Monthly Archives: नोव्हेंबर 2010

शुभेच्छा पत्र.

“ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.” पोस्टमनने घरात ढीगभर पत्रं आणून टाकली आणि त्यात तुम्हाला एखादं शुभेच्छेचं पत्र असेल तर एका क्षणात तुमचा दिवस आनंदाचा जातो किंवा […]

जेव्हा गळाला मासा लागतो.

“कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे.” वेंगुर्ल्याहून आजगांवला जाताना वाटेत मोचेमाड हे गांव लागतं.मोचेमाड येई पर्यंत लहान लहान दोन घाट्या जढून जाव्या लागतात. जवळच्या घाटीच्या सपाटीवर पोहोचल्यावर, त्या डोंगराच्या शिखरावरून खाली पाहिल्यावर, असंख्य नारळांच्या झाडा खाली, छ्पून गेलेलं मोचेमाड गांव दिसतं.पण त्याहीपेक्षा डोळ्यांना सुख देणारं दुसरं विलोभनिय […]

आता मिलन होईल कसे

(अनुवादीत) जा विसरूनी तू मला आता मिलन होईल कसे फुल तुटले डहाळी वरूनी फुलणार कसे ते फिरूनी चांदण्या पहातील चंद्रमाकडे लहरी येतील किनार्‍याकडे पहात राहू आपण एकमेकांकडे नयनी आंसवे आणूनी म्हणू… जा विसरूनी तू मला आता मिलन होईल कसे फुल तुटले डहाळी वरूनी फुलणार कसे ते फिरूनी शहनाईच्या गुंजारवात सजणी जाईल सजूनी मेंदी हाताला लावूनी […]

स्वयंपाक घरातला दिवा पेटताच असु दे.

“शरद तुंगारे ह्यावेळी मलाही अनुमोदन द्यायला विसरला नाही.” सुलभा आणि तिचा नवरा शरद तुंगारे माझ्या मागून येत होते.मला कळलं जेव्हा शरदने माझ्या पाठीवर थाप मारून मला सावध केलं तेव्हा.त्यांचं घर अगदी जवळ होतं.आमच्या घरी चलाच म्हणून सुलभाने हट्ट धरला. “नेहमी पुढच्या खेपेला येईन म्हणून आश्वासनं देता.आज मी तुमचं ऐकणार नाही.आणि तुम्हाला आवडतं ते बांगड्याचं तिखलं […]

स्थीर गती आणि माझे बाबा.

. “ती वेळ लवकरच येणार आहे. कारण तुलाच तुझ्या स्वतःच्या गतीला स्थीर करायची पाळी येणार आहे.” मंगला आपल्या वडीलांवर खूप प्रेम करायची.अलीकडे बरेच दिवस वार्धक्याने ते आजारी होऊन दवाखान्यात होते. एकदा मी त्यांना दवाखान्यात भेटून आलो होतो.पण त्यांचं निधन झालं हे ऐकल्यावर मी मंगलाला भेटायला तिच्या घरी गेलो होतो. माझ्याशी बोलताना मंगला आपल्या बाबांच्या आठवणी […]

माझी खास खोली.

धाके कॉलनीतल्या जुन्या इमारती आता पाडून नवीन टॉवर्स यायला लागले आहेत.बरेच लोक पैसे घेऊन दुसर्‍या ठिकाणी जातात,तर काही नव्या टॉवर्समधे आणखी जागा घेऊन रहायला तयार होतात.प्रत्येकाच्या आर्थीक परिस्थितीवर आणि त्यांच्या इच्छेवर हे अवलंबून असतं. आमचे शेजारी, तावडे कुटूंब, टॉवरमधे रहायला गेले.त्यांनी तेराव्या मजल्यावर दोन फ्लॅट्स घेतले.त्यांच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभं राहिल्यावर जुहूची चौपाटी स्पष्ट दिसते.वारा […]

झब्बू

“हा महत्वाचा संदेश मला मुलांना द्यायचा असतो.त्यानी हे शिकावं ह्यासाठी मी आतुर होत असतो.कारण त्यावर माझा भरवंसा आहे.” इती गणपत. दीवाळी आली आणि सर्व जवळचे नातेवाईक जमल्यावर, घरात धमाल येते.पत्त्याचा डाव निश्चितच मांडला जातो.” मी गणपतला सांगत होतो. गणपत माझा मित्र.दीवाळीच्या फराळाला मी त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं.घरात पत्याचा डाव जोरात रंगलेला पाहून त्यालाही […]

हास्यप्रदेची क्षमता.

“आपण इतक्या लवकर नरकात पोहोचूं असं वाटलं नव्हतं” प्रो.देसाई मला, आपल्या लहानपणाची आठवण येऊन, एक किस्सा सांगत होते. “एकदा मला आठवतं,मी नऊएक वर्षांचा असेन,मी घरातून बाहेर मागच्या अंगणात धांवत धांवत जात होतो. संध्याकाळची वेळ होती.किचनमधे माझी आई अंधारात निवांत बसून होती.तिचा तो दुःखी चेहरा पाहून मला खूपच वाईट वाटलं.सकाळपासून संबंध दिवसभर माझी आई हंसताना मी […]

जादूगार डॉ. बावा.

“माझी आजी मला जे सांगायची त्यावर मी आता दोनदोनदा विचार करतो.” रघूनाथच्या पायाला वरचेवर सुज यायची हे मला अगदी पूर्वी पासून माहित होतं.पण अलीकडे तो त्या सुजेची तक्रार करीत नव्हता. त्याचं असं झालं,माझ्या बहिणीच्या मुलाला पण असाच व्याधी झाला होता.तिनेपण त्याच्या सुजेवर बरेच उपाय केले होते.संधिवातामुळे असं होतं म्हणून डॉ.मसूरकरानी तिला सांगीतलं होतं.त्या व्याधीबरोबर आता […]