का प्रीत ह्यालाच म्हणावे

अनुवादीत.

जरी तू जवळी असशी
अथवा तू दूर रहाशी
माझ्या नयनी तुजला
मी सदैव ठेवीते संभाळूनी
कुणी सांगेल का एव्हडे
का प्रीत ह्यालाच म्हणावे

इवलीशी कथा असे प्रीतिची
कष्ट न घेई कुणी सांगण्याची
थोडा यत्न होई तुझा लाजण्याचा
अन यत्न होई माझा लाजण्याचा

मिलनाचा समय पुरेसा नसे
अन रात्र विरहाची वाढत जातसे
सारे विश्व जेव्हा निद्रेत असे
समय चांदण्या मोजण्यात जातसे

कुणी सांगेल का एव्हडे
का प्रीत ह्यालाच म्हणावे

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. geeta sharma
  Posted फेब्रुवारी 9, 2011 at 2:25 pm | Permalink

  kaka too good. like it.

  • Posted फेब्रुवारी 9, 2011 at 6:51 pm | Permalink

   थॅन्क्स गीता.
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 2. nisha
  Posted फेब्रुवारी 9, 2011 at 9:19 pm | Permalink

  samant kaka……. tumhi misalpav var pan lihayachat na? tikde yene ka band kele….

  madhun madhun tumche june lekh parat konitari pratikriya delyane var yet asatat….

  tikde pan lihayala suruvat kara ki parat!

 3. Posted फेब्रुवारी 10, 2011 at 6:27 pm | Permalink

  नमस्कार निशा,
  हो मी मिपावर लिहित असायचो.माझ्या ह्या ब्लॉगवर येऊन आपल्याला नक्कीच वाचायला मिळेल.
  बघूया मिपावर येण्याचा केव्हा योग येतो ते.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: