स्पर्श.

“जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.”

आज प्रो.देसाई बरेच उदास दिसले.माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी ताडलंय, की अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना तळ्यावर भेटतो तेव्हा ते बराच वेळ माझ्याशी बोलत नाहीत.

आता इकडे शरद ऋतू चालू झाला आहे.झाडांची पानं रंगीबेरंगी व्ह्यायला लागली आहेत.प्रत्येक झाडांच्या पानांचा एक एक रंग पाहून निसर्गाच्या कुंचल्याची आणि त्याच्या रंग मिश्रणाच्या तबकडीची वाहवा करावी तेव्हडी थोडीच आहे असं वाटतं.

लवकरच ही रंगीबेरंगी पानं,येणार्‍या वार्‍याच्या झुळकीबरोबर,देठापासून तुटून खाली पडणार आहेत.सर्व झाडांच्या फांद्या नंग्या-बोडक्या होणार आहेत.थंडी जशी वाढत जाईल तशी वातावरणात एक प्रकारचा कूंदपणा येणार आहे.
खुपच थंडी पडली की मग आम्ही तळ्यावर फिरायला येत नाही.ह्या वयात तेव्हडी थंडी सोसत नाही.बरेच वेळा मग आम्ही दोघं घरीच भेटतो.

मीच भाऊसाहेबांशी विषय काढून त्यांना बोलकं केलं .
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, इकडचा शरद ऋतू, निसर्गाला उदास करतो. झाडांची हिरवीगार पानं गेल्यानंतर झाडांकडे बघवत नाही.पक्षीपण दूर कुठेतरी निघून जातात. सर्व वातावरण सुनंसुनं दिसतं.म्हणून मी निसर्गच उदास झाला असं म्हणतो. आपणही काहीसे ह्या दिवसात उदासच असतो.बाहेरची कामं थप्प होतात. कुठे जावंसं वाटत नाही.”

“खरं आहे तुमचं म्हणणं”
असं बोलून प्रो.देसायांनी आपलं मौन सोडलं.
आणि म्हणाले,
“मी बोललो नाही,कारण मी बराच वेळ ह्या शरद ऋतूवर विचार करीत होतो.माझ्या मनात एक कल्पना आली.आता पर्यंत ही झाडांची पानं हिरवी गार होती.वार्‍याच्या स्पर्शावर ती हलायची. आता हळू हळू वार्‍याचा वेगही वाढणार आहे. तो वार्‍याचा स्पर्श त्या पानाना सहन होणार नाही.ती पानं रंगीबेरंगी होत होत काही दिवसानी पडणार आहेत. म्हणूनच ह्या मोसमाला फॉल असं म्हणतात.तुम्हाला आठवत असेल कदाचीत,पण मला आठवतं मी लहानपणी कोकणात रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावरची पानं वार्‍याच्या स्पर्शाने सळसळली की घाबरायचो.तसं इथे पिंपळाचं झाड माझ्या पहाण्यात नाही. कदाचीत पिंपळाला इकडची थंडी सोसवली नसती.पण आता ह्या ऋतुत वारा एव्हडा सोसाट्याने वहाणार आहे की,पिंपळाचं झाड असतं तर वार्‍याच्या स्पर्शाने प्रचंड सळसळ ऐकायला मिळाली असती.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मला आठवतं,कोकणात आमच्या अगदी लहानपणी आमची आजी ,रात्री आम्ही लवकर झोपावं म्हणून आम्हाला थोपटत असताना पिंपळाच्या झाडाच्या पानांच्या सळसळीकडे आमचं लक्ष वेधून त्या शांत वातावरणातल्या गांभिर्याची भीति घालून म्हणायची,
“मुंजा पिंपळाचं झाड हलवतोय.लवकर झोपला नाहीत तर
तो घरात येईल.”
खरं सांगायचं तर,त्या भीतिपेक्षा आजीच्या थोपटण्याच्या हाताच्या स्पर्शाने आम्हाला झोप यायची.”

“का कुणास ठाऊक,ह्या स्पर्शावरून माझ्या डोक्यात एक विचार सुचला.”
प्रोफेसर जरा मुड मधे येऊन मला सांगायला लागले.
“एखादं लहान मुल रडत असलं तर त्याला नुसता स्पर्श केल्यावर ते ताबडतोब रडायचं थांबतं.एखादी व्यक्ति अगदी शेवटच्या प्रवासात असताना, केलेला स्पर्श तिला किती सांन्तवन दे्तो?,किती दिलासा देतो?,एखाद्याशी नवीन नातं जुळवत असताना केलेला स्पर्श ते नातं अधिक खंबीर व्हायला किती उपयोगी होतं? हे मी अनुभवलं आहे.ह्या स्पर्शाची क्षमता मी जाणली आहे.

कुणालाही आपला हात पुढे करणं किंवा आलिंगन देणं आणि हलो किंवा गुडबाय म्हणणं ह्यावर माझा विश्वास आहे. एखादा जीवश्च-कंटश्च मित्र सोफ्यावर जवळ बसून एकमेकाशी बोलत असताना त्याच्या खांद्याभोवती हात टाकून बसायला मला बरं वाटतं.रस्त्यावरून चालत असताना कुणी चुकून मला धक्का दिला तर “हरकत” नाही म्हणायला मला बरं वाटतं.”

मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“मला नेहमीच असं वाटतं की स्पर्शाने आपण शाबूत रहातो.
मला असं नेहमीच वाटत असतं की दुसर्‍याशी स्पर्श झाल्याने ती व्यक्ति आपल्याशी व्यक्तिगत दुवा सांधते,आणि आपण त्या व्यक्तिबरोबर व्यक्तिगत दुवा सांधतो,मानवतेशी दुवा सांधला जातो.

मी पाहिलंय की,स्पर्शाने आपात स्थितीत काम करणार्‍या व्यक्तिना परिहार मिळतो.साधं हस्तांदोलन केल्याने एकमेकाशी विरोध करणार्‍या राजकारण्यात समझोत्याच्या सजीवतेची ठिणगी पडून अनेक वर्षाचे तंटे-बखेडे समाप्त होतात.”

माझं हे स्पर्शाबद्दलच मत ऐकून गप्प बसतील तर ते प्रो.देसाई कसे होतील.
मला म्हणाले,
“तुम्ही सांगता ते मला पटतंय.
मी पाहिलंय की स्पर्शाने माझ्याच स्वाभाविक बुद्धिमत्तेचा आणि माझ्या मेंदुतल्या तर्कसंगत हिशोबाचा दुवा सांधला जातो.माझ्या नजरेतून चुकलेलं नाही की,स्पर्शाने माझ्याच संवेदना जागृत होतात. ज्या मी पुर्णपणे हिरावून बसलो असं वाटून घेत असे.
माझी खात्री झाली आहे की,स्पर्शामुळे प्रत्येकात सुधारणा होते, प्रत्येकाच्या संबंधात सुधारणा होते,आणि सरतेशेवटी प्रत्येकाच्या भोवतालच्या जगात सुधारणा होते.
माझी खात्री झाली आहे की प्रत्येकाला जर का सकारात्मक स्पर्शाची जाणिव झाली तर,युद्धाची,जाती-भेदाची, मुलांवर होणार्‍या अत्याचाराची,स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराची आणि दुसर्‍यावर दोष ठेवण्याच्या संवयीची समाप्ती होईल.

स्पर्शाचा विचार केल्यावर माझ्या लक्षात येतं की,स्पर्श माणसाला त्याच्या मनात चांगलं वाटावं,वाईट वाटून घेऊ नये, अशी आठवण करून देतो. आत्मीयतेची भीति मनात असल्याने स्पर्श अनाथ असल्यासारखा आपल्या जीवनात भासतो.माझी खात्री आहे की  “तू” आणि “मी” चं “आम्ही” त परिवर्तन करण्यात स्पर्शात ताकद आहे.”

विषय निघाला शरद ऋतूचा.वार्‍याच्या स्पर्शाचा.पिंपळाच्या पानांच्या सळसळीचा.असं होत होत स्पर्शावर चर्चा वाढत गेली.

काळोख बराच होत आला होता.बोलत बसलो तर हा विषय संपायला बराच वेळ जाईल.म्हणून मी आवरतं घेत म्हणालो,
“शेवटी मी एव्हडंच सांगीन की,जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.
माझा स्पर्शावर भरवंसा आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

7 Comments

 1. Posted डिसेंबर 3, 2010 at 5:10 सकाळी | Permalink

  Ati Sundar.

 2. chitra mantri
  Posted डिसेंबर 4, 2010 at 12:12 pm | Permalink

  hello Samantdada,

  kase aahat,
  aaj cha lekha far avadala,
  eka changlya vishyala tumhi sparsha kelat,

  aapli snehankit, chitra

  • Posted डिसेंबर 6, 2010 at 10:17 सकाळी | Permalink

   नमस्कार चित्रा,
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 3. chitra mantri
  Posted डिसेंबर 4, 2010 at 12:13 pm | Permalink

  hello Samantdada,

  kase aahat,
  aaj cha lekha far avadala,
  eka changlya vishyala tumhi sparsha kelat, tumhi sagli lahanpanichi athvan karun deta.

  aapli snehankit, chitra

  • Posted डिसेंबर 6, 2010 at 10:18 सकाळी | Permalink

   नमस्कार चित्रा,
   मी खुशाल आहे.तू कशी आहेस?.तुझी खूप दिवसानी आलेली इमेल पाहून खूपच आनंद झाला.माझा लेख तुला आवडला हे वाचून बरं वाटलं.बालपण कुणाला आठवणार नाही? बालपण आठवून मन खूप प्रफुल्लीत होतं.तुझ्या सारखे माझे प्रेमळ वाचक मला लिहायला स्फुर्ति देतात.मी भाग्यवान आहे.
   हेच बघ तू मला बालपणा विषयी विचारून माझ्याच एका कवितेची आठवण करून दिलीस.कदाचित ती तू वाचलीही असशील.

   ती सुखद स्वप्नें बालपणाची

   आठव आली फिरूनी मला
   लोपलेल्या आततायी बालपणाची
   हाय! एकली मला सोडूनी गेली
   ती वेळ निक्षूनी परतण्याची

   ते खेळ ते संवगडी अन झुले
   पळत जाऊनी म्हणती ते शीवले
   विसर पडेना त्या दिवसांची
   ती सुखद स्वप्नें बालपणाची

   सर्वां नसे जाण त्या बालपणाची
   नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची
   नसे तेव्हडी सुलभ, असे महाकठीण
   बालपणाच्या प्रीतिला विसरण्याची

   मिळूनी रडावे अन फिरूनी आठवावे
   लोपलेल्या त्या दिवसाना
   भेटेल् का वाटेत कुणी ओळखीचा
   तो मित्र जुना माझ्या बालपणाचा

   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.कोकण आणि कोकणाविषयी लिहायचं माझ्या मनात आल्यावर तुझी आठवण येते.कारण तो लेख तुला नक्कीच आवडणार. नवीन वर्षाच्या, तुला आणि तुझ्या प्रेमळ कुटूंबियाना, शुभेच्छा.
   तुझा
   सामंतदादा

 4. chitra mantri
  Posted डिसेंबर 13, 2010 at 10:03 सकाळी | Permalink

  hello dada,

  pratuttarabaddal abhar, lekh nehmi vachte mi tumche, pan pratikriya lihili nahi baryach divasat, na bhetlyane nahi tutatat ka?
  ashi jar ti tutly tar mug ti kasli nati.

  aapli snehankit

  chitra


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: