Monthly Archives: ऑगस्ट 2011

गुण- वैगुण्य़.

“माझं मन मला सांगतं की,तुझ्यात असलेल्या कमतरतेला तू नाकारलंस किंवा त्याकडे दुर्लक्ष केलंस,तर तुझ्यात असलेल्या उत्तम गुणांचं महत्व कमी होऊ देण्यात तू प्रवृत्त होशील”. प्रो.देसायांची वाट बघत आज मी बराच वेळ तळ्यावर बसलो होतो.आणि मी माझा वेळ ,मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचत, मजेत घालवत होतो. आपण तळ्यावर येणार म्हणून भाऊसाहेबांनी मला सकाळी फोन करून सांगीतलं होतं.मी […]

Advertisements

जादूगिरी

“जोपर्यंत ती लहान मुलगी मी माझ्यातून हरवून बसत नाही तो पर्यंत मी जादूवरचा विश्वास हरवून बसणार नाही.” “लहानपणी मला नेहमीच वाटायचं की,जादू करतात ती खरी असते.त्यावेळी मी जिकडे तिकडे जादूचे प्रयोग पहायची.टीव्हीवर जादूचे प्रयोग व्हायचे. शहरात जादूचे प्रयोग करणारी कंपनी यायची. दाखवली गेलेली चलाखी,समजून घ्यायला माझी किशोर वयातली बुद्धी त्यावेळी विवरण करू शकत नव्हती.” सविता […]

Advertisements

चविष्ट जेवण.

“चवीपासून उत्पन्न झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे, जीवनाचा उगम प्रकट होतो,नवजीवनाच्या निर्मितीची पवित्रता जाणवते,जीवन जगण्यातला आनंद जाणवतो.” सुमित्रा माझी चुलत बहीण.सुमित्रा चविष्ट जेवण करण्यात एकदम तरबेज आहे अशी माझी खात्री झाली आहे.मस्त मसालेदार जिन्नस करावेत ते सुमित्रानेच.तिच्या घरी कसलाही घरगुती कार्यक्रम असला की मला ती जेवायला हटकून बोलावते.मला ती पर्वणीच वाटते. बरेच दिवस चविष्ट जेवण झालं नाही […]

Advertisements

एक चॉकलेटची गोळी.

“माझी खात्री आहे की एखादी चॉकलेटची गोळी, कुठचाही भावुक प्रश्न उभा ठाकल्यास,ती गोळी तो प्रश्न सोडवू शकते.” त्या दिवशी मी जे.पी.रोडवरून चार बंगल्याच्या दिशेने चाललो होतो.दुपारची वेळ होती.बाहेर प्रचंड उन आणि त्याबरोबर उष्मा होत होता.उन्हापासून सावरायला छत्री उघडून चालत होतो.अंधेरी स्पोर्ट्स कॉप्लेक्सच्या फुटपाथवर लांबून प्रमिलेला येताना पाहिलं. “छत्री थोर तुझे उपकार”ह्या शिर्षकाखाली कुणीतरी छत्रीचे अनेक […]

Advertisements

आणू कुठून ती खुशी सांग एकदा

अनुवाद अंगीकारीलेस जे तुझे तुला आणू कुठून मी ते सदा सर्वदा भावते जी तुझ्या अंतराला आणू कुठून ती खुशी सांग एकदा तेच फुल मी ज्या सर्वांनी तुडवीले तेच जीवन जे आंसवानी वाहिले श्रावण वर्षा होऊन बरसणारा आणू कुठून तो मेघ सांग एकदा भावते जी तुझ्या अंतराला आणू कुठून ती खुशी सांग एकदा लालसा असे तुला […]

Advertisements

ज्यावेळचं त्यावेळी.

“दहा हजार फूट उंच डोंगर चढायला किंवा विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने हवेत उडी मारायला होणार्‍या उल्हासित आणि चिंतातुर मनस्थितीला कुणाला पारखं व्हावसं वाटेल.?” मी नवा फ्लॅट मागेच बुक केला होता.आणि आता तो तयार झाला होता.त्याचे उरलेले सर्व पैसे दोन दिवसात भरायची मला बिल्डरकडून नोटीस आली होती. माझं देना बॅन्केत खातं होतं.बरीच अशी माझी डिपॉझीट्स मला कॅश […]

Advertisements

आजीचं सूर्यकिरण.

“हे सर्व लोक मला महत्वाचे वाटतात.मी त्या सर्वावर प्रेम करते.म्हातारपण फार कठीण असतं रे,माझ्या नातवा!” अंधेरीला जाणार्‍या बस स्टॉपवर मी बसची वाट पहात एकदा उभा होतो.समोरच्या कॉलनीतून अशोकला येताना पाहिलं.तो पण बसने जाण्यासाठी बस स्टॉपवर आला.मला पाहून, मला हलो म्हणाला. “रोज मी मनात म्हणत असतो,एकदातरी सवडीने तुला विचारावं.पण संधीच मिळाली नाही.तेव्हा आज तुला नक्कीच विचारतो,नचुकता […]

Advertisements

जीवनाचा अर्थ-जगणं.

“शेवटी जीवनात कुठेतरी समतोलपणा आणावाच लागतो.” मला आठवतं ती संध्याकाळची वेळ होती.तो शुक्रवार होता.ऑफिस बंद झाल्यावर मी घरी जायला निघालो होतो.फ्लोरा-फाऊन्टन जवळ आल्यावर पेपर विकणारी पोरं खास एडीशन म्हणून एकाच बाजूला छापलेलं एक पानी पेपर विकत होते.ठळक बातमी होती की, “वेस्टर्न रेल्वेच्या मोटरमनचा अचानक संप.त्यामुळे सर्व गाड्यांची ये-जा ठप्प झाली आहे.” चटकन माझ्या डोक्यात विचार […]

Advertisements

वेगळंच आळसावणं.

“अगदी खरं पाहिलं तर,मला आळशी असण्यात विशेष वाटतं.कारण तसं राहिल्याने मी जो आज आहे तो तसा आहे.” कामतांचा लाल्या आहे तसाच आहे.त्याच्या लहानपणी त्याचे वडील, शरद कामत, त्याच्यावर सतत ओरडताना मी पाहिले आहेत. “अगदी आळशी आहे हा लाल्या.तोच त्याचा धाकटा भाऊ किरण पहा, सकाळी उठून आपल्या कामगिरीवर लागलेला असतो.कठीण आहे ह्या मुलाचं.” कधी वेळ मिळाला […]

Advertisements

असंच एक बालपण.

“आपल्या जन्म-दिवशी आपल्याला कोणतं बक्षीस मिळणार ही विवंचना असायची.इन्स्युरन्सचा हप्ता भरला पाहिजे ही काळजी नसायची.” मयुरेशला मी त्याच्या अगदी लहान वयात पाहिलं आहे.आता तो कॉमर्स शिकून एका बॅन्केत नोकरीला आहे.त्याची बायकोपण त्याच बॅन्केत नोकरीला असते.सहा वर्षाची त्याला मुलगी आहे. त्यादिवशी तो आणि मी गाडीत एकाच डब्यात जवळ जवळ बसलो होतो.संध्याकाळची वेळ होती.गाडी चर्चगेटहून निघाली तेव्हडंच.नंतर […]

Advertisements