Monthly Archives: जानेवारी 2011

आवेश.

“अगदी खरं सांगायचं तर,ही ठिणगी माझ्यात केव्हा पडली की ज्यामुळे मी रंगमंचावर प्रज्वलित होऊ शकले ह्याची मला कल्पनाच नाही.आणि ह्यातच सर्व महात्म्य पुरून उरलं आहे.” ह्यावेळी कोकणात मी सुनंदाबाई वाडकर यांच्या घरी गेलो होतो. सुनंदाबाई आता खूपच थकल्या आहेत.आमच्या लहानपणी त्या दहीकाल्यात आणि छोट्या,मोठ्या नाटकात कामं करायच्या.माझी त्यांची ओळख होती.दिगसकर नाटक कंपनी,पारसेकर नाटक कंपनी ह्या […]

तू साद मला देऊ नकोस

अनुवाद. अशा एकांतातल्या रात्री तू साद मला देऊ नकोस अशा सुरांनी रडू यावे ते वाद्य मला देऊ नकोस शपथ घेतली तुला न भेटण्याची माहित नसावे माझ्यावर बेतण्याची घेऊन शपथ बहकून जाईन असे मला तू करू नकोस अशा एकांतातल्या रात्री तू साद मला देऊ नकोस मन माझे डुबले उमेद माझी तुटली हातून माझ्या माझी सुखाणू सुटली […]

सुट्टी

“उत्तम उपाय म्हणजे आता लग्न कर.म्हणजे सुट्टीचा आनंद घ्यायला आणि कामाचा तणाव कमी वाटायला हा पण एक उत्तम उपाय आहे हे तुला दिसून येईल.” आमच्या फ्लॅटमधून बाहेर आल्यावर खाली उतरताना दुसर्‍या मजल्यावर कमलाकर रहातो.रोज मी सकाळी कामावर जाताना त्याच्या फ्लॅटच्या दरवाजावर भलं मोट्ठं कुलूप बघतो.आणि तसंच संध्याकाळी येताना कुलूप दिसतं.त्याचा अर्थ कमलाकर माझ्या अगोदर निघून […]

रंगरंगोटी.

“सरतेशेवटी तुझ्या म्हणण्य़ावरून माझं मत मी तुला सांगतो.सौन्दर्य प्रसाधनं लावून चेहर्‍याची रंगरंगोटी माननीय दिसायला हवी.आणि त्याकडे कुणी उपेक्षितपणे पाहता कामा नये.” शुभदाची लहानपणापासूनची ख्याती म्हणजे साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी.अशी मी तिला बरेच वर्ष पहात आलो आहे.मधे तिचा माझा संपर्क कमी झाला.शुभदा एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्यासाठी बंगलोरला गेली आहे असं तिचे वडील मला एकदा […]

व्रण

“जेव्हडे म्हणून माझ्यावर व्रण आहेत ते माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे मी भोवलेले आहेत.” मला माझ्या लहानपणी नेहमीच वाटायचं की,माझी मुलं त्यांच्या बालपणाचं आकलन,त्यांच्या जवळ किती खेळणी होती,ह्यावरून नकरता त्यांच्या अंगावर किती व्रण मोजता येतील यावरून करतील.मला व्रणाबद्दल विशेष वाटतं. व्रणावरून माझ्या मनुष्यपणाचं लक्षण अजमावलं जातं,कारण प्रत्येक व्रणाला स्वतःचा म्हणून एक इतिहास आहे. मग तो व्रण किती […]

चिकटमातीच्या बाहुल्या.

“चित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून मी तिला जवळ घेतलं.ते अश्रू आनंदाचे होते आणि दुःखाचेही होते.” अलीकडे मुंबईत खूप पाऊस पडला की पाणी प्रचंड तुंबून रहातं.सगळे व्यवहार ठप्प होतात.तसं पूर्वी होत नव्हतं.त्याचं कारण काय असावं ह्याचा विचार करण्या ऐवजी माझं मन तो दिवस आठवण्यात मग्न झालं.असाच मी एकदा अंधेरी स्टेशन जवळ वरसोवाच्या बससाठी लाईनीत उभा होतो.पाऊस […]

रंगमंच.

“मी ती धून नुसतीच वाजवली नाही तर मी वन्स-मोअर घेतला.” लग्नाचा समारोप झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी एकाच्या घरात पार्टी होती.मला त्या पार्टीला आमंत्रण होतं.रात्री गाण्याचा कार्यक्रम होणार होता हे मला माहीत नव्हतं.पार्टी संपल्यावर मी निघून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या घराची बेल वाजली आणि बघतोतर मृणाल खरे आणि तिच्याबरोबर पेटी,तबला,व्हायोलीन वाजवणारे दोन-तीन लोक होते.मला पाहून मृणालला आश्चर्य […]

लाली लज्जेची आली गालावरती

अनुवाद शब्दा शब्दाला तू रूसूं नकोस तुला स्वतःला फसवूं नकोस रंग बदलत राहे हे जीवन तुझ्याच भाग्यावरी रूसूं नकोस लाली लज्जेची आली गालावरती ओल्या होऊनी पापण्या हळूच झुकती लाली नयनामधे अन अंतरी प्रीति लपून छपून येई हंसू ओठावरती ढळल्या रात्री काळोखा घेऊनी नव्या पहाटे येती दिशा बहरूनी भरूदे जीवन दुःखानी वा सुखानी नशिबी आहे रहाणे […]

डुलकी.

“थोडक्यात मी म्हणेन सगळं जग निश्चिंत आणि शांत रहाण्यासाठी लोकांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात थोडा डुलकी घेण्यासाठी वेळ ठेवावा.” आज शुक्रवार होता.मी ऑ्फिसमधून जरा लवकर निघालो.लवकर निघण्याचं आणखी एक कारण होतं.अपनाबजारमधे हापूसचे आंबे आले आहेत हे मी दुकानाच्या बाहेर लिहून ठेवलेली पाटी सकाळी ऑफिसात जाताना वाचली होती. एक चांगली देवगडच्या हापूस आंब्याची पेटी घेऊन दुकानाच्या बाहेर […]

शोभनेची सहजता.

“मला एव्हडं माहीत झालं आहे की,जीवनातल्या साध्या गोष्टी,ज्या मामूली आणि नगण्य वाटतात त्याच खरं जीवन जगण्यालायक करतात.” शोभना न्युरॉलॉजीमधे पीएचडी आहे.इंग्लंडला शिकली.तिकडेच प्रकाश जोशी ह्या बिझीनेसमनशी ओळख झाल्यावर काही दिवसात प्रेमात पडली.अलीकडेच ती दोघं मायदेशात लग्न करण्यासाठी आली आहेत. मी तिच्या सर्व लग्न सोहळ्यात सहभागी झालो होतो.जीन आणि टॉपमधे दिवसभर रहाणारी शोभना,लग्नात नऊवारी लुगड्यापासून,नथ,हार बांगड्या, […]