ते अजून मजला आठवते

अनुवादीत (वो जमाना याद है…..)

रात्रंदिवशी आंसवे हळूच वहाणे
ते अजूनी मला आठवते
तो जमाना अन प्रणयराधना
ती अजूनी मजला आठवते

पकडून माझा सदरा हिसका देणे
सुंदर मुखकमल पदरामागे दडवीणे
ते अजूनी मजला आठवते

पाहून माझी पराधीनता चेहरा लपवीणे
हातातल्या रंगीत कंगणांनी किणकिणणे
ते अजूनी मजला आठवते

करून मौजमजा अलविदा म्हणणे
सुकल्या ओठावरचे थरथरणे
ते अजूनी मजला आठवते

युगे युगे भेटलो ज्या ठिकाणी
लपत छ्पत येऊनी मिळणे
ते अजूनी मजला आठवते

दुपारच्या प्रहरी भेटलो गच्चीवरी
आलीस तू पळत अनवाणी
ते अजूनी मजला आठवते

पाहून मला लाजत न्याहाळणे
घालून दातांमधे नखे कुरतडणे
ते अजून मजला आठवते

सन्मान करूनी ठेवूनी अभिलाषा
बोलत्या लोचनानी मनातले सुचवीणे
ते अजून मजला आठवते

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co

Advertisements

5 Comments

 1. Posted ऑगस्ट 4, 2010 at 1:43 pm | Permalink

  कसे काय बुवा लिहिता जमवता तुम्ही एवढे सगळे? खरंच आश्चर्य वाटते……

  एक सुचवू का?
  बघा जमलं तर करून….विडंबनाचा प्रयत्न करून..चांगलेच जमेल तुम्हाला असे मनापासून वाटते.

  • Posted ऑगस्ट 5, 2010 at 11:07 सकाळी | Permalink

   तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
   खरंच तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे.पण खरं सांगू का,इतक्या वर्षाच्या अनुभवाची पोतडी,केलेलं वाचन,करीत असलेलं वाचन,विविध विषय घेऊन लिहिण्याची जीद्द,भरपूर वेळ,तुम्हा मायबाप वाचकांच्या प्रतिक्रियेने मिळणारी प्रेरणा,संगणकाच्या सुलभ सोयी,अंतरजालाची आणि ब्लॉग- स्फिअरची क्रांती,आणि अल्लाची मर्जी ह्याचं मेतकूट जमलं असल्याने हे होत आहे.
   बघूया,घडता घडता घडेल ते घडेल.

   विडंबना बाबत:
   आपल्या सुचनेचं स्वागत.
   विडंबन करूया म्हणून केलं जात नाही,विडंबन केलं जातं.असं मला वाटतं.
   माझ्या कवितामधून मी बरेच वेळा विडंबन केलं आहे.माझ्या काही लेखात सुद्धा दांभिकांची निष्पाप खिल्ली उडवली आहे.शोधून आपल्याला ते दिसेल.
   “लळा जिव्हाळा शब्द्च मोठे”
   “लळा जिव्हाळा शब्दच खोटे” याचं विडंबन
   “गो चेडवा मोटारीतून विमान जपान”
   “गो चेडवा पडावातून आगबोटीत जपान” याचं
   “झुणका खाल्ला रे बोरिवलीच्या हाटलात”
   “झुमका गीरा रे बरेलीके बाजार मे” याचं
   “प्रतिसाद मनी धरूनी कुणी लेख लिहित नसावे”
   “प्रतिमा उरी धरूनी मी प्रिती गीत गावे” याचं
   “वा बाबा वा”
   “वा बाळा वा” याचं विडंबन
   जरूर वाचावं.

 2. Madhavi Padgaonkar
  Posted ऑगस्ट 8, 2010 at 6:44 pm | Permalink

  good kavita.. madhavi


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: