Monthly Archives: जून 2010

सतार वादक.

“ही सतार माझ्या खांद्यावर टेकवायला मिळते त्याबद्दल मी नशिबवान आहे असं मला मी समजतो.” “अनेक तासांचा रियाज करून मी सतार-वादक झालो.त्याबरोबर ह्या प्रक्रियेत असताना,मानवीय परिसीमेची प्रशंसा करणं आणि स्वीकृति करणं ह्या गोष्टी मी माझ्यात विकसीत करू शकलो.पण ही वास्तविकता लहान वयात,मला आठवतं,मुळीच समजून घेता येत नसायची,आणि मग प्रौढ झाल्यावर जर समजून घेतली गेली तर आस्ते […]

घरगुती जेवण.

“आज तरी मालवणी जेवणाची मजा लुटूया” त्यादिवशी दादरला दुर्गाश्रमात जाऊन मालवणी जेवण जेवायची मला हुक्की आली होती.नंदाच्या-माझ्या भाचीच्या-घरी तिला आणि तिच्या नवर्‍याला, मला कंपनी द्या,म्हणून फोनवर कळवून त्यांना न्यायला घरी येतो म्हणून सांगीतलं.दादरला जाताना वाटेत, बाहेर जेवण्याच्या संवयीवर, विषय निघाला. मला नंदा म्हणाली, “अलीकडे आम्ही बाहेर जेवायचं टाळतो.आता तुम्ही आग्रह करून बोलावलंत म्हणून तुमचं मन […]

शांततेबद्दल मला विशेष वाटतं.

“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं, तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.” आज प्रो.देसायांना तळ्यावर भेटल्यावर मी म्हणालो, “भाऊसाहेब,सध्या जगात गजबजाटच खूप होत आहे.विमानांच्या आवाजापासून,अतिरेक्यांच्या बॉम्ब फुटण्यापर्यंत कानठिळ्या बसेपर्यंतचे आवाज आहेतच त्याशिवाय रस्त्यावरचे मोर्चे,मिरवणूका,विसर्जनं,सणावारी किंवा आनंद किंवा विजय प्रदर्शित करण्यासाठी […]

पश्चाताप.

“सरतेशेवटी  जे काही मागे वळून पहायचं असेल ते तुम्ही घेतलेल्या निर्णयांकडे आणि तुमच्या जीवनाकडे पहावं लागतं.” माझ्या मित्राचे वडील वारल्याचा नोरोप घेऊन त्यांचा मुलगा, त्याचे आजोबा गेल्याचं, सांगायला माझ्याकडे आल्यावर मी होतो त्या कपड्यात त्याच्या बरोबर जायला निघालो. कुणाच्याही अंतयात्रेला जाण्यात मला थोडं भीतिदायक किंवा थोडं गूढ वाटतं.गेलेल्या व्यक्तिबरोबर आपल्याला आलेले अनुभव पुन्हाः जागृत होतात. […]

वाचण्याची संवय.

“पु.लं. सांगतात की त्यांना वयाच्या नवव्या वयापासून पेटी वाजवण्याची संवय लागली होती.त्यांच्या वडीलानी त्यांना नवी पेटी आणून दिली होती. आणि शिकवण्यासाठी मास्तर ठेवले होते.” आज बरेच दिवसानी माझी आणि डॉक्टर मुकूंद पारसनीसची भेट झाली.मी ज्या संशोधन संस्थेत कामाला होतो त्याच संस्थेत मुकूंदही होता. मुळपासून मुकूंद अभ्यासू स्वभावाचा होता.नेहमीच तो एखादं पुस्तक उघडून वाचत असलेला दिसायचा.मग […]

माझा गाव,माझं घर.

“एकाएकी त्या क्षणाला ध्यानी मनी नसताना माझ्या लक्षात आलं की मी माझ्या घरी आहे.जन्मभर अशाच जागेचं अस्तित्व असावं ह्या शोधात मी होतो.” गंगाधर शिर्के सैन्यात होते.माझी त्यांची जूनी ओळख होती.त्यांना दोन मुलं आहेत.मोठा मुलगा माझ्याकडे यायचाजायचा. वडील नेहमीच फिरतीवर असल्याने लहानपणापासून तो देशात निरनीराळ्या गावी राहून असायचा. नंतर मोठा झाल्यावर मुंबईत नोकरी करून रिटायर्ड झाल्यावर […]

माझी आजी,माझी हिरो.

“माणूस आहे त्याची चूक ही होणारच.पण चूक लक्षात आणून त्याची कबूली देणं ह्यातच माणूसकी आहे.पण एक तितकंच खरं आहे,तिच चूक परत परत करणारा मात्र माणूस नसतो.” ज्याज्यावेळी मी मेधाला भेटायचो त्यात्यावेळी मी तिच्या आजीची हटकून चौकशी करायचो.आणि मेधाचं उत्तर यायचं, “आजी फारच किटकिट करते.” एकदा मी मेधाला विचारलं, “किटकिट म्हणजे तुझी आजी काय करते गं?” […]

लोकरीची लडी.

“अतिश्रमाने मनावर येणारा ताण काहीतरी सुखदायी वस्तूत रुपांतरित व्हावा हा माझा उद्देश आहे.लोकरीचं सूत माझ्या जीवनात थोडी उब आणतं.” सुनंदा माझ्या घरी येऊन एक पुडकं देऊन गेली.मी घरी नव्हतो. “वेळ काढून कधीतरी माझ्या घरी या” असा निरोप ठेवून लगबगीने गेली. पुडकं उघडल्यावर मला आतली वस्तू पाहून आश्चर्यच वाटलं.तो एक उबदार स्वेटर होता.सुनंदाने माझ्यासाठी विणला होता.सुनंदा […]

आगावू केलेली परतफेड.

“जेव्हडं म्हणून खोलवर जाऊन दुःख तुमच्या मनात कोरलं जातं, त्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही तुमच्यात सामावून घेऊ शकता.” असं कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं.हे म्हणणं तुझ्या बाबतीत जास्त लागू पडतं असं मला वाटतं.” मी मेघनाला सांगत होतो. “माणासा-माणसातली नाती, सभोवतालचं सौंदर्य,उत्कृष्ट मैत्रीतली मुल्यं,दुनियाने प्रदान केलेला बहुमूल्य ठेवा या सर्वांकडे डोळे,कान आणि मन उघडं ठेवून पहाण्यात मी विश्वास […]

गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे.

“माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींग-टेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार” सुलभाकडे मला दरदिवाळीला फराळासाठी बोलावलं जातं.मला अनारसे आवडतात हे सुलभालाही माहित आहे.त्यांच्या फराळात अनारसे निक्षून असायचे.मी ते आवडीने खाताना सुलभाची आजी मला टक लावून पहायची.आणि माझ्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून तिही खूश व्हायची. “वाः! काय सुंदर झालेत […]