Monthly Archives: ऑक्टोबर 2010

मला पुस्तकातला किडा म्हटलं तरी चालेल.

“ज्ञान मिळवण्यातली खरी मजा ही की,ते तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेऊ शकणार नाही.” मधूकर ह्यावेळी बारावीत पहिल्या दहात आला असं मला माझा मित्र रमेश पराडकर यांनी फोन करून आपल्या मुलाबद्दल सांगीतलं,तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो. त्याचे बरेच मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमले होते.त्याच्या कामगीरीची स्तुती करीत होते.मला ते बघून मधूकरबद्दल अभिमान वाटला. […]

सुधाताईची आजी.

“कुणीतरी म्हटलंय, असं जीवन हे अपूर्व जीवन असतं,अगदीच थोडक्याच वेळात बरंच शिकण्यासारखं हे जीवन असतं.” सुधाताईची आजी बॅण्ण्व वर्षाची झाली हे मला अलीकडेच कळलं.आणि तशात तिला स्मृतिभ्रम झाला आहे हे आत्ताच सुधाताईकडून कळलं.वाटलं आपण सुधाताईकडे जाऊन आजीला भेटून यावं.ती मला ओळखेल की नाही असं मनात आलं.पण तिने मला चांगलंच ओळखलं.मला बरं वाटलं. सुधाताई बोलताना मला […]

माझा मोत्या.

“चवदा वर्षं माझ्या घरात राहून माझ्या मोत्याने मला जबाबदारीने कसं रहावं हे शिकवलं असेलच.पण त्यापुढे जाऊन मला त्याने जगावं कसं हे ही शिकवलं.” सुरेशने मला आज खास घरी बोलावलं होतं.मी त्याला माझ्या घरी भेटलो नाही.पण त्याने घरी मला निरोप ठेवला होता. कशासाठी ते मला घरी आल्यावर कळेल असंही माझ्या पत्नीकडे सांगून गेला होता. मी ज्यावेळी […]

अमेरिकेतला भारतीय बाप.

“कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त वाटायचं आणि मोठी माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.” आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा. पण आज काही विशेष त्याना सांगायचं होतं […]

मस्त हंसायला मला बरं वाटतं.

“मस्त हंसायला मला बरं वाटतं कारण आपल्या दृष्टिकोनात आपल्याला बदल करता येतो.अगदी कायमचा.कदाचीत ती गोष्ट -एक माणूस एका दारुच्या गुत्यात जातो वगैरे-तुम्हाला माहीत असेलच.तर मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही-थोडा वेळ का होईना- ती गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच आयुष्यभर तुम्ही ध्यानात ठेवलेली असणार.अर्थात दारू पिणार्‍याच्या दृष्टीकोनातून म्हणा.” गप्पा गोष्टी करीत असताना गुरूनाथ मला असं […]

हक्क आहे तो तुझा

अनुवाद (तुम मुझे भूल भी जाओ……) विसरलास जरी तू मला हक्क आहे तो तुझा मी तर केली प्रीति तुजवरती नको विचारू कारण मला माझ्या हृदयाचे माझ्या मनाचे नको विचारू मोल मला मला फसविलेल्या आठवांचे नको विचारू परिणाम मला का करावी मी प्रीति तुजवरती का न करावी तू ती मजवरती ह्या प्रश्नानी करू नको उद्विग्न मला […]

मी आणि माझं लेखन.

का कुणास ठाऊक.काल रात्री प्रो.देसाई माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, “तुम्हाला लेखन करण्यात विशेष असं काय वाटतं?” त्यांच्या ह्या प्रश्नावर मी खो,खो हंसायला लागलो. “हंसू नका,मी गंभीर होऊन तुम्हाला विचारतोय” इती प्रोफेसर. मी पण गंभीर होऊन त्यांना सांगू लागलो, “मला लेखन करण्यात विशेष वाटतं.लॅपटॉप ऊघडलेला,बोटं कीबोर्डच्या कीझवर,विचार वाचकांसाठी आणि लेखनाला प्रारंभ. प्रत्येक क्षणातले मनोभाव,प्रत्येक […]

कल्पना वागळेंचं कुतूहल.

माझा मित्र मला कल्पना वागळेंच्या नृत्याला एकदा घेऊन गेला होता.मी ह्या बाईंचं नांव पूर्वी ऐकलं होतं.पण त्यादिवशी प्रत्यक्षात माझी आणि त्यांची भेट झाली.माझा मित्र त्याला कारण झाला. मला त्यांचं नृत्य पहाताना, ह्या बाईंना आपल्या नृत्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगायचं आहे हे प्रकर्शाने जाणवत होतं.शहरात ह्यांचे बरेच ठिकाणी क्लासीस आहेत.आणि विद्यार्थीनींची बरीच गर्दी असते असं माझा […]

असाच एक खवैय्या आचारी.

“तुम्ही तुमच्या अवघ्या आयुष्यात एकदा जरी एक कप चहा केलात किंवा एक पोळी भाजलीत तरी तुम्ही कळत-नकळत ह्या असामान्य पाककलेचा एक भाग होऊन जाल.” मला आठवतं,त्या माझ्या कोकणच्या ट्रिपमधे एकदा मी एका रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो होतो.माझ्या एका मित्राने मला इथे जेवण्याची शिफारस केली होती.मी जेवत असताना कॅशरच्या टेबलाजवळ एक व्यक्ति कॅशरबरोबर बोलताना माझ्याकडे बघून बोलत […]

सुगंधाची धुंद.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍याला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग….. हरवलेले फूल आणून देताना जेवढा तुला आनंद झाला दुप्पटीने झाला आनंद मला फुल ते हातात घेताना सुगंध त्याचा दरवळला उजळूनी जुन्या आठवणी पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे आणिती […]