Monthly Archives: मार्च 2010

वकीलाचा कुत्रा.

“माझा मोती मला प्रत्येक गोष्ट मी माझ्या ताब्यात ठेऊ शकत नाही,आणि त्याची जरूरीही नाही ह्याची एक प्रकारे समज देतो.” रिधमहाऊस मधून मदनमोहनच्या काही सीडीझ विकत घेण्यासाठी म्हणून मी चर्चगेटवरून फौन्टनच्या दिशेने जायला निघालो होतो.हायकोर्टचा रस्ता आल्यावर पुढे पुढे फौन्टनपर्यंत जाऊन वळण्यापेक्षा हायकोर्टच्याच रस्त्यावर वळलो. कोर्टाच्यासमोर काळे कोट घातलेले बरेच वकील आपआपल्या सहाकारी मित्राबरोबर बोलण्याच्या नादात […]

कोकणातले बोंडू.

“आठवणी येतात,आठवणी जात नाहीत पण गेल्या तर मात्र असं डोळ्यात पाणी आणून जातात.खरं ना?” माझी बहिण मालिनीताई माझ्या पेक्षा सतरा वर्षानी मोठी आहे.मी जेव्हडं माझ्या आजोबांना पाहिलं असेल त्या पेक्षा खूप वर्ष माझी ताई माझ्या आजोबांच्या सहवासात होती.ह्या आठवड्यात ती आमच्याकडे राहायला आली होती. सकाळीच मी बाजारात जाऊन भाजी आणताना पाच सहा काजूसकट बोंडू आणले […]

निरंतर चित्र काढतो

“शेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडीशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.” “सूर्या,तू आता प्रसिद्ध व्यंगचित्रकार झाला आहेस हे मला माझ्या एका मित्राने सांगीतलं.तुला कधीतरी तुझ्या ऑफिसमधे येऊन भेटायचा माझा विचार होता.आज तुझी इथेच गाठ पडली हे बरं झालं.” मी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधे काही कामासाठी गेलो होतो.तिथे सूर्यकांत कानडे […]

दिसतेस तू तशीच अगदी

अनुवाद. (चॉंद सी महबूबा………) असावी माझी प्रिया चंद्रमुखी कल्पित होतो मी कधी एकदा दिसतेस तू तशीच अगदी कल्पिले होते मी सदा सर्वदा ना कसली रीत ना कसला रिवाज ना कधी वाद ना कधी नाराज रूप असे भोळे भाळे नयन टपोरे काळे काळे कल्पित होतो असेच रूप कधी एकदा दिसतेस तू तशीच अगदी कल्पिले होते मी […]

असंच एक कोकणातलं गाव.

“हे तुझं निसर्गाचं वर्णन ऐकून आणि तुझ्या गावातलं तळं आणि आजूबाजूचं सृष्टी सौन्दर्य पाहून मला पुढेमागे इथेच स्थाईक व्हावं असं वाटायला लागलंय.” “आमच्या कुटूंबात मी पहिलाच कॉलेजात जाणारा ठरलो.आमचा शेतकी व्यवसाय असल्याने व्यवहारापूरतं पुस्तकी ज्ञान असलेलं पूरं असं माझ्या इतर नातेवाईकाना वाटायचं.शेतीतून पैसा येत असल्याने जीवनात लागणार्‍या इतर गरजा भागवल्या जायच्या.पण माझ्या आजोबांचं तसं नव्हतं.ते […]

जयदेवचं हंसणं.

“जेव्हा जाणंच कठीण गोष्ट होते तेव्हा हंसण्याची वेळ आलेली असते.” कमल आपल्या दोन मुलांना घेऊन आमच्या घरी आली होती.तिचा मोठा मुलगा जयदेवसारखा-तिच्या भावासारखा- दिसत होता. मला जयदेवची आठवण आली. “जयदेवला जाऊन आता किती वर्ष झाली असतील?” मी कमलला विचारलं. “सोळा वर्षापूर्वी माझा भाऊ जन्माला आला होता.मला आठवतं त्यावेळेला गावात प्रचंड वादळ आलं होतं.हे माझ्या नीट […]

” ******आणि देव देत नाही दोनही डोळे.”

“जीवनातल्या अन्यायाशी दोन हात केल्याने जीवन संपन्न होतं.जीवन दोषहीन नसणं हे एका अर्थी बरं आहे असं म्हटलं पाहिजे. नाहीपेक्षा जीवन जगायला काहीच राहिलं नसतं.” “आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी आपल्याला सांगीतलं जातं की, “चांगलं वागा” “आपल्या जवळ असेल त्यातून भागीदारी करून दुसर्‍याला द्या.” “तुम्हाला जर कुणी चांगलं वागवायला हवं तर दुसर्‍याशी तुम्ही चांगलं वागा.” हे […]

सजणा! हीच का रे प्रीतिची रीत

अनुवाद. (बहे न कभी नैन से नीर…..) वाहू न जावी आसवें माझ्या लोचनातूनी उठेना! काहूर नाजूक माझ्या अंतरातूनी सजणा! हीच का रे प्रीतिची रीत मनातल्या आशा जाती लुप्त होऊनी जाईना! आर्तस्वर माझ्या हृदयातूनी पाहूनी मृदुहास्य तुझ्या ओठातूनी घेईना अंतरीची ओळख पटवूनी ह्यातच झाली तुझी रे जीत सजणा! हीच का रे प्रीतिची रीत दीप जळे घरी […]

जीवनातली सूत्रं.

“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.” वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात.नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते […]

माधव आणि त्याचे आजोबा.

“मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो. काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”. नातवंडांचं आजोबावर प्रेम असणं स्वाभावीक आहे.ती एक नैसर्गीक प्रक्रिया आहे असं म्हटलं तरी अतीशयोक्ती होऊ नये. काहींना आजोबा आपले लाड करतात म्हणून ते आवडता.काहींना आईबाबा रागवल्यानंतर आजोबा आपल्याला जवळ घेऊन आपली बाजू सावरतात म्हणून आवडतात.काहींना आपले आजोबा अनुभवाच्या […]