M.F.who(in)सेन यास अनादरांजली.

“विट्ठलास काळजी तुझ्या थडग्याची
नव्हती करायची भूमी अपवित्र पंढरपूराची”

असं म्हणतात,गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये.कारण त्याला त्याची सफाई देता येत नाही.पण तू गेल्यानंतर तुझ्याबद्दल जे काही वाईट मी वाचलं त्याला तू खरोखरंच जबाबदार होतास असं मला वाटतं.म्हणून नाईलाजाने माझ्या मनातले विचार मी इथे लिहित आहे.

तसं पाहिलं तर तुला मी पंचावन्न वर्षापूर्वीच पाहिलंय.मी तेवीस वर्षाचा होतो.तू तुझ्या चाळीशीत असावास.मी कुलाब्याला TIFR मधे नुकताच ज्युनीअर सायंटीस्ट म्हणून लागलो होतो.तुला मी तिथे बरेचदा पाहिलं आहे. तुला डॉ.होमी भाभानी एक म्युरल-चाळीस फुट लांब आणि दहा फुट उंच कॅनव्ह्यासवर काढलेलं चित्र- काढायला दिलं होतं.”फुरफुरणार्‍या घोड्याचं” ते चित्र होतं.TIFRच्या वास्तूत मेझनाईन फ्लोअरवर लायब्ररीच्या बाजुला
असलेल्या भिंतीवर ते लावलेलं आहे.पुर्ण चित्र काढून झाल्यावर तू फिनीशिंग-टच देण्यासाठी तिकडे यायचास. त्यावेळी तुझ्या एका हातात रंगाचा कुंचला,दुसर्‍या हातात मिश्रीत रंगाची थाळी घेऊन तू सकाळपासून त्या म्युरलला ट्च देत असायचास.तुला त्या चित्रासाठी भाभानी एक लाख रुपये दिले म्हणे.(त्या दिवसात डॉलर तीन रुपयाला मिळायचा,ब्लॅकमधे पाच रुपये लागायचे)
त्यावरून त्यावेळच्या एक लाखाची किंमत आता काय झाली असेल ते तूच ठरव.

काळी भोर दाढी-मिशी आणि डोक्यावरचं झिपरं काळं कुट्ट असा तू दिसायचास.तुझे पाय अनवाणी असायचे.मात्र नंतर तुझ्या डोक्यावरची झिपरी आणि दाढी-मिशी एकदम पांढरी सफेद झाली.आणि पाय अनवाणीच राहिले.ते म्युरलवरचं चित्र तू बेमालूम सूंदर काढलं होतंस.तुला चित्रकार म्हणून अल्लाची देणगी असावी.एक मराठी माणूस पंढरपूरचा.अस्खलीत मराठीत बोलणारा.भावी चित्रकार.म्हणून तुझा मला आदर वाटायचा.डॉ.भाभा स्वतः एक अप्रतिम चित्रकार होते.त्यानी तुला निवडला ह्यातच सर्व भरून आलं असं मला वाटलं.

हे सर्व आठवलं मला जेव्हा, तू परदेशात अल्लाला प्यारा झालास, ही मी बातमी वाचली तेव्हा.नंतर तुझ्या बाबत अनेक बातम्या वाचल्या,अग्र लेख वाचले, ब्लॉगवरचे पोस्ट वाचले.त्यावरचे प्रतिसाद वाचले.तुझी कारकीर्द वाचली.तुझ्या बद्दल चांगलं लिहिलेलंपण वाचलं.तुझी काहीनी पिकासो बरोबर देशी-पिकासो म्हणून तुलना केली. प्रत्येक गोष्टीकडे पहायला प्रत्येकाचा दृष्टीकोन निराळा असू शकतो.

मला वाटतं तू तेव्हा वाहत गेलास, जेव्हा तू स्रीयांची, नव्हेतर देवींची, नग्न चित्र काढायला लागलास. तुला अल्लाबद्दल,पैगंबराबद्दल जशा भावना आहेत तशाच इतरांना त्यांच्या देव-देवीकांच्या भावना असणारच ना?आईची विटंबना केलेली कुणाला आवडणार?तू पैगंबराचं अशा पद्धतिचं चित्र का काढायला धजला नाहीस?.तसं त्याचं चित्र काढलं असतस तर तुला कतारचं नागरीकत्व मिळालं असतं का? एकमात्र तुला माहित होतं की तुझ्या मायदेशात सर्व काही सहन केलं जातं.म्हणून तू इतरांची विटंबना करण्यास धजलास.पण तुझा अंदाज चुकला.ज्यांना तुझी ही वागणूक आवडली नाही त्यांनी तुला सळोकापळो करून सोडलं.आणि तू तुझा मायदेश सोडून निघून गेलास. काय ही अधोगती.?ह्याचं उत्तर तुझ्या अल्लाकडेपण नसणार.असो.

मनातले विचार प्रकट करायला नागरी स्वातंत्र्य हवं,हे मलाही मान्य आहे.पण तू त्याचा भलताच फायदा घेतलास.म्हणूनच हे सांगण्यासाठी माझ्या मनातले विचार मी इथे लिहितोय.मात्र एक आहे कुणी कुणाच्या श्रद्धेबरोबर खेळ खेळू नये असं मला वाटतं.आणि तसं कुणालाही वाटतं,तसंच तुलाही वाटायला हवं.पण तसं काही दिसलं नाही. म्हणूनच मी तुला वाहत गेलास असं म्हणतो.माझ्या मनातला तुझ्या बद्द्लचा आदर नाहीसा झाला.म्हणूनच माझी ही तुला अनादरांजली आहे.

ह्या असल्या तुझ्या वागण्यामुळे तुला तुझी खूप नुकसानी करून घ्यावी लागली.सरतेशेवटी देश सोडून दुसर्‍या देशाचं नागरीकत्व घ्यावं लागलं.कारण तुझ्याच मायदेशात तू लोकाना नकोसा झालास.
हे सर्व तुझ्याबाबत मी लिहिलेलं गद्यात. मला पद्यात लिहायला स्फुर्ती येते.नव्हे तर कवितेतच मला माझ्या मनातलं जास्त सांगता येईल.

अनवाणी पायानी तू करीत होतास देखावा
उद्देश होता तुझा तुला लोकानी विचित्र पहावा

कुणी म्हणू लागले की तू देशाचा पिकासा
खरं म्हणशील तर तू झाला होतास नकोसा

गजगामीनीत तू तिला चितारलीस पाठमोरी
सुंदर दिसत होती चित्रपटात दिक्षीतांची माधुरी

नंतर तुला लागले अक्षरशः म्हातारचळ
देवींना चितारलेस न दाखवीता अंगावर पातळ

मायदेश सोडून घेतलेस तू कतारचे नागरीकत्व
समजलास तू तुला इथे उरलेच नाही महत्व

नागड्या पैगंबारास तू चितारलास असता
तुझा मुडदा त्यांनी तिथे गाडला नसता

विट्ठलास काळजी तुझ्या थडग्याची
नव्हती करायची भूमी अपवित्र पंढरपूराची

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

8 Comments

 1. mangesh nabar
  Posted जून 23, 2011 at 7:28 pm | Permalink

  या चित्रकाराच्या मरणानंतर अनेक लेख वाचनात आले. कोणी त्याला दुषणे दिली, कोणी आपल्या देशातील हुसेन-विरोधी मते असणा-या लोकांना नावे ठेवली. आपला हा लेख मात्र मला समतोल विचारांचा वाटला. सर्व लेखात तुमचा लेख उठून दिसला.
  मंगेश नाबर.

  • Posted जून 24, 2011 at 6:42 pm | Permalink

   नमस्कार मंगेशजी,
   आपलं अवलोकन बरोबर आहे.बहुधा,MFHचं आणि माझं,माझ्या त्या वयात,आमने-सामने होत राहिल्याने,त्यांच्याबद्दल थोडंसं “अपनापन” राहिलं असावं.त्यांच्या चित्रकलेबद्दलची आब माझ्या मनातल्या कोपर्‍यात घर करून राहिली असावी.
   पण त्याचबरोबर त्यांच्याकडून नंतर झालेला वाह्यातपणा,मला रुचला नाही.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार

 2. Posted जून 24, 2011 at 8:17 सकाळी | Permalink

  लेख वाचला. एक माणूस म्हणून पण त्याला मानवंदना द्यावीशी वाटली नाही. जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा त्याने देवीदेवतांचा अपमान करणे सुरु केले. ती चित्र पण इतकी बिभत्स काढली,आणि इतकी बाळबोध, की त्या मधे केवळ अपमान करायचा हाच उद्देश दिसून येतो. काही लोकं गेले , की बरं वाटतं.. मला तर आनंद झाला.

  • Posted जून 24, 2011 at 7:01 pm | Permalink

   महेन्द्रजी,
   मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे.MFHने तसं करायला नको होतं.त्यामुळे त्याच्याबद्दल घृणा येणार्‍याना,
   “एकदाची ब्याद गेली”
   असं वाटणं आणि आनंद होणं स्वाभाविक आहे.

   • Posted जून 24, 2011 at 9:37 pm | Permalink

    मी लहान असतांना सिनेमाचे पोस्टर्स पेंट केलेले असायचे. त्यावर नेहेमी हे हुसेन चे नांव आणि जगदाळे यांचे नाव दिसायचे. सिनेमाच्या रिल सोबत हे पोस्टर्स पण गावोगाव फिरायचे.. 🙂 म्हणूनही हे नांव खूप लक्षात आहे.

 3. mangesh nabar
  Posted जून 29, 2011 at 2:28 सकाळी | Permalink

  आपण या लेखात व्यक्त केलेले विचार आवडले. हा लेख आपल्या परवानगीने मी साधना साप्ताहिकात पाठवू इच्छितो. कृपया तसे कळवावे. कारण या साप्ताहिकाच्या २ जुलै २०११ च्या अंकात श्री, सुरेश द्वादशीवार यांचा एकांगी आणि मुळमुळीत लेख आला आहे. त्याला प्रतिसाद म्हणून आपला लेख शोभून दिसेल. मी आपल्याला या अंकाची पी.डी.एफ. पाठवत आहे.
  मंगेश नाबर.

  • Posted जून 29, 2011 at 11:45 सकाळी | Permalink

   नमस्कार मंगेशजी,
   आपण पाठविलेला श्री.द्वादशीवार यांचा लेख मी वाचला.त्यांच्या मनात आलेले विचार त्यांनी मांडले आहेत.
   मला फक्त द्वादशीवारांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो की,
   हुसेनच्या मनात एव्हडी चित्र आली ती त्याने चितारली.एकदापण त्याला अल्लाचं चित्र, इतर नग्न चित्र काढली तशी, मनात आणून चितारावं असं का वाटलं नाही?
   आपल्या मनाला न फसविता श्री.द्वादशीवारांनी उत्तर द्यायला धजावं.
   माझा लेख आपण जरूर साधना साप्ताहिकात पाठवू शकता.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: