेल्या मनुष्य संहाराच्या घडामोडीवर पेपरात आलेल्या बातम्या वाचून ते बरेच दुःखी होतात.मागच्या खेपेला सुद्धा जनसंहारावर मला त्यानी एक सुंदर लेक्चर दिलं होतं ते आठवलं.

ह्यावेळी पण तसाच काहीसा त्यांचा प्रयत्न असावा असं मला त्यांच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं.आणि ते खरं ठरलं. भेटल्यावर सुरवात करतानाच मला ते म्हणाले,
“मला वाटतं माणसाच्या अंतरंगाचं सामर्थ्य आपण जेव्हडं अनुमान करतो त्यापेक्षा जास्त असावं.ह्या अनुमानामधे माणसाने स्वतःच्या अगदी उत्कृष्ट शाबीत करण्याच्या क्षमतेपासून ते जीवीतहानी करण्याच्या क्षमते पर्यंत अंतरभाव केला आहे.”
मी त्याना म्हणालो,
“मला वाटतं माणसाच्या अंतरात सूर्याच्या उर्जेसारखी शक्तिची झांक दिसते. जीवन निर्मितीचे स्थान आणि जीवनाच्या विनाशाचंही एक स्थान त्या दोघांमधे आहे.आणि ह्या दोन्ही स्थानामधला फरक काहीसा कमीच पण निर्णायक आहे. त्याचं कारण दोघातलं सूक्ष्म अंतर आहे.”

माझा हा विचार ऐकून प्रोफेसर म्हणाले,
“रोजच्या बातम्या आपण पेपरमधे वाचतो.कुठे ना कुठे माणसाचा संहार चालू आहे.आपल्या शेजारच्या देशात आपल्या देशात,आणि सातासमुद्रापलिकडल्याही देशात त्याच गोष्टी उद्भवताना दिसतात.मग त्याला कारण काहीही असो. धर्मासंबंधी असो,देशादेशातल्या सीमेबद्दल असो किंवा आर्थिक शीरजोरीबद्दल असो.
पण मला समजत नाही माणसाने, उदारतापूर्वक क्रियाशील असणं,सहानुभूतिपूर्वक नातं संभाळणं, निकृष्टतम भोगणं, सर्वोत्तम गोष्टीला अनुकूल होणं, असं करणं आणि त्यानंतर  माणसाने माणूसकी पलिकडे जाऊन सुद्धा सहृदयी होणं हे पण त्याला शक्य आहे.”

मी हे भाऊसाहेबांचं ऐकून त्यानाच प्रश्न केला की,
“निर्दयी म्हणून क्रियाशील रहाणं,अविरतपणे द्वेष करीत रहाणं,कैकदा आपत्तित रहाणं,जशास तसं प्रत्युत्तर करणं, असं करून माणूस आपल्याच उर्जितावस्थेपासून स्वतःला वंचित करून घेत,स्वतःच्याच र्‍हासाला कारणीभूत होत आहे असं तुम्हाला नाही का वाटत?.”

“मी तुम्हाला माझी जूनी आठवण सांगतो”
असं म्हणत प्रोफेसर मला म्हणाले,
“मी गोव्यात असताना एका खेडेगावात गेलो होतो.तसं गोव्यात गेल्यावर मला खेडेगावात पायी जायला जास्त आवडतं. विशेष करून ज्या खेड्यात घनदाट जंगल आहे तीथे मी जास्त रममाण होतो.एका जंगलात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला मी एक पुतळा पाहिला.मी जेव्हा त्या पूतळ्याच्या जवळ जवळ जात गेलो तसं माझं आश्चर्य वाढत गेलं.तो काळाकुट्ट सांगाडा,आकार आणि समानतेत अगदी यथार्थ होता.आणि त्या पुतळ्याच्या हाडकूळ्या उंचावलेल्या हातात त्याचंच पुष्ट हृदय धरलेलं होतं.त्या पुतळ्याकडून सुचवला जाणारा इशारा सर्व चिंतनातून संपूर्ण सुटकारा करून देत
होता. घातक भय आणि आशाजनक अभिलाषा संमिलित झालेली दिसत होती.आणि त्यामुळे भावोत्तेजक विरोधाभास निर्माण झाला होता.जीवन-मृत्युचं हृदयातर्फे उलटापलट होत असते असं काहीसं मनात येत होतं.”

मी त्यांना विचारलं,
“हा असा पुतळा कुणी तीथे उभारला असेल?.त्या शील्पकाराला त्यातून काय संदेश द्यायचा असेल?.तो पुतळा पाहून तुमच्या मनात त्यावेळी काय विचार आले असतील?”
मला म्हणाले,
“त्या दाट जंगलात आणि त्या शांत वेळी मला माझ्या पायाखालच्या जमीनीत मनुष्यजातीवर ओढवलेल्या असंख्य आपत्याचं दृष्य माझ्या मनःचक्षू समोर काही कारणामुळे आणता येत नव्हतं.पण माणसाने अपरिमीत दुःख सोसलंय. कुठची ही फूटपट्टी किंवा कुठचाही तराजू त्याचं मापन करू शकणार नाही हे मात्र त्यावेळी लक्षात येत होतं.
ज्यांच्या जीवीताची हानी झाली त्या अभाग्याना नफरतीचं आणि भयभीतीचं लक्ष म्हणून निवडलं गेलं होतं.त्यांना आश्चर्यजनक अमानुषकतेने वागवलं जात होतं.माणसानेच माणसाला काय केलं ते पाहून मन सुन्न होऊन निःशब्द व्हायला झालं होतं.ह्या भयंकर प्रकाराला अनेक नावं असतील पण त्यातलं एक नाव म्हणजे जातिसंहार असं आहे.”

मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“ह्यातली विचारणीय गोष्ट म्हणजे दोन्ही कडून म्हणजे जीवन आणि मृत्युकडून मनुष्याच्या हृदयाच्या बहुरंगी सामर्थ्याच्या दिसणार्‍या परिमाणाच्या आठवणीची द्खल. आणि दोघातला फरक अगदी साधा आहे.पण प्रश्न पडतो की, आपल्या जीवनात भयभीतीला आणि नफरतीला निवडण्यात जी भूमिका आपण घेतो त्यावरून आपलं अंतरंग आकांक्षा करतं की करण्याचं सोडून देतं हेच कळत नाही.”

“कारण नफरत शक्तिशाली असते आणि भयभीती विकट झालेली असते.स्वतंत्रपणे दोन्ही गोष्टी मनात ताप आणत असतात असं असूनही त्यांचं अस्तित्व माणसाच्या मनाला जाणवत नाही.”
कारण देत प्रो.देसाई असं मला म्हणाले.
पुढे म्हणाले,
“सामाजीक अतीरेकीपणाच्या रचनात्मक कार्यात शांती आणण्याचं काम एखादा मधेच आलेला समयाचा विराम कारणीभूत होतो.आणि हा विराम केव्हा येईल हे हुडकून काढणं अशक्यप्राय आहे.
चाळीसएक वर्षापूर्वी हे माझ्या लक्षात आलं,किंबहूना मीच त्या गोष्टीच्या लक्षात गेलो असं म्हणायला हरकत नाही.आता मला माहित झालं आहे की माणसाकडून होणारं पाप गहन आणि हानिकारक असतं. ते पाप ही एक आंधळी रक्तपिपासू प्रक्रिया आहे.”

माणसाबद्दल सकारात्मक विचार आणून मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“माणसाचं औदार्य आणि दयाळुपणा काही कमी प्रभावशाली नाही. असं असल्याने, मला वाटतं माणसाचं ह्रुदय मृत्युच्या विचारापासून वेगळं राहून जीवनाला योगदान देऊं शकतं.रक्तपिपासू उन्मत्ततेपासून दूर राहून माणूस स्वतःलाच अशा हृदयाची अर्पण झालेली वस्तू असं समजून ते हृदय कायम स्विकारूं शकतो.”
माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसायाना हंसू आवरलं नाही.ते मला म्हणाले,
“सामंत,ह्यालाच इंग्रजीत “विश-फूल थिंकीन्ग” म्हणतात.पीढ्यानपीढ्या हा असाच विचार करून माणूस जगत आहे.आपण पण असाच विचार करून आशेवर जगत आहो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: