Monthly Archives: ऑगस्ट 2010

लेखन करण्यात मला विशेष वाटतं.

“मला वाटतं माझं लेखन,मला जे हवंय, ते देऊ शकतं आणि माझ्या लेखनातून,मला जे हवंय,ते होऊ शकतं.” एका सेमिनारमधे माझी आणि महेंद्र नाडकर्णीची भेट झाली.महेंद्र उत्तम लेखक आहेत हे मला पूर्वीच माहित होतं. पण ह्या सेमिनारमधे मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं.पन्नाशीत आलेले,सहाजीकच स्थुलतेकडे थोडे झुकलेले,डोक्यावरचे केस विरळ होण्याच्या मार्गाला लागलेले,छुटकुल्या उंचीचे,चेहर्‍यावर मिस्कील हास्याची लकीर भासवणारे महेंद्र नाडकर्णी […]

गतकालातल्या एखाद्या घटनेची आठवण.

“आम्ही आमच्या बागेतला,मोठ्यात मोठा फणस, कोकणातून कसा आणला होता हे सर्व चित्रातून, एक शब्द न बोलता, स्पष्ट करता येतं.” मी मागच्या पावसाळ्यात गोव्याला सुट्टी घेऊन गेलो होतो,त्यावेळी करमकर कुटूंबाची आणि आमची बीचवर वरचेवर भेट व्हायची.करमरकरांची कुसूम हातात सतत कॅमेरा बाळगून असायची.दिसेल ते ती कॅमेर्‍यात टिपत असायची.त्याबद्दल कुतूहल वाटून मी तिला विचारल्यावर ती मला हंसून म्हणाल्याचं […]

आईस्क्रीम कोन खाण्याची कला.

“माझी जीभ,ह्या शंकूच्या टेंभ्यावर चक्राकार फिरवून,खाली-वर करून,नाचत रहाते.असं करताना,समतोल राखून,साफसूफ करून आकार देत देत,एक ठिसूळ,कलात्मक वास्तु तयार होते.” जूनमधे पाऊस येण्यापूर्वी मे महिन्याचा उष्मा पराकोटीचा असतो.आज जास्तीत जास्त पारा वाढणार आहे म्हणून हवामान खात्याने भाकीत केलं होतं. माझा पुतण्या माझ्याकडे आला होता.संध्याकाळीही एव्हडा उष्मा होतो हे पाहून त्याने मला गोड सुचना केली. आपण जुहू चौपाटीवर […]

कसे कळावे विधात्याला

अनुवादीत नका विचारू त्या बावळ्याला काय बेतले त्या बिचार्‍यावर विचारा त्याच्या अंतराला काय बेतले मनोकामनेवर पाजतो तो इतरां अन तहानलेला स्वतः कसे  कळावे पिणार्‍याला काय बेतले मधूपात्रावर नका विचारू त्या बावळ्याला काय बेतले त्या बिचार्‍यावर घडविले विधात्याने मानवां अन प्रीति करी तो स्वतः कसे कळावे विधात्याला काय बेतले त्या मानवावर नका विचारू त्या बावळ्याला काय […]

फास्कूचं प्रेम.

“इतक्या वर्षांनंतर अजून पर्यंत तू त्या जोषाचा आनंद घेत असतोस. समुद्राच्या इतकं जवळ राहून,पडावातून भर समुद्रात जाऊन मासेमारी करण्याच्या व्यवसायामुळे तू तुला नशीबवान समजत असावास”. दर पावसाळ्यात मी कोकणात जातो.मला कोकणातला पावसाळा खूप आवडतो.मे महिन्याच्या उष्म्याने हैराण झालेले लोक पावसाची वाट पहात असतात.मृग नक्षत्र लागलं की कोकणी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असतो.पूर्वी घडाळाच्या काटयासारखा पाऊस […]

फुलांना पाहूनी उद्याना येई बहार

अनुवादीत (दर्पण को देखा…..) दर्पणात पाहूनी करीशी तुझा शृंगार फुलांना पाहूनी उद्याना येई बहार आहे मीच कमनशीबी नजर फिरेना माझ्यावरी एकवार आळसून पहाशी कोवळी सूर्यकिरणे तारका पाहूनी रात्री स्वप्नात हरवणे असाच बहाणा करूनी न्याहाळीलास तू पुरा संसार दर्पणात पाहूनी करीशी तुझा शृंगार फुलांना पाहूनी उद्याना येई बहार काय सांगू नशीब काजळाचे लोचनी तुझ्याच ते शोभते […]

गोड पक्वान्न खाण्याची परिसीमा.

मी माझ्या कपाळावर हात मारून घेतला.आणि विषय संपवण्यासाठी म्हणालो, “मात्र,प्रत्येक रात्री तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागेल. आज कुठच्या गोड पक्वान्नाचा फडशा उडवूं? एव्हडंच.” “कधी संपूच नये असं गोड पक्वान्न मला भारी आवडतं.एखाद्या मोठ्या वाडग्यात-मोठ्या वाटीत- चॉकलेट-चीपचं आईसक्रिम मला दिलं,आणि त्यातलं अर्ध जरी मी खाल्लं तरी माझ्या संवेदनाची पूर्ती करण्यासाठी,माझी गोड गोड खाण्याची अविरत इच्छा आणखी […]

नग्नावस्थेतलं सूख.

“मला तुमच्याकडून ह्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती.” गेल्या गणपतीच्या दिवसात माझ्या घरी माझी मुलगी आणि नात अमेरिकेहून आली होती. कॉलेजच्या पहिल्या वर्षात माझी नात शिकत असल्याने तिला खास रजा काढून यावं लागलं होतं.तिच्या बरोबर तिची मैत्रीण पण आली होती.त्यांना भारतात गणपतीचा सण कसा साजरा करतात ह्याचं खूप कुतूहल होतं. माझ्याबरोबर माझी नात एकटी असली की आम्ही […]

खूपच मोठी रात्र आहे ना!

अनुवाद. (जाने क्या बात है…..) कळे ना, कळे ना निद्रा मजला येई ना खूपच मोठी रात्र आहे ना! रात्र रात्र मला जागविले याने जणू पडछायेने वा स्वप्नाने नसे कुणीही माझा आता कुणी साथ देईना खूपच मोठी रात्र आहे ना! धड धड होते माझ्या अंतरी घाबरून मी पदर सावरी अजून जवळी प्रीतम नाही खूपच मोठी रात्र […]

दृढविश्वास

“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.” मी खालसा कॉलेजमधे गणीताचा विषय शिकायला जायचो.बरेच असे माझे प्रोफेसर सरदारजी होते.प्रो.वर्यामसींग तर माझे खास होते.त्यांची स्टॅटिस्टीकवरची लेक्चर्स मी कधीच सोडली नाहीत. सॉलीड जॉमेट्री आणि कॅलक्युलस हे ही माझे प्रिय विषय असायचे. आज मी  बरेच दिवसानी खालसा कॉलेजला भेट दिली.प्रो.वर्यामसींग आता प्रिन्सिपॉल झाले म्हणून मी […]