Monthly Archives: एप्रिल 2010

भोळा कोकणी शेतकरी.

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.” त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा […]

सुखावलेल्या स्मृति.

“अलीकडे मी जेव्हा,जेव्हा तुझ्याकडे यायचो त्यावेळी तुझ्या आजीशी बोलताना माझ्या लक्षात यायचं की दिवसे दिवस ती असंबंध बोलायची.” मी सुरेखाला म्हणालो. “एकदा तर तिने माझ्यासाठी दरवाजा उघडून चक्क विचारलं, “तुम्ही कोण?” त्याच वेळी मी समजलो तुझ्या आजीला अल्झाईमर सारखं काहीतरी झालं आहे.” मला हे सुरेखाला सांगावं लागलं जेव्हा ती मला म्हणाली, “माझी आजी जसजशी वयस्कर […]

राधिकेची श्रद्धा.

“वा! वा! बहूत अच्छे! होऊन जाऊदे.आज तुझ्या अंगात प्रोफेसरांचं वारं शिरलेलं दिसतंय.ऐकीन तेव्हडं कमी आहे.” मी म्हणालो. “मिळालेलं रीतसर शिक्षण आणि मिळालेला अनुभव ह्याने मला जरी आधुनीक तर्कशास्त्र समजण्याच्या अवस्थेत आणून ठेवलं असलं तरी ते मला नेहमीच्या जीवनातल्या अनुमानात,निष्कर्षात आणि वास्तवीक निर्णयात चिकटून राहायला सर्व अपूरं वाटतं. त्यामुळे कुठच्याही गोष्टीची श्रद्धा ठेवणं हे तर्कसंगत विचाराला […]

एलिझाबेथ पर्फ्युम.

“पण तुझ्या प्रत्येक झग्याला “एलिझाबेथ पर्फ्युमचा” सुवास नक्कीच येणार.” इंदु माझी चुलत बहीण.तिच्या आयुष्याचा बराचसा भाग कोकणात वास्तव्य करण्यात गेला.तशी अधुनमधून ती मुंबईला तिच्या मुलीच्या फ्लॅट्मधे राहायला यायची.ह्यावेळी ती आली हे मला कळल्यावर तिला भेटायला मी गेलो होतो. दरवाजा उघडताच झगा नेसलेली इंदु मला दिसली. “अगं,इंदु तू?” मी विस्मयीत होऊन तिला पहाताक्षणीच प्रश्न केला.तिची आजी […]

कळेना कसे मी नकळत तुला रडवीले

अनुवादीत (न जाने कैसे…..) कळेना कसे मी नकळत तुला दुखवीले कळेना कसे मी नकळत तुला रडवीले अंग आंसवानी तुझे नी माझे भिजवीले कळेना कसे समयाने न ते सुकवीले कळेना कसे मी नकळत तुला रडवीले साद घालूनही तू दूर जाण्याचे ठरवीले स्पर्शताना तुझ्या श्वासाला श्वास माझे संपले कळेना कसे मी दूर करू तुझे रुसणे कळेना कसे […]

“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”

“गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत, डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.” सुधाकर करमरकरचा मुलगा,हर्षद, शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.नंतर शिक्षण पूरं झाल्यावर तिथेच स्थाईक झाला. स्वतःची कंपनी काढून तिथेच बिझीनेस करायला लागला.मुंबईत एखादं घर असावं म्हणून त्याने ठाण्याला घोडबंदर रस्त्यावर,टुमदार बंगले बांधणीच्या स्कीममधे पैसे गुतंवून आपल्यासाठी एक बंगला घेण्याचा बेत केला. सुधाकर घरचा धनाड्य.त्याचे […]

माळरान.

“अजून जीवनात खूप शिकायचं आहे.आणि त्याचा विचार करायचा आहे.पहाटेच्यावेळी आजोबांबरोबर त्यांच्या माळरानात जाऊन विचार येत होता अगदी तसाच विचार मी म्हणतो.” “माझ्या आजोबांबरोबर त्यांच्या दूरच्या माळावर पहाटे उठून त्यांच्याबरोबर जायला मला खूप आवडायचं.माळ संपता संपता माळरान लागतं.आणि माळरानाच्या पलीकडे झाडांनी गच्च भरलेल्या डोंगराचा पायथा लागतो.पायथ्याशी पोहचल्यावर डोकं उंच करून वर पाहिल्यावर घनदाट अरण्य असेल असा […]

कां बरं हसावं?

“कुणीतरी म्हटलंय नाही काय,हंसणं संसर्गजन्य असतं म्हणून.” आज तळ्यावर माझा फारच मजेत वेळ गेला.वसंत ऋतू चालू झाल्याने सूर्यास्त जरा उशीराच व्हायला लागला आहे. आणि पूर्वी सारखा हवेतला गारवा कमी होऊ लागल्याने फक्त एक स्वेटर घालून फिरायला जायला सुलभ झालं आहे. नाहीतर ती कानटोपी आणि थंडीचं जॅकेट घालायला मला तरी वैताग यायचा. प्रो.देसाई नेहमी म्हणतात त्यांना […]

आमचं एकत्र मालवणी भोजन.

“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.” बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती. ” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा” असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती […]

न हंसणाराच हास्यास्पद दिसतो.

“मी एक पाहिलंय माझे वडील ज्यावेळी हंसतात तेव्हा ते छान दिसतात.” स्वप्नील त्याच्या लहानपणी नेहमीच आपल्या वडीलांबद्दल माझ्याकडे तक्रारी करायचा. “ते रागीष्ट आहेत.बारीक सारीक कारणावरून चिडतात.आई एव्हडं घर संभाळून आमची देखभाल करते त्याचं त्यांना काहीच नसतं.”वगैरे. आता स्वप्नील दोन मुलांचा बाप झाला आहे.ह्यावेळी मला भेटला तेव्हा आपल्या वडलांची भारी स्तुती करीत होता. मी त्याला म्हणालो, […]