पश्चाताप.

“सरतेशेवटी  जे काही मागे वळून पहायचं असेल ते तुम्ही घेतलेल्या निर्णयांकडे आणि तुमच्या जीवनाकडे पहावं लागतं.”

माझ्या मित्राचे वडील वारल्याचा नोरोप घेऊन त्यांचा मुलगा, त्याचे आजोबा गेल्याचं, सांगायला माझ्याकडे आल्यावर मी होतो त्या कपड्यात त्याच्या बरोबर जायला निघालो.
कुणाच्याही अंतयात्रेला जाण्यात मला थोडं भीतिदायक किंवा थोडं गूढ वाटतं.गेलेल्या व्यक्तिबरोबर आपल्याला आलेले अनुभव पुन्हाः जागृत होतात.
आज ज्या गृहस्थांच्या अंतयात्रेला मी गेलो होतो तेही माझे स्नेही होते.किती लोकाना त्यानी भारावलं असेल बरं.ते नुसतेच कौटूंबीक गृहस्थ नव्हते तर एक विख्यात वकील होते,एक लोकोपकारी होते.

त्यानंतर बरेच दिवस निघून गेले.पुन्हा एकदा जेव्हा त्यांचा नातू मला भेटला तेव्हा त्यानेच माझ्याशी विषय काढला.
मला म्हणाला,
“त्या अंतयात्रेत अनेकांची भाषणं होत असताना मी तुमच्या चेहर्‍याकडे पहात होतो तुम्ही बरेच अस्वस्थ दिसत होता. कारण विचारण्याची ती वेळ नव्हती.पण कधी पुन्हा भेटाल त्यावेळी विचारीन म्हणून ठरवलं होतं.”

विचारतोय तर कारण सांगून टाकावं म्हणून मी त्याला म्हणालो,
“त्यावेळी माझ्या मनात असं आलं की,मी गेल्यावर मलाही ह्यांच्याचसारखं आठवणीत ठेवलं जावं.”
मी त्याला पूढे सांगीतलं,
“अशावेळी कदाचीत तुम्हाला रडू येण्याचाही संभव असतो.त्या व्यक्तिबरोबर तुमचा खास दुवा होता म्हणून नसेल किंवा तो तुमच्या खास मैत्रीतला होता म्हणून नसेल,तर तुम्ही पण जाल किंवा तुम्हाला अगदी प्रिय असलेलं कुणी जाईल म्हणून कदाचीत तुम्हाला भीति वाटत असेल.तुम्ही तुमचं जीवन प्रतिबिंबित करायला लागता.तुमच्याकडून झालेल्या चूकांचं तुम्ही समर्थन करायला लागता.कदाचीत स्वतःलाच विचारता-माझी अंतयात्ना कशी असेल?
त्यादिवशी मला त्यातल्या एका अनुभवाची जाणीव झाली.”

माझं हे सांगणं ऐकून त्यांचा नातू मला म्हणाला,
“मघा़शी म्हणाला तसं,तुम्हाला रडू येत होतं,ते माझ्या आजोबांच्या जाण्यानेच फक्त नव्हे, आणि जरी तुमच्या मित्रासाठी तुम्ही निराश झाला असला तरी तुम्हाला दुःख होत होतं ते तुमच्या भविष्याबद्दल.आज जर तुम्ही गेला तर अंतयात्रेत तुमच्या विषयी लोक शोक कसा करतील असा विचार तुमच्या मनात येत होता.असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना?”

मी त्याला म्हणालो,
“अगदी बरोबर.बचैन होऊन मी त्यावेळी विचार करीत होतो.मी काही तुझ्या आजोबा एव्हडा प्रसिद्ध नाही.
मी काही त्यांच्या एव्हडा परामर्शदाता नाही.पण कुणीही आपल्या जीवनात काही अपेक्षा करीत असतो.खरंतर माझ्या जीवनात मी काहीसा रीताच आहे.आणि मी काही साध्यही केलं नाही.मी अशा विचारात असताना एकाएकी तुझे वडील शोकसभेत बोलत असतानाचं ऐकून माझ्या डोळ्यावर आलेल्या ह्या विचार्‍याच्या धुक्याला बाजूला केलं गेलं.”

“हो मला आठवतं माझे बाबा काय म्हणाले ते.”
ते म्हणाले,
“माझ्या वडीलांच्या तोंडातून आलेले शेवटचे शब्द म्हणजे,
“मला कसलाही पश्चाताप नाही”
त्याचाच अर्थ काहीही गमवल्याचं किंवा अपराध घडल्याचं मला दुःख नाही.
पाऊणशे वर्षावर माझ्या आजोबांचे जाता जाता असे उद्गार यावेत हे माझ्या बाबांनी सांगीतलेले शब्द मी पण ऐकले.ते ऐकून मलाही जरा नवल वाटलं.”
त्यांचा नातू आपल्याला काय वाटलं आणि माझ्या सारखं त्यालाही वाटलं हे खास सांगत होता.

मी त्याला आणखी सांगण्याचा प्रयत्न केला.
म्हणालो,
“त्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरोखरीच माझ्या बाबतीत ह्या गोष्टींसाठीच मला भीति वाटत होती आणि रडू येत होतं.माझ्या मानसिक उद्रेगाच्या असंतुलनातून मी मला बाहेर काढायचं ठरवलं. आणि या निर्णयाला आलो की कसल्याही खेदाशिवाय जीवन जगावं. खेद नसावा याचा अर्थ असं नाही की घरात बसून जगाची भीति करीत बसावी. उलट मी म्हणेन जीवनातला प्रत्येक क्षण पुरंपूरा जगावा.जरी ते अर्थहीन वचन वाटलं तरी चालेल. सरतेशेवटी  जे काही मागे वळून पहायचं असेल ते तुम्ही घेतलेल्या निर्णयांकडे आणि तुमच्या जीवनाकडे पहावं लागतं.
अगदी मनापासून सांगतो, मला तुझ्या आजोबासारखं असावं असंच वाटतं.माझ्या कुटूंबातल्या मंडळीकडे पाहून मी म्हणावं,
” मला कसलाही पश्चाताप नाही.”

“माझे आजोबा खरंच ग्रेट होते.”
डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. Omkar
    Posted जून 18, 2010 at 3:44 pm | Permalink

    lekh avadala…


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: